हिंदुत्व

[tta_listen_btn]


हिंदुत्व समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण मला घ्यायला आनंद वाटेल,आपलं हिंदुत्व नेमकं कसं आहे ते या उदाहरणामुळे आपल्या चांगलं लक्षात येईल.हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे,वेद,पुराण,मनुस्मृती यामध्ये यज्ञात गायीला कापून खाण्याची उदाहरणे दिसून येतात,सावरकर यांनी गाय ही उपयुक्त पशु असून तिला कापून खाल्ले पाहिजे,गाय पशु आहे देवता तर नाहीच नाही असे देखील आपल्या पुस्तकात म्हटले आहे(पुस्तक:समग्र सावरकर वाङमय, खंड 5,क्ष किरण निबंध) असे असून देखील आपल्या हिंदू धर्मात गायीला देवस्थानी ठेवून पूज्य मानले आहे हे न कळणारं गणित आहे,वास्तविकता गायीला,निसर्गाला,प्राण्यांना पूज्य मानणे हा सिंधू,द्रवीळ संस्कृतीचा एक भाग होता,सिंधू,द्रवीळ संस्कृतीत गाय किंवा कोणत्याही पाळीव प्राण्यांची हत्या करून ते भक्षण केल्या जात नव्हते म्हणून आजही आपले हिंदू धर्मीय गायीला पूज्य मानतात.गाय,घोडे किंवा इतर प्राण्यांच्या मांसाचे सेवन हे सिंधू,हिंदू किंवा द्रवीळ संस्कृतीत नव्हते तर ते यज्ञ करून प्राण्यांची कत्तल करून खाणाऱ्या वैदिक संस्कृतीत राजरोसपणे होत होते म्हणून सावरकरांचे मत वैदिक संस्कृतीशी सुसंगत ठरते. तर आज जे वैदिक आहेत ते तुम्हा आम्हाला दाखविण्यासाठी केवळ हिंदू म्हणून असल्याचे नाटक करतात आणि त्यांच्या नाटकास आपण जे हिंदू आहोत ते बळी पडत असतो.त्यांचे स्वतःला हिंदू म्हणण्याचे हिंदुत्व आहे ते केवळ स्वार्थासाठी कार्य करताना आपणास वेळोवेळी दिसून येते,आपला स्वार्थ असेल तर हिंदुत्व खतरे मे अन स्वार्थ नसेल तर हिंदू नावाचा शब्दही आपल्या तोंडून बाहेर येत नाही.गंमत अशी की गायीला राजकारणासाठी,हिंदू मुस्लिम तंट्यासाठी भरपूर प्रमाणात वापरता येते नव्हे तर वेळोवेळी तसा वापर झालेला आहे,गायीला वाचविणारे संघटनपण आपल्या नेत्याचा ऑर्डर असेल तरच गायीला वाचवायला येत असतात किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करायचे झाले की गायीच्या मांसाचा तुकडा आपल्याच मंदिरात टाकून धार्मिक उन्माद निर्माण करीत असतात.
मी जे उदाहरण सांगू इच्छितो ते असे की या देशात गायीला वाचवू म्हणणारे,गायी पाळणारे जसे आहेत तसे गायीला मारणारे,गायीचे मांस खाणारे सुद्धा आहेत,मांस खाणारे मुस्लिमच आहेत असे नाही बऱ्याच प्रमाणात हिंदूही गायीचे मांस भक्षण करणारे आहेत,एखाद्याला टी. बी. झाली तर ढोराचे मांस खा असा सल्ला देणारेही आपल्याकडे भरपूर आहेत.तर मुद्दा असा की आपला महाराष्ट्र असो,बिहार असो,छत्तीसगड असो की देशातले इतर कोणतेही राज्य असो गोमांसाची तस्करी अव्वल नंबरवर होते,गोवा,हैद्राबाद,कोलकाता अशा काही शहरात हा धंदा खूप मोठ्या प्रमाणावर चालतो,छत्तीसगड सारख्या राज्यातून हैद्राबाद सारख्या शहरात गोमांसाची निर्यात केली जाते.आता यात एक गंमत पहा गाय खरेदीचा व्यवसाय करणारा मुस्लिम जरी असला,तरी गाय विकणारा हा हिंदूच असतो,त्याला हेही माहीत असते की गाय खाटकाला विकल्यानंतर तिचे काय होते,याठिकाणी मात्र या हिंदूचे हिंदुत्व खतऱ्यात येत नाही,पुढे या विकत घेतलेल्या गायी एखाद्या गाडीमध्ये भरल्या जातात,छत्तीसगड ते हैद्राबाद मार्गात दोन तीन ठिकाणी तरी त्यांना राज्य सीमा ओलांडावी लागते,एरव्ही प्रत्येक वाहनाला परमिट वैगेरे कागदपत्रे लागतात पण ह्या गाडीला एकाही कागदाची गरज पडत नाही,दोन तीन राज्यातले पोलीस,आरटीओ यांना भेटत असतात,गाडीत काय आहे हेही त्यांना व्यवस्थित माहिती असतं परंतु कोणीच यांना रोखत नाही की कोणालाही हिंदू आणि हिंदुत्व संकटात आहे असे वाटत नाही,यांचे कोणाचेही हिंदुत्व कधीच खतऱ्यात पडत नाही,का? काय ही माणसे मुस्लिम असतात? गाडी थांबविणारा प्रत्येक पोलीस मुस्लिम असतो? राज्य सीमेवर गाड्या चेक करणारा प्रत्येक आरटीओ मुस्लिम असतो? यात कुठेही हिंदुत्व येत नाही की स्वतःला हिंदू म्हणून बोंबलणाऱ्याच्या भावना दुखत नाही.हा व्यवसाय आहे,ज्या सीटवर टेबलाखालून पैसा येतो त्या ठिकाणी धर्म बिर्म नावाची कोणती गोष्ट असत नाही ही सत्यता आहे,आपल्या अज्ञानामुळे काही राजकारणी आपला व्यवसाय करण्यासाठी आमच्यासारख्या अज्ञानी लोकांचा फायदा उचलतात,यांना धर्माशी कोणतीही सोयरीक करायची नसते,हीच गोष्ट आपण समजू शकत नाही,समजू शकलेलो नाही.
हे आपल्या धर्माशी संबंधित एक साधे उदाहरण आहे,अशी कित्येक उदाहरणे आपल्याला देता येतील.ही प्राण्यांची,कत्तलीची गोष्ट सोडता बाकी आपल्या धर्मात स्त्रियांना एखाद्या जनावरापेक्षा जास्त महत्व दिले आहे असे आपल्या आपण मानत असलेल्या धर्मग्रंथात तरी मला कुठे दिसले नाही,स्त्रीची कायम अवहेलना,चेष्टा,निंदा केल्या गेली जी इतर कोणत्याच धर्मात त्यांच्या धर्मग्रंथात आढळत नाही.काही अधिक प्रमाणात मुस्लिम धर्म स्त्रीच्या बाबतीत सहिष्णू नाही,मुस्लिम धर्मात स्त्रियांच्या वर्तनाविषयी,त्यांच्यावर लादलेल्या बंधनाविषयी खूप कठोर नियम आहेत,जे आजच्या काळाला सुसंगत नाहीत,ते नक्कीच निषेधार्हच आहेत परंतु ते नियम आहेत! परंतु हिंदूंच्या ग्रंथात नियमपलिकडे स्त्री म्हणजे भोगवस्तू,लैंगिक कामना भागविण्यासाठीच आहे असे मत ठळकपणे दिसून येते.

माझी पोष्ट आपणास कशी वाटली? कृपया पसंती द्या.

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी