इतिहासाचे विद्रुपीकरण

[tta_listen_btn]


छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर त्यांनी कुठेही धर्माभिमान बाळगल्याचे आपल्या निदर्शनास येत नाही किंवा इतर धर्मांचा द्वेष केल्याचे दिसत नाही,जर तसे असते तर त्यांच्या मंत्रिमंडळात आणि सैन्यात कित्येक मावळे मुस्लिम नसते,इतकेच नाही तर शत्रू इतर धर्माचा का असेना मेल्यावर त्याची विटंबनासुद्धा कधी झाल्याचे त्यावेळेसच्या इतिसाच्या लेखन सामुग्रीत दिसून येत नाही. इतके असूनही त्यावेळेस इतिहासाचे लेखन करणारी भ्रष्ट जमात सत्य इतिहासाशी गद्दारी करण्यात चुकली नाही.एका विशिष्ट जातीने आपल्या सोयीचा इतिहास लिहून आमच्या महापुरुषांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण केले.
■हा विद्रुपीकरणाचा सपाटा तेंव्हापासून तर आत्तापर्यंत अविरत सुरूच आहे,त्यांनी कोणालाच सोडले नाही,शिवरायानंतर छत्रपती संभाजी राजेंच्या इतिहासाचेही विद्रुपीकरण या हारामखोरांनी असेच केले आहे.संभाजी महाराजांची प्रतिमा ‘धर्मवीर’ म्हणून समाजमनावर बिंबविण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे नव्हे त्यात ते आमच्या अडणीपणामुळे यशस्वी झालेले आहेत.एखाद्या चांगल्या माणसाचे चारित्र्य खराब करायचे असेल तर त्याच्या विरोधात खोट्या कथा,खोटी नाटके,खोट्या बातम्या पेरल्या जातात ज्या कालांतराने आमचा अभ्यास आणि चिकित्सक बुद्धी नसल्याने खऱ्या वाटायला लागतात आणि आमच्या पिढ्या त्या खोट्या गोष्टींच्या वाहक बनतात.
इतिहास हा ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहिला जातो. त्यावेळेस झालेला पत्रव्यवहार, बखरी, प्रवास वृतांत, ताम्रपट इत्यादी गोष्टी ऐतिहासिक साधनांत मोडतात. पत्रव्यवहार व वृत्तान्त ही अधिक विश्वासार्ह व प्रथम दर्जाची साधने मानली जातात पण एकाही तत्कालीन आणि प्रथम दर्जाच्या साधनांमध्ये संभाजी महाराजांनी धर्मासाठी मृत्यू पत्करल्याचे नमूद केलेले नाही. औरंगजेबाचा चरित्रकार साकी मुस्तैदखान हा संभाजी महाराजांना बादशाही छावणीत आणले तेव्हा हजर होता. तो संभाजी महाराजांच्या देहदंडाचा साक्षीदारच आहे. बादशहाकडून धर्मातराचा प्रस्ताव मांडला गेला असता तर खात्रीनेच त्याने त्याचा आपल्या ग्रंथात उल्लेख केला असता; पण त्याच्या ग्रंथात तसा कुठे उल्लेख नाही.

■औरंगजेबाचा दुसरा चरित्रकार ईश्वरदास नागर हा सांगतो की, बादशहाने आपला खास अधिकारी रूहुल्लाखान यास कैदेतील संभाजी महाराजांकडे पाठविले व त्याच्या मार्फत त्याने त्यांना दोनच प्रश्न विचारले.
ते असे :
१. “तुझे खजिने, जडजवाहिर आणि इतर संपत्ती कुठे आहे?” २. “बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवीत होते?”
येथे बादशहाने ‘तू मुसलमान होत असशील तर जीवदान मिळेल; असे म्हटल्याचे त्याने नमूद केलेले नाही.
संभाजी महाराजांकडे बादशहाने पाठविलेला तथाकथित धर्मातराचा प्रस्ताव व त्यास संभाजी महाराजांनी ‘तुझी बेटी देत असशील तर कबूल’ असे जशास तसे तथाकथित उत्तर दिल्याची भाकडकथा शे-दीडशे वर्षांनी लिहिलेल्या मल्हार रामरावच्या बखरीसारख्या उत्तरकालीन बखरीत रंगविली गेली आहे आणि अशा भाकडकथा पसरविणारा एक वर्ग त्यावेळेसही कार्यरत होता आणि आजही कार्यरत आहे.संभाजी राजे कधीच धर्माभिमानी नसताना त्यांना हेतुपुरस्सर धर्मवीर म्हणून दोन समाजात तंटे करण्यासाठी त्यांचा वर्षानुवर्षे उपयोग करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
इतिहासाचे विकृतीकरण करणे ही एका विशिष्ट वर्गाची पद्धत आहे,बहुजनातील थोर पुरुष यांचे नाव व कार्य नष्ट करण्यासाठी ते अहोरात्र कार्यरत आहेत.
■सावरकर संभाजी महाराजांना व्यसनी म्हणतो तर शिवाजी महाराजांचे राजा होणे म्हणजे काकयोग म्हणून संबोधतो,पुरंदरे नाटक लिहून शिवाजी महाराजांची प्रतिमा मलिन करतो,शिवरायांची समाधी ज्योतिबा फुले शोधून काढतात,दहा दिवसांचा आनोंदोस्तव साजरा करतात आणि त्याविपरित हा सोहळा मोडून काढण्यासाठी टिळक गणेशोत्सव सुरू करतात,इतकेच नव्हे तर सिंहासन तयार करण्याच्या बाता मारून भोळ्याभाबळ्या जनतेकडून वर्गणी जमा करून लंपास करतात,तुकोबांचे विद्रोही अभंग जनतेत येऊन आपल्या विरुद्ध क्रांती होऊ नये म्हणून अभंग इंद्रायणी नदीत डुबवायला लावतात आणि रंगपंचमीच्या दिवशी त्यांचा खून करून ते सदैव वैकुंठाला गेले म्हणून भाकडकथा रचतात.अशा अनेक घटना सांगता येतील ज्या वेळोवेळी बहुजनांचा इतिहास पुसण्यासाठी पेरण्यात आल्या आणि वर्तमानातही ही लॉबी कार्यरत आहे परंतु आपण ओळखू शकत नाही हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल.
भारताची दुर्दशा ही अंतिम टोकावर येऊन पोहचलेली आहे,संविधान नावाला ठेवून मनुस्मृतीच्या राज्याकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे,प्रस्थापित सत्तेविरुद्ध बोलणाऱ्याला छाटले जात आहे,या ना त्या मार्गाने चांगली लोकं आणि चांगली लोकशाही व्यवस्था संपविली जात आहे,दहशतीचे साम्राज्य पसरले आहे,हे साम्राज्य आम्हाला,आमच्या पिढीला तर संपवेलच यात शंकाच नाही परंतु तुम्ही त्यांची सोबत करणारेही नष्ट व्हाल ही काळ्या दगळावरची पांढरी रेष आहे.
✍️उमेश पारखी

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी