About Us

माझ्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या सर्व मित्रांचे स्वागत आणि मनःपूर्वक आभार
नमस्कार मित्रांनो,

मी उमेश पारखी,मु.पो.भेदोडा,ता.राजुरा,जिल्हा.चंद्रपूर 
 आपणा सर्वांचे माझ्या संकेतस्थळावर स्वागत आहे, माझी वेगळी अशी काय ओळख सांगू ! मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील एक सामान्य सर्वसाधारण व्यक्ती आहे.मी सुरुवात कामगार आणि शेवट कामगारच आहे,तुमच्या आमच्यातलाच,तुमच्या आस पास असलेला पालापाचोळाच जणू ! पण स्वतःचं एक अस्तित्व मात्र अबाधित ठेवून आहे.

सामान्य शेतकऱ्यांच्या वाट्याला ज्या हालअपेष्टा येतात यापेक्षा वेगळी माझी कहाणी नाही,जीवनाचा गाडा ओढता ओढता,आसूड अंगावर घेता घेता माझ्यातला लेखक,कवी कधी जागृत झाला हे माझे मलाच कळले नाही.वास्तविकता साहित्य हे माझं क्षेत्र नाही,कंपनी मध्ये म्यानेजर म्हणून काम पहात असताना कंपनी व्यवस्थापन हे माझ्या उपजिवीकेचे साधन आणि कामगार हाच मुख्य घटक,या दोघांची सांगळ घालतांना हे नातं जपता जपता कवितेच्या विश्वात रममाण झालो.सामाजिक बांधिलकी जपताना स्वतःचे मन,मस्तक,मनगट डोके ठिकाणावर ठेवून चिकित्सा करायला शिकलो,खऱ्या अर्थाने जगायला शिकलो.

आपल्या सर्वांच्या प्रेमाची पावतीच दिनांक २३.११.२०१८ ला “शून्यात शोधतो मी ” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करून मिळाली तसेच अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा आणि अख्या महाराष्ट्रात मानाचा समजला जाणारा “राज्यस्तरीय अक्षर नवांकुर पुरस्कार २०१८” अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान आयोजित तिसरे अभंग साहित्य संमेलन,बिबी येथे ख्यातनाम लेखक,कवी मा.ज्ञानेशजी वाकुडकर साहेब यांच्या हस्ते शेतकरी नेते,माजी आमदार मा.वामनराव चटप,इन्स्पायरचे प्रा.विजय बदखल सर,प्रा.मोहरकर सर,प्रसिद्ध नाट्य कलावंत,साहित्यिक प्रा.सदानंद बोरकर सर,बिबी स्मार्ट गावाचे उपसरपंच प्रा.आशिष देरकर,असामान्य व्यक्तिमत्व लेखक,कवी श्री.मनोजभाऊ बोबडे,संस्थेचे अध्यक्ष प्रा.रत्नाकर चटप सर,कवी किशोर कवठे सर,कवी राम रोगे सर,कवी अविनाशजी पोईनकर,श्री.चंदूभाऊ झुरमुरे,कवी राजूभाऊ भोयर,उदोयोन्मुख लेखक आदित्य आवारी आणि ईतर गणमान्य लेखक,कवी आणि समस्त बिबी गाववासीयांसमोर हा पुरस्कार देऊन मला गौरवान्वित आले.

जन्मतारीख : २० ऑक्टोबर १९७८

शिक्षण : बी.कॉम, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग.

पेशा : डेप्युटी मॅनेजर (विस्फोटक तयार करणारी कंपनी)

छंद : वेबसाईट डेव्हलोपिंग,अँड्रॉइड अप्लिकेशन डेव्हलपमेन्ट,लेखन,फोटोग्राफी.

प्रोजेक्ट:https://nateaapulkiche.org,https://myhpmart.com,https://dkchanda.in,https://dkwani.in,https://parkhiwebs.in,https://parkhiarts.in,https://apmwani.in,https://hunkar.in,https://sdpmkinwat.in,https://svmyavatmal.in/

प्रकाशित साहित्य : शून्यात शोधतो मी(काव्यसंग्रह)

पुरस्कार :

अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय अक्षर नवांकुर पुरस्कार 2018
मराठा सेवा संघ प्रणित वीर भगतसिंग परिषद तर्फे गुणवंत गौरव पुरस्कार २०१८
सप्तरंग प्रकाशन,राजुरा तर्फे विशेष सन्मानपत्र 2018

फिनिक्स साहित्य मंच,चंद्रपूर तर्फे दिला जाणारा  राज्यस्तरीय फिनिक्स सेवाव्रती पुरस्कार २०२०

विचारज्योत फाउंडेशन तर्फे पुरस्कार २०२२

 

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी