पैसा..

india rupee banknote

[tta_listen_btn]


पैसा कोण किती खर्च करतो यापेक्षा कोण किती वाचवतो याला मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनात खूप मोठं महत्व आहे.तुम्ही एखाद्या संकटात असाल तर पैशाचे महत्व दुप्पट वाढते तर तुम्ही सुखात असाल तेंव्हा पैशाची किंमत आपोआपच तुम्ही स्वतःहून कमी करत असता.तुमच्याकडे पैशाची आवक जशी वाढते तशी तो नसल्या ठिकाणी खर्च करण्यास तुमचे मन उताविळ होत असते तर पैशाची चणचण जेंव्हा भासते तेंव्हा तुमच्या हातावर कोणी कवडीही ठेवत नाही. हीच सामान्य माणसाची मेन्टोस जिंदगी असते………
▪️साधारणतः मध्यमवर्गीय माणूस स्वतःच्या चुकांनी,बेलगाम शौकानी आणि अनाठायी खर्चानी स्वतःला दुःखात लोटून घेत असतो,आपली आवक मोजकी असताना जावक वाढली की अतिरिक्त भार ही जिंदगी सोसू शकत नाही. माणसाला जगण्यासाठी फार काही लागत नाही,खोटं वाटतं का? आपल्या आजूबाजूलाच बघा,साधारण माणूस महिन्याला केवळ आठ हजारात घर चालवतो, कसा चालवत असेल? कारण त्याच्या गरजा मर्यादित आहे,तो रस्त्यावर साठ रुपयाचे मंचुरीयन खाण्यापेक्षा त्या साठ रुपयात किलोभर तांदूळ येईल आणि अख्ख कुटुंब एकवेळचं जेवेल हा विचार तो अगोदर करतो.आपण तो विचार करू शकत नाही कारण आपली कमाई त्याच्यापेक्षा जास्त असते,साठ रुपये गेले तरी आपल्याला विशेष फरक पडत नाही आणि अशा क्षुल्लक गोष्टीतला क्षुल्लक फरक एकदिवस साठ हजार कमविणाऱ्याला देखील दुसऱ्यासमोर हात पसरवायला भाग पाडतो.हातात पैसा असला की माणसाला मनावर ताबा ठेवता येत नाही,दुसरा कारने दिसला की त्याला ही कार घ्यावीशी वाटते,दुसरा देशी पीत असेल तर यालाही बॅगपायपर प्यावीशी वाटते.
▪️काल आणि आज नागपुरात पायी फिरलो,जेवण कुठे स्वस्त मिळेल याचा शोध घेत होतो,शहराच्या गर्दीत ओळखणारं कोणीच नसल्याने आपण काय करतो आहोत हे कुणालाही माहीत होण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे माझे दोन पैशे कुठे वाचतील यासाठी नेमकी धडपड चालली होती. मी साधारण माणूस आहे आणि साधं जगणच मला मान्य असल्याने इतर कोणालाही निव्वळ आपल्यामुळे त्रास होईल असं वागायला आवडत नाही, तर लोकमत चौक ते बर्डीपर्यंत एक एक खानावळी समोरचे बोर्ड वाचत वाचत चालू लागलो,कुठे 150 कुठे 160 कुठे 120 तर कुठे 100 असे रेट दिसत होते,शेवटी 100 ज्याठिकाणी दिसले त्याठिकाणी जेवायला गेलो,मनासारखं जेवण मिळणार नाही ही खात्री होती कारण रेट कमी होते पण मला वेळ आणि पैसा दोन्ही वाचवायची तेवढीच गरज होती, 100 ऐवजी 150 त जेवलो असतो तर 50 वाचले नसते आणि 50 मध्ये सकाळच्या नाश्त्याची सोय झाली नसती. शहर तसं अनोळखी नाही की नातेसंबंध,मित्रही काही कमी नाही पण आपल्या दुःखाचा बाजार उगाचच का म्हणून मांडावा आणि तो मांडूही नये, तुमचं दुःख हे तुमचं असतं,इतरांना काही तुमच्याशी देणं घेणं नसतं.ते तुम्हालाच निस्तरायचं असतं.
▪️हे एक साधं उदाहरण होतं,आजूबाजूला रस्त्यावर बाहुल्या विकणारी,ठेल्यावर कपडे विकणारी,भेळ विकणारी,रस्त्यात शर्टिंग करून चष्मे विकणारीही माणसेच आहेत,त्यांच्या जगण्याकडे पाहिलं तर आपण तर लाख पटीने चांगल्या परिस्थितीत आहोत,चांगल्या अवस्थेत आहोत मग आपल्यालाच नेमकी कशाची मस्ती असते,नेमकी कशाची गर्मी असते हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो…..

माझी पोष्ट आपणास कशी वाटली? कृपया पसंती द्या.

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी