काव्य

लक्ष्मणाच्या उर्मिलेसारखे

तुझ्या निखळ हास्यावर लिहू कीतुझ्या गोड स्वभावावर लिहू,तुझ्या कोमल चेहऱ्यावर लिहू कीतुझ्या आत अनंत यातना लपवून ठेवलेल्यातुझ्या हृदयावर लिहू,माझ्याकडे ती पेनच नाही कीतुझ्या अंतर्मनाचा ठाव घेईलआणिमाझ्या मनातली शाई एका कागदावर रीती होईलएका अर्थी बरच झालं!तू असतीस सोबतीला तर पडक्या झोपडीत,अन,कौलारू घराच्या छपरातून गळणाऱ्या पाण्यात,एकाच खाटेवर छत्रीचा आडोसा घेऊनकसे दिवस काढले असतीस,खाटेच्या एका पायाला बकरी बांधलेली […]

लक्ष्मणाच्या उर्मिलेसारखे Read More »

विझून जाईन जरी

विझून जाईन जरीमी एकाच रातीतून,पेटेन उद्या नव्यानेमिणमिणत्या वातीतून….तप्त ज्वाला सोसल्या,घाव झाले कितीदा,भडभडत्या जखमेतून,रक्त वाहिले कितीदा,अंकुरेन उद्या नव्यानेयाच मातीतून…..विझून जाईन जरीमी एकाच रातीतून….छाटले ते पंख माझे,दगा भेटला कितीदा,दगाबाज विश्वासाने,जीव घेतला कितीदा,मुक्त होईन ना मी,बरबटलेल्या जातीतून….विझून जाईन जरीमी एकाच रातीतून….

विझून जाईन जरी Read More »

सौन्दर्य चिरकालीन नसतं

सौन्दर्य चिरकालीन नसतं,तसं …तारुण्य देखील चिरकालीन नसतं.सौन्दर्याचा साज आणि वयाचा माजउतरला,की जाणीव होत असते प्रत्येकाला!आठवते प्रत्येकाला,आपण भूतकाळात कसे वागलो ते…..सौन्दर्य अन् तारुण्याच्या गर्वानेदूर सारलेली माणसे,उतरत्या वयात वाटतात हवीशी,तेंव्हा नसतात कोणीही अवतीभवतीज्यांना म्हणू शकू आपली.आणि पश्चातापात जळायला लागतंते सौन्दर्य आणि तारुण्य….वयानुसार उमटतात सुरकुत्याचेहऱ्यावर, अन्ओझही वाढतं जवाबदाऱ्यांचं!तेंव्हा सारीच मस्तीअसते विझलेली……

सौन्दर्य चिरकालीन नसतं Read More »

तू म्हणाली

तू म्हणालीपुन्हा कधी येतोसमी म्हणालोभरवसा नाही..तू म्हणालीस एकदामाझ्या जगातपरत येऊ नकोसमी कधीच आलो नाहीतू न बोलवताहीमला यावं लागलंमाझं मलाच समजलं नाहीपुन्हा कधी येतोसविचारलस!मी उमजलो नाहीमी एवढच समजून चुकलोहृदयाच्या एका कोपऱ्यातमाझा एक कप्पाअजून शिल्लक आहे…..

तू म्हणाली Read More »

राग कुणाचा धरू कशाला

राग कुणाचा धरू कशालाद्वेष कुणाचा करू कशालाचार दिवसाचे जगणे इथलेदुखवून सर्वांना मरू कशाला.. जमले नाही जे करावया गेलोअपेक्षांचे भार वहावया गेलोज्यांची आस नव्हती कधीहीस्वप्न का मी ते पहावया गेलो.. मनासारखे का कुठे घडते येथेजखम बसलेली चिघळते येथेतप्त तव्यावर रोजच आतामेनासम आयुष्य वितळते येथे.. कोणी कुणाचा जगी होत नसतोजीव कुणासाठी कोणी देत नसतोमाझ्यावाचून कुणाचे का अडले

राग कुणाचा धरू कशाला Read More »

फुललेला मोगरा

माझ्याकडे पाहून…..तुझ्या दारावरफुललेला मोगरामला डीवचतकिती हसतोयहर्षाने….!मी म्हणालोमस्त हसून घे बेटाकधीकाळीमला हसविणारी तीआज तुझ्या सोबतीला आहेती जिकडे असतेतिकडेआनंदी आनंदच असतो गड्या….

फुललेला मोगरा Read More »

नातं तुझं नि माझं

Free woman walking on railway

नातं तुझं नि माझंऊन पावसाचा खेळ,तुझ्या मिठीत येण्यानाही मिळत सवड!प्रश्न भाकरीचा येतोजातो शोधण्यात वेळ,बसेना तुझ्यासाठीकसलाच ताळमेळ!वेदना कुणा सांगूतू नसता जवळ,दुःखी मनाची होईनेहमीच जळजळ!ये मिठीत सखयेनको सावळा गोंधळ,मुक्त जगून घेऊथोडा उरलेला वेळ!

नातं तुझं नि माझं Read More »

तुझ्या कुशीत…

तुझ्या कुशीत मी शांत विसावतोअन तुझ्या मुलायम केसातुनहळूच हात फिरवतोतेंव्हा तू घट्ट मिटून घेतेस डोळे….माझ्या छातीवर जेंव्हाडोकं असतं तुझं निर्विकारपणेतेंव्हा असंख्य प्रश्न सुटलेले असताततुझ्या मनातले…तूही स्तब्ध अन् मीही स्तब्धचदोघांच्या मनात बोलायचं असतंबरच काही….सोडवायची असतात असंख्य कोडीअसंख्य प्रश्नेही….पण ओठांवर कधी ती येतच नाहीत..काय यालाच तर प्रेम म्हणत नाही?दूर असलो की तुझी आठवण का येतेहाच तर मोठा

तुझ्या कुशीत… Read More »

तुझ्याशिवाय….

ना तू धोका दिलासना मी धोकेबाज होतोतू नाकारलसतोच माझ्या आयुष्याचाटर्निंग पॉईंट ठरला…माझ्यासमोर तेंव्हादोनच पर्याय होते,दोनच प्रश्न होते…..प्रेम की पोट ?मी पोट निवडलंअन् त्याचवेळीपोटासाठी पायपीट करण्यासमी कायमचा मोकळा झालो….तुझ्याशिवाय….

तुझ्याशिवाय…. Read More »

प्रेम असावं..

प्रेम असावं निरपेक्ष,आभाळासारखं निरभ्र….जीव ओतून केलेलं…निर्मळ आणि शूभ्र….मावळत्या सूर्यासारखी ऊबदारअसावी,सोबतीची जाणीव….सगळे आसपास असले…तरी…भासावी एक उणीव…सागरासारखा अथांग असावा विश्वास…..एक दुसऱ्यासाठीचघ्यावा आयुष्याचा प्रत्येक श्वास….हातातून वाळूसारखे निसटून जातात कण…आयुष्यात अस्तव्यस्त,तुझ्या असण्याचे क्षण,का? कुठे, सलते तुझी एक एक आठवण…….

प्रेम असावं.. Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी