रामप्पा मंदिर

[tta_listen_btn]


रामप्पा_मंदिर, कदाचित हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जे देवाच्या नावाने नव्हे तर ज्या कारागीराने बांधले त्याच्या नावाने ओळखले जाते.तर गोष्ट अशी की मी ज्या ठिकाणी भटकतो त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती,त्या ठिकाणाचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आज अचानक मी ज्या ठिकाणी काम करतो अगदी त्या ठिकाणाच्या जवळ एवढी सुंदर,देखणी कारागिरी केलेली वास्तू, शिल्पकलेचा उत्तम नमुना पहावयास मिळाला,तेलंगणात एवढ्या वर्षात एवढ्या जवळ हे ठिकाण असताना मी आजपर्यंत का पाहू शकलो नाही याचे मलाच आश्चर्य वाटून गेले.
■हे मंदिर भगवान शंकराचे असून हे भूपालपल्ली जिल्ह्यात मुलुगु तालुक्याच्या पालमपेठ या गावात स्थित आहे तसेच वारंगलपासून हे मंदिर 70 किलोमीटर दूरीवर आहे, याची निर्मिती काकतीय वंशज राजा गणपती देव यांच्या कार्यकाळात बाराव्या शतकात म्हणजे 1213 या वर्षी झाली,राजा गणपती देव यांना हे मंदिर उत्कृष्ट दर्जाचे आणि वर्षानुवर्षे टिकेल असे मजबूत बनवायचे होते तेंव्हा मंदिर तयार करण्याची जवाबदारी त्यांचा आर्किटेक्ट #रामप्पा यांच्यावर सोपवली.या मंदिराचे निर्माण कार्य तब्बल 40 वर्ष चालले आणि या सुंदर,देखण्या मंदिराची निर्मिती झाली.800 ते 900 वर्ष लोटूनही हे मंदिर आत्ताही तेवढेच सुंदर आणि मजबूत आहे,मंदिराची कलाकुसर आणि मजबुती पाहून राजा गणपती देव एवढे खुश झाले की मंदिराला देवाचे नाव न देता आर्किटेक्ट रामप्पाचे नाव देऊन टाकले, मी स्थळाला भेट दिली त्यावेळी मंदिराचे नाव रामप्पा असल्याने रामाचेच मंदिर समजून बसलो परंतु मंदिर जेंव्हा पाहिले तेंव्हा धक्काच बसला कारण हे भव्य दिव्य मंदिर बहुजनांचा आदीदेव शंकराचे होते, हे मंदिर एवढे प्रशस्त आहे की ते तब्बल 6 फूट उंचीच्या कमळाच्या फुलाच्या आकाराच्या दगळाच्या मंचकावर उभारले आहे,मंदिराची रुंदी जवळपास 60 फूट चौरस तर उंची 70 फूट आहे.मंदिराच्या बनावटीमध्ये कुठेही सिमेंट,चुना व तत्सम कोणत्याही वस्तूचा वापर केलेला नाही,एक एक दगड 10 ते 15 फूट लांबीचा असून दगळावर दगळ मोठ्या कल्पकतेने बसवला आहे व त्यावर सुंदर असे नक्षीदार काम केलेले आहे.मंदिराच्या वरील भागात स्त्रियांच्या वेगवेगळ्या भावमुद्रेत मुर्त्या कोरलेल्या आहेत ज्या तब्बल सामान्य माणसाच्या आकाराच्या म्हणजे 5 ते 6 फूट उंचीच्या आहेत आणि एक मूर्ती एकाच दगळात कोरण्यात आली आहे हे विशेष,जमिनीपासून या मूर्त्यांची उंची पाहायला गेल्यास त्या जवळपास 30 फुटांवर लावण्यात आल्या आहेत,या अगोदर हन्मंकोंडा येथील थावूजंड पिल्लर टेम्पल(सहस्त्र खांब मंदिर जे 1 हजार दगळांवर निर्माण केलेले आहे) पाहून होतो त्यात आणि यात बरचस साम्य आहे परंतु यावरची कलाकुसर अधिकच सुंदर आणि रेखीव आहे.मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग असून शिवलिंगाच्या पूर्व दिशेला 9 फूट उंचीचा एकाच काळ्या दगळात कोरलेला नंदी आपल्या दृष्टीस पडतो.मंदिराच्या उजव्या बाजूला राजा गणपती देव यांनी मंदिराच्या माहितीची मुद्रा बसवली आहे जी इतिहासाची साक्ष देत आहे.
■900 वर्षांपूर्वी रामप्पाने उपयोगात आणलेल्या दगळाचे अजूनही रहस्य शास्त्रज्ञांना सापडलेले नाही,इतक्या वर्षानंतर अत्यंत मजबूत असलेले हे दगळ कसे व्यवस्थित आहेत याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही प्रयोग केले आणि त्यांना कळून चुकलं की हे दगळ पाण्यावर तरंगतात याचा अर्थ हे दगळ इतर दगळांच्या तुलनेत खूप हलके आहेत,हे दगळ कुठून आले की त्याच ठिकाणी ते तयार करण्यात आले हे आजही एक रहस्य आहे कारण हे दगळ या परिसरात काय जगाच्या कोणत्याच भागात मिळत नाही.या काळात बांधलेली भारतातील बहुतेक मंदिरे आता अवशेषांमध्ये रूपांतरित झाली आहेत, परंतु बर्‍याच नैसर्गिक आपत्तींचा सामना करूनही या प्रसिद्ध मंदिराला फारसा त्रास झालेला नाही. शिवरात्रीच्या वेळी या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी असते तर खूप दुरहून भाविक दर्शनासाठी रीघ लावतात.
@उमेश पारखी

माझी पोष्ट आपणास कशी वाटली? कृपया पसंती द्या.

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी