विसरण्याची शक्ती

[tta_listen_btn]


निसर्गाने माणसाला सर्वात मोठी शक्ती दिली आहे,ती म्हणजे विसरण्याची! विसरण्याची शक्ती एवढी बलवान असते की त्या शक्तीने माणसाच्या जीवनात कितीही वाईट घटना घडू द्या कालांतराने तो ती घटना विसरतोच! आणि त्या विसरण्याच्या वरदानाने माणसाचं एकंदरीत जीवन सुकर झालेलं आहे.जीवनातल्या वाईट साईट घटना,गोष्टी माणूस विसरू शकला नसता तर त्याच घटनांमध्ये,त्याच दुःखामध्ये त्याचे उरलेले जीवन सुद्धा दुःखद बनले असते.माणसाच्या जीवनात चढ उतार नसते,दुःख नसते तर माणसाला त्याच्या जीवनात आलेल्या सुखाचे,त्याला मिळालेल्या जीवनाचे महत्व कळले नसते. एका नामांकित वृत्तपत्राची एक हेडिंग वाचनात आली “कुटुंबासाठी तब्बल इतक्या हजार कोटी रुपयांची संपत्ती मागे सोडून गेले सायरस मिस्त्री” म्हणजे माणसाची किंमत किती शून्य आहे,किती भावनाशून्य झालो आहोत आपण,सायरस मिस्त्री मरण पावले याचं दुःख नाही पण त्यांनी मागे ठेवलेली संपत्ती मात्र महत्वाची ठरते,ही केवळ वर्तमानपत्रांची हेडिंग नव्हे तर आत्ताच्या समाजाचीही कटू सत्यस्थिती आहे,समाजाचा अशा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन तर बदलला आहेच परंतु जो मरण पावतो त्याच्या कुटुंबाचाही बघण्याचा दृष्टिकोन नेमका तोच असतो.सगळेच सायरस मिस्त्री नसतात पण समाजातली जवळपास सगळीच कुटुंबे आपमतलबी असतात.मरणारा मरून जातो पण त्यामागे त्याच्या कुटुंबाचे जे हाल होतात ते फक्त ते कुटुंबच जाणून असते.चार दिवस कुटुंबातील इतर नातेवाईक त्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे आहोत असा देखावा निर्माण करतात आणि काहीच दिवसात त्या कुटुंबाला कोणी विचारातही घेत नाही.
म्हणून आपण आपल्या कुटुंबासाठी काय ठेवून जात आहोत की ज्यामुळे आपल्यानंतर त्यांना रस्त्यावर भीक मागण्याची पाळी येऊ नये,इतरांच्या तुकड्यावर जगण्याचे दिवस येऊ नयेत हे ठरवणं महत्वाचं असतं कारण याला जवाबदार आपण स्वतः असतो,आपल्यामुळे आपलं कुटुंब निर्माण झालेलं असतं. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या कुटुंबाचा आपण आधार असतो,आधारच नाहीसा झाला तर समाजाची दृष्टीच बदलून जाते.कुटुंबप्रमुख नावाजलेला असेल किंवा त्याने त्याच्या आयुष्यात इतरांना मदत केली असेल तर लोकं एवढच म्हणतात अरे तुझा बाप खूप चांगला होता,खूप लोकांना मदत करायचा! पण त्या लेकराला मदत करायला मात्र त्यांचे हात पुढे येत नाहीत.

माझी पोष्ट आपणास कशी वाटली? कृपया पसंती द्या.

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी