काव्य

ती….

woman holding pink petaled flower

कोणीही आजारी असलं की तीसतत दवाखान्यात चोवीस तासबसायची काळजी घेत….ती नेहमी म्हणायचीमाझ्या डोक्यावर पाय देऊनतू आलासउष्ट दूध प्यायला आईचं…ती भांडली,बोलली वा शिव्याहीदिल्या असतील तिनेअन् निघूनही गेली गळबळीतन सांगताचकायमची….राख्या दिसतात बाजारातभावांच्या हातांवरत्यांच्या बहिणींनी बांधलेल्याआतारिकामाच असतो माझा हातपोरका,अनाथ…..

ती…. Read More »

काय असतं प्रेम

काय असतं प्रेमदूर असून कायम हुरहूर असते हृदयातते असतं प्रेम……ती जवळ नसतानाही तीच मनात घुटमळतेते असतं प्रेम……कोणत्याही अपेक्षेशिवाय तिच्यासाठीडोळ्यात असतात अश्रूते असतं प्रेम…….हक्काने तिच्या कुशीत विसावता येतेते असतं प्रेम……..तिच्यासाठी तिच्या दुःखासाठीहीमनात होतात वेदनाते असतं प्रेम…….आकर्षण,वासना,स्वार्थावरत्यागाने मिळविलेला विजयम्हणजेच असतं प्रेम……

काय असतं प्रेम Read More »

माणूस

आपलं कुणीतरी असावंआपण कुणासाठी तरी असावंकोणीतरी आठवण काढावी आपलीआपल्या आठवणीत कोणीतरी असावं….जगताना थोड्या आयुष्यातथोडं दुसऱ्यांसाठी झटावंआपल्या हृदयानेही एखाद्यासाठीतीळ तीळ तुटावं…..कधी जगून पहा असं कीसगळे हळहळले पाहिजेतुझ्या हृदयातून माझ्यासाठीरक्त भळभळले पाहिजे….चार दिवसाची जिंदगी हीकाय कुणावर रुसावंअंधार जाऊन उजेड येतोचमग उगाच का रडत बसावं..….

माणूस Read More »

मुलगी होऊन जा…….

ती आज पहिल्यांदातीचं घर सोडत होतीआई,वडील,भाऊसगळ्यांनाच सोडूननव्या घराचा उंबरठाओलांडत होती… खांद्यावर डोकं ठेवूनहमसून हमसून रडत होतीआईचा हुंदका दाटत होताबापाच्या डोळ्यातले अश्रूडोळ्यात होतेतो तिच्या डोळ्यातले शेवटचेअश्रू पुसत होता…. सासू सासऱ्यांकडे बोट दाखवतबापाने तिलाएकच सांगितलंआता तेच तुझे माय बापत्यांचा सांभाळ करप्रत्येक सुखतुझ्या पायाशी लोळण घेईल……. सून तर कोणीही होईलत्यांच्या आयुष्यातत्यांची मुलगी होऊन जा……..

मुलगी होऊन जा……. Read More »

तिथे बुद्ध असला काय….

post-column-01-10

तिथे बुद्ध असला कायविठ्ठल असला कायअन् मस्जिदेच्या खालीमंदिर असले काय…!काय फरक पडतो ?बुद्ध म्हणले होते एकदाहिंसा नको,खोटं नको,चोरी नको,व्यभिचार नको अन दारूत तरअजिबात झिंगुच नकोस….काय म्हणता असे म्हणले होते बुद्ध?हे तर “कलियुगात” हाय न राव?कुठे असतो अशा गोष्टींना भाव!या गोष्टीवरच चालते राजकारण,चालतो रोजीरोटीचा प्रश्न,विठ्ठल तोच आहे,बुद्ध तोच आहेअल्हा अन मसिहाही तोच आहेकाय विचार करतोस?घे टिकास,

तिथे बुद्ध असला काय…. Read More »

मी विठ्ठल पुजावा

मी विठ्ठल पुजावाकी बुद्धहे ठरवत असतो मीचमला तसे दोन्ही सारखेच वाटतातमंदिर,मस्जिद,गुरुद्वाराचर्च, बुद्धविहारया ठिकाणी मी जात नाही कधीचअहं मला फरक नसतो पडतकारण,बुद्धाचे पंचशील, विठ्ठलाची करुणाअल्लाह,येशूच्या गुणांचा लवलेशहीनाही माझ्यात…माझी पूजाअर्चा हा असतो ढोंगीपणा,मी बोलत असतो एक,वागत असतो एकश्रद्धेच्या बुरख्याआड मारत असतो मेखआता मी ही जगतोय तसाच ढोंग घेऊनतुमच्यासारखा…हो तुमच्यासारखाच….कपाडावर शेंदूर फासून….

मी विठ्ठल पुजावा Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी