[tta_listen_btn]
राजकारणात सत्ता,पैसा हे मुख्य केंद्रबिंदू असतात,ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे पॉवर आणि ही पॉवर ज्याच्याकडे असेल तो त्या पॉवरचा वापर चांगल्यासाठी करेल की वाईटासाठी करेल हे त्या माणसावर अवलंबून असते,माणूस उचापती नसेल तर ती पॉवर योग्य कार्यासाठी वापरली जाते तर माणूस हरामी असेल तर तीच पॉवर वाईट कारस्थानासाठी तो वापरत असतो.आज कोणीच एवढा दुधखुला नाही की राजकारणात नेमकं काय होतं हे समजत नसेल.राजकारण करण्यासाठी महत्वाचा असतो तो पैसा! मग तो कोणत्याही माध्यमाने को होईना आपल्याजवळ तो कसा जमा होईल यासाठी राजकारणी दिवस रात्र एक करत असतात, आपण ऐकतो की एखाद्या नेत्याकडे अल्पावधीत कोट्यवधी इस्टेट कशी जमा झाली जो कधीकाळी रिक्षा चालवत असे किंवा एखादी टपरी चालवत असे.सामान्य माणूस इमानदारीने कितीही मेहनत करून,कष्ट करून काहीही करत असेल तरी आपल्या उभ्या आयुष्यात एखादं मोठ्ठ घर,एखाद्या ठिकाणी दहा पाच एकर जमीन,पाच दहा लाखाची एखादी फोर व्हीलर किंवा जास्तीत जास्त एखाद्या ठिकाणी एक दोन प्लॉट या उप्पर मजल मारू शकत नाही! मग हे नेते अगदी कमी काळात करोडो रुपयांची माया कशी काय जमवतात? याचा अर्थ असा होतो की करोडोची माया जमविण्यासाठी करोडोंचा भ्रष्टाचार करावा लागतो नव्हे तो केल्याशिवाय ती करोडोंची माया जमाच होऊ शकत नाही.
-उमेश पारखी,संपादक हुंकार
मग नेमका प्रश्न येतो यांच्याकडे येणाऱ्या पैशाचे नेमके स्त्रोत्र काय असते, त्यांच्याकडे येणारा पैसा हा जनतेचाच पैसा असतो पण नेमका तो आड मार्गाने म्हणजे सरकारी कामाच्या निमित्ताने तो वळवला जातो हा पैसा जमवण्यासाठी जे नेते असतात त्यांचा एक विशिष्ट वर्ग त्यांनी नेमलेला असतो जो सतत त्यांच्या पाठीशी उभा असतो तो ठेकेदाराच्या रुपाने, सरकारी बाबूच्या रूपाने अशा अनेक रूपात तो सतत कार्यरत असतो, सरकारी कामांचे ठेके दिले जातात त्यात प्रत्येक नेत्याचा काही भाग म्हणजे टेंडरची जी काही रक्कम होत असेल त्याचे काही परसेंट हे प्रत्येक नेत्यांकडे वळते केले जाते आणि हाच पैसा काही प्रमाणात ही नेते मंडळी आपल्या पक्षाला आणि आपल्या वरच्या नेत्याला पोहचवत असतात.राजकारणात मोठे होण्यासाठी आणि राजकारणात टिकून राहण्यासाठी ही व्यवस्था चालवणे नेत्यांना अत्यंत महत्त्वाचे असते. आज पैशाशिवाय राजकारण हे एक दिवास्वप्न आहे पैसा नसेल तर राजकारणात कोणताही माणूस टिकू शकत नाही आणि राजकारणात टीकायचे असेल तर पैसा असल्याशिवाय साधा तुमचा स्वतःचा प्रचार देखील तुम्हाला करता येत नाही.पैसा नसेल तर तुम्ही कार्यकर्ते जमवू शकत नाही आणि तुमच्या मागे फिरणाऱ्याला किमान बिर्याणी चारण्यासाठी तरी पैसा तुमच्या खिशात नसेल तर तुमच्या मागे फिरायलाही कोणी येणार नाही.आज तत्व,निष्ठा वैगेरे गोष्टी राजकारणात शिल्लक उरल्या नाहीत,तुम्ही पैसा कसा जमवता,तुमच्या येणाऱ्या पिढ्या बसून खाण्याइतपत माया कशी जमवता हे महत्वाचे आहे,आजच्या घडीला राजकारणात शुद्ध कोणी नाही आणि राजकारनात राहून ज्याने पैसा कमविला नाही त्याच्या एवढा मूर्ख कोणी नाही.
अनाथांचे नाथ, एकनाथ शिंदेंची संपत्ती, 7 गाड्या, 9 कोटींची घरं, 25 लाखांचं सोनं, 1 रिव्हॉल्व्हर, 1 पिस्तूल अजून बेहिशेबी मालमत्ता.
हे एक साधारण उदाहरण आहे,कधी काळी रिक्षा चालविणारा एकनाथ शिंदे अगदी वीस तीस वर्षाच्या काळात करोडपती कसा काय होऊ शकतो,यांचा इन्कम सोर्स काय असला पाहिजे की एवढ्या कमी वेळात करोडोंची माया हा माणूस जमा करू शकतो.हे एक उदाहरण आहे,अशी बरीच उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात,देशात आहेत. यात कोणत्याच पक्षाचा,कोणताच नेता सुटलेला नाही.अर्थातच सगळेच पक्ष भ्रष्ट आहेत आणि भ्रष्टाचाराने लिप्त आहेत,प्रत्येकाची वाटणी,हिस्सेदारी ठरलेली आहे,प्रत्येकाचा वाटा खालून वरपर्यंत पोहचून सारेच भ्रष्टाचाराने लिन आहेत,मग तीं कमाई करण्यासाठी साम,दंड,भेद,हिंसा ही हत्यारे प्रत्येक पक्षाने,नेत्यांनी वापरलेली आहेत.ही व्यवस्था अगदी तळापासून सुरू होते जी वरपर्यंत सहज पोहचलेली आहे,आपल्या अवती भवती असणारी माणसे सुद्धा लाच घेतल्याशिवाय आणि लाच दिल्याशिवाय कोणतीही कामे करत नाहीत,साधे ग्रामपंचायतीचे पाच दहा लाखाचे काम जरी असेल त्यातही सरपंच 10% विचारतो.मग वरच्या नेत्यांना तुम्हाला भ्रष्टाचारी म्हणण्याचा हक्क तरी कोण देतो?
तरीही आपल्याला मत देणाऱ्या मतदारांचा काही एक विचार न करता जिकडे डाव साधेल अशा पक्षात उड्या मारणारे महाभाग हे नालायकच म्हणावे लागतील,एका पक्षात राहून करोडोंची संपत्ती कमावून ती दुसऱ्या पक्षात वाचविण्यासाठी जाणारे हे भामटे सामान्य जनतेचे काय म्हणून होतील,ज्या पक्षाच्या हातात सत्ता आहे,स्वायत्त संस्था आहे,मीडिया आहे,न्यायव्यवस्थेवर पकड आहे असा पक्ष आजच काय भविष्यातही अशा भ्रष्ट लोकांना घेऊन कायम आपल्यावर राज्य करेल आणि आम्ही चिवड्यातले कडीपत्ते अलगद फेकले जाऊ…..