पाटीलकी

तांदूळ विकून कोंडाखात असतो आम्हीदमडी नसतांनाही“पाटीलकी “दाखवत असतो आम्ही..।।जात बांधवांचेच पायआम्ही सदा खेचत असतोमनुवाद्यांच्या सोबतीनेएकमेकांचीच ठेचत बसतो..।।पस्तीस एकराचे आताआम्ही पाचावर आलोठसणीपायी सर्व काहीव्यर्थ गमवितच गेलो…।।झाले सर्व नष्ट पणठसन काही गेली नाही,देवधर्मावर उधळले सारेपण शिक्षणावर मुलांच्याखर्च कधी केला नाही..।।साडेतिनवाल्यांनी हक्क आमचेखाऊन सारे फस्त केलेशिव्या देण्या दुसऱ्या जातीआमचेच कुणबी धन्य झाले..।।

पाटीलकी Read More »

गेलेले दिवस

अरे जे झालं ते झालंजुनं पुन्हा आठवू नकोसगेलेले दिवस आतापापण्यात तुझ्या साठवू नकोस…. त्या भेटीगाठी तेंव्हाच्याविसावा घेऊ देत नाहीमनात आलं जरी पणजवळ तुझ्या येता येत नाही,मोगऱ्याचं फुल तेंव्हाचंवेड्या आत्ता पाठवू नकोस….गेलेले दिवस आतापापण्यात तुझ्या साठवू नकोस…. तुझ्या प्रेमाची माझ्यानेना कधीही किंमत झालीकाळजातुन बाहेर यायलाना हुंदक्यांची हिम्मत झाली,थरथरणाऱ्या ओठांना माझ्यातुझ्या ओठांनी गोठवू नकोसगेलेले दिवस आतापापण्यात तुझ्या

गेलेले दिवस Read More »

तुझिया शब्दाला

तुझिया शब्दालाविचारितो कोणआपलीच लालसदोदित…..धर्मचिया भाषाअसे मुखावरीकृती विपरीतसंघोट्याची…..दुसरा तो लफंगसदा तुज वाटेस्वतःचे लफडेझाकोनियां…..दुसऱ्याचे विचारकवडीमोल तुजआपलाच हेकाउरावरी……तुझी ठेकेदारीसांभाळ र येळयाहलकट निर्बुद्धभक्तांसाठी….शिकवू नको ज्ञानआम्हास तू लेकावारस आम्हीतुकोबांची…..

तुझिया शब्दाला Read More »

बदल्यात भाकरीच्या

जनता हताश येथे सत्ता मजेत आहे!भलतीकडे पुढारी देशास नेत आहे! चिंतेत कास्तकारी कवटाळणार फांदी,दररोज दोर माझ्या स्वप्नात येत आहे! अन्याय साहतो पण अभिव्यक्त होत नाही,समजू कसा तुझा मी मेंदू सचेत आहे! रानातली अबाधित ठेवा अशीच शांती,निद्रेत “शेर” माझा सद्या गुहेत आहे! लाचारपण कुणाला येऊ नये असेही,बदल्यात भाकरीच्या गाहान शेत आहे! धरणी रुसेल त्यावर गळणार गर्व

बदल्यात भाकरीच्या Read More »

अतृप्त ईच्छा

रिमझीम पावसाची नुकताच सुरुवात झाली होती,विजेच्या प्रकाशाचा नयनरम्य सोहळा आसमंतात उजळून निघत होता,एका विजेच्या कडकडाटाने रवी भानावर आला,लाईट नसल्याने स्वयंपाक करायचे राहून गेले होते,दहा बाय दहा च्या रूममध्ये एकटाच दोन महिण्यागोदर रहायला आला होता,नोकरीनिमित्त बदली झाल्याने घरदार सोडून आपली लहान लहान मुलं आपल्या पत्नीसोबत ठेवून अशा नवीन शहरात तो आला होता,रोज सकाळी दोन वेळचं जेवण

अतृप्त ईच्छा Read More »

मूठभर लोक

मूठभर लोक म्हणजेसारा गाव नसतोचोराने वठवले जरी सोंगतरी तो साव नसतो….चाल गड्या पुढेरस्ता सत्याचा सोडू नकोवाईटाच्या संगतीनेभविष्य तुझे पोळू नकोनको संग असंगाशीखोट्याला जगी वाव नसतो…..ठेचा लागतील कितीहीमागे फिरून पाहू नकोध्येय सोडून आपलेअसत्याकडे जाऊ नकोमाणसा माणसात तंटेनेहमीच त्यांचा डाव असतो….चोराने वठवले जरी सोंगतरी तो साव नसतो….

मूठभर लोक Read More »

पावसाची धुंद सर

पावसाची धुंद सरअन तुझी आठवणथेंबा थेंबाने झिरपणारेतुझ्यासोबतचे ते क्षण….हवेत उडणाऱ्या तुझ्या मऊकेसातून अलगद हात फेरावाआणि चिंब व्हावे मन,फुलांवर अळखळलेल्या थेंबातहीतुझा चेहरा दिसावादेहभान विसरून तृप्त व्हावे तन………बसावे न्याहाळत निखळ सौन्दर्यअविरत संततधार………..आसक्तीचा थेंबही नसावातुझे सौन्दर्य न्याहाळताना………असावं प्रेम वासनाविरहितशुद्ध झऱ्यासारखंनिर्माण होऊ नये मनातआसक्तीचा,वासनेचाकाळाकुट्ट व्रण….कलुषित होऊ नये तन…मन

पावसाची धुंद सर Read More »

अस्पृश्य…

ज्यावेळेला महारांनाविहिरीवर लोकं पाणी भरायलाअर्धीच विहीर द्यायचे,त्यांच्या सावलीलाही विटाळ मानायचेत्यांच्या कपातला चहापण नाही प्यायचेअगदी त्याचवेळेला माझ्या घरातल्या चुलीपर्यंतही महारांची पोरं बिनधास्त फिरायची,सोबत जेवायची,सोबत खेळायचीमहारांच्या लग्नात आमचे कुनबी जायचे नाहीमला आठवतं…एका महाराच्या मुलीच्या लग्नाचं जेवणयांच्यासाठी आमच्या घरी ठेवलं होतंअन अख्खा गाव जेवला होता…गावातल्या मुसलमानाच्या घरीमी नेहमीच शिरखुरमा खायचोते माझ्या जिवलग मित्राचं घर होतंदोस्त म्हणून माझ्या घरी

अस्पृश्य… Read More »

तू दिसलीस बऱ्याच दिवसांनी

तू दिसलीस बऱ्याचदिवसांनीनजर तीच,नजरेला नजर मिळताचचेहऱ्यावर आलेलंस्मितहास्यही तेच होतंअन्गालावर पडणारी खडीहीअगदी तीच होती….अलगद तुझ्या डोळ्यांच्यापापण्यात आलेलाआसवाचा थेंब….कदाचित बोलायचं होतंतुला माझ्यासवे..मुक्तपणे….पण तुझ्या ओठांनीबोलण्याची परवानगीचनाकारली तुला…मला तर परवानगीनव्हतीच कधी…..

तू दिसलीस बऱ्याच दिवसांनी Read More »

पोटातली भूक,पोटात मारली….

बापानं खस्ता खाल्ल्यापोराले शिकवासाठीएका फाटक्या बन्यानवरआयुष्य काढलं…पोरगं शाळेत गेलंशाळेचा सर्व खर्चउचलासाठी बापानंपोटातली भूक,पोटात मारली….पोराकडून लईच आशाठेवून होता बाप….पोरगं बी लई शिकलंशिकून खूप मोठ्ठं झालंपेपरात मोठ्ठ नाव आलंशिकलेली बायको केलीबापासाठी नातवं आली…आता घराच्या एका कोपऱ्यातदहा फुटांवरून ढकललेल्याताटात जेवन करत तो बापगावभर सांगतोमाझा पोरगामाझा मान राखतो आहे……अन्लोकांना दिसू नये म्हणून तो बापती फाटलेली बन्यानफाटक्या धोतरानं झाकतो आहे….

पोटातली भूक,पोटात मारली…. Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी