प्रत्येक बाईला वाटते की आपला नवरा सर्वात चांगला आणि स्वतःसाठी देव माणूस आहे,याचं मुख्य कारण हे असतं की ती आपलं तन मन धन आपलं सर्वस्व देऊन टाकते आणि नवऱ्याला त्याच्या गुणदोषांसाहित स्वीकारते,नवरा कसाही असो तो पिदाड्या असो,रंडीबाज असो की जुवारी असो, ती त्याच्या सर्वच दोषांवर दुर्लक्ष करते. बाई लग्न होऊन घरात आली की ती आपल्या संसाराला डोक्यावर घेते,नवऱ्याचे नातेवाईक आपले नातेवाईक मानते,नवऱ्याच्या आई बाबांना ती आपले आई बाबा मानते,नंतर मुलं झाली की त्यांचं संगोपन,सगळ्या कुटुंबाची देखभाल यातच तिचं सगळं आयुष्य निघून जाते,नवरा समजून घेणारा असला,तिच्या किमान भौतिक गरजा पुरविणारा भेटला तर तिचं आयुष्य थोडं समाधानात जाते,नवरा तसा मिळाला नाही तर ती संपूर्ण आयुष्य एखाद्या कोंडवाड्यात घालवावे अशा रीतीने जगते,तिच्या मनाचा कोंडमारा होत जातो.बाई कधीच बोलून दाखवत नाही कारण शेवटी समाज काय म्हणेल हीच भीती तिला सदासर्वकाळ असते,माणूस बाहेर झोपून आला तरी तो माणूस आहे त्याले लाज नाही पण हिले कशी लाज आली नाही झोपाले अशी न्यायिक बाजू माणसाची पुरुषप्रधान संस्कृती अनादी काळापासून घेत आलेली आहे. तिचा मनाचा कोंडमारा उघडा करताना समाज सहजरित्या तिला छिनाल म्हणून बाहेर फेकतो.
हा भडवा चार रांडासोबत निजून आला काय किंवा जुव्यात बायकोला हारून आला काय,याची चूक कधीच नसते.हा समाज चूक ग्राह्य धरतो ती बाईचीच. समाजात खूप अंनबिलिव्हेंबल काही घटना डोळ्यांनी बघतो तेंव्हा नेमकी चूक कोणाची असते हेच समजत नाही. एक सत्यघटना येथे नमूद करावीशी वाटते,जी माझ्या डोळ्यांनी अनुभवली आहे. तो चांगल्या पगारावर,रेप्युटेड कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता,त्याच्या संसारात दोन गोंडस मुलींनी जन्म घेतला,त्याची बायको एक साधी हाऊसवाईफ म्हणून घर सांभाळत होती,कालांतराने मुली वयात आल्या, एक सोळा आणि दुसरी वीस एकवीस वर्षाची असेल, संसार मस्त आनंदात चालत होता,त्याला वाटले की मुली आता वयात आल्या आहेत,काही दिवसांनी त्यांचे लग्न करावे लागेल,त्यासाठी पैसा तर लागणारच म्हणून त्याने आपली जमापुंजी एक करून,बँकेतून सात आठ लाखाचे कर्ज घेऊन तिला एक व्यवसाय सुरू करून दिला,तिने काही दिवसात व्यवसायावर पकड निर्माण केली आणि भरपूर पैसा तिच्याकडे यायला लागला,हा भलताच खुश झाला,व्यवसाय तेजीत आल्याने याला घरात सुख समृद्धी खेळायला लागली,मुलींच्या लग्नाची तजवीज जवळपास निसचिंत झाली होती,आता ती रात्री सुद्धा आपला व्यवसाय सुरू ठेवू लागली,असेच काही महिने पार पडले,हा दिवसभर कामाने बाहेर असायचा आणि ती काम आहे म्हणून रात्रभर बाहेर. एका रात्री अचानकपणे त्याने दुकान गाठलं,त्याने जे बघितलं ते सरप्राईज होतं, ती दुसऱ्या माणसासोबत म्हणजे दुकान मालकासोबत आपल्या धुंदीत होती,तो आतून तुटला होता,आपल्या बायकोप्रती, आपल्या संसारासाठी,आपल्या मुलींसाठी लावलेला जीव,प्रेम केलेले सगळे प्रयत्न क्षणार्धात नष्ट झाले होते.त्याच्या तोंडातून झालेल्या प्रकाराबाबत एक शब्दही फुटला नाही,तो तडक घरी आला,वयात असलेल्या मुली आणि त्यांच्यासमोर त्यांच्या आईबद्दल काय सांगावे हा मोठा प्रश्न उभा होता.शेवटी नाईलाजाने दुसऱ्या दिवशी बायको समोर मुलींना विचारलं की तुमच्या आईसाठी कुठे कमी पडलो,डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करून हिला व्यवसाय उभा करून दिला,स्वतःच्या पायावर उभी केली,सुखी संसाराची मी स्वप्ने पाहिली, माझी नेमकी चूक तरी काय? तो आसवांनी डबडबलेल्या डोळ्यांनी मुलींना प्रश्न विचारत होता आणि मुली स्तब्धपणे आपल्या आईकडे बघत होत्या, मुलींनी बापावर विश्वास ठेवला आणि क्षणार्धात आपला निर्णय जाहीर केला की हे घर,दुकान आणि तिला आपल्या आयुष्यातून पूर्णपणे बेदखल करायचं,त्याने दुसऱ्याच दिवशी जसं आहे तसं घर दार,दुकान सगळं सोडलं आणि आपल्या मुलींना घेऊन दुसऱ्या शहरात राहण्यासाठी गेला,तिने उलट याच्याविरुद्ध कोर्टात मारहाण,हुंड्याची केस टाकली पण मुलींच्या भक्कम पाठिंब्याने तो दोषमुक्त झाला,कोर्टाने सोडचिठ्ठीलाही मान्यता दिली, आज त्याने एका दुसऱ्या विधवा बाईसोबत लग्न केले,तिलाही एक मुलगा आहे,नुकतेच एका मुलीचे त्याने नव्या मायेसोबत लग्न पार पाडले. ही गोष्ट ऐकून सुन्न झालात की नाही आणि तुम्हाला वाटत असेल ती बया आत्ता काय करते तर गोष्ट अशी आहे की ती आता धंद्यासोबत धंदा करते. पण नेमकी यात चूक कोणाची हे सांगू शकाल का तुम्ही,प्रत्येकवेळी माणूसच नंगा नसतो काही बयाही चांगल्या माणसाला नंगा करतात हे जिवंत उदाहरण आहे,माणसापेक्षा बाईला समाजाची अधिक सहानुभूती असते तर त्याच सहानुभूतीचा काही बाया फायदा उचलत असतात, पाहायला गेलं तर ती किती दिवस आनंद भोगेल तेही इतर माणसांसोबत,जोपर्यंत अंगात दम आहे तोपर्यंतच की नाही,जसं वय वाढेल तसा दम शिल्लक राहील का? पण वासनेपुढे कोणतीच गोष्ट अडथळा येत नाही,ती मस्तीच जीवघेणी असते.
माणूस हा निसर्गतःच बदमाश असतो,एखादा म्हणत असेल की माझ्या एवढा सोज्वळ,प्रामाणिक आणि एकनिष्ठ कोणी नाही म्हणून तर समजून जा की तो आपल्याला निव्वळ च्युत्या बनवतोय,तो जन्मजात त्या बाबतीत नालायकच असतो,आपली कितीही सुंदर असली तरी त्याला दुसरीकडे किमान नजर टाकण्याचा तरी मोह आवरत नाहीच.वाईट वाटेल पण हेच सत्य आहे.पुन्हा दुसरी गोष्ट सांगतो……पुढच्या पोष्टमध्ये..
(धान जमा करत आहेत,वावराच्या बांधावर बसलो होतो,लिहिण्याचा मोह झाला,लिहून टाकलं)
- उमेश लीला परशुराम पारखी

