कथा

गोष्ट हिप्नॉटीजमची

▪️मी ज्यावेळेला राजस्थानमध्ये नोकरिनिमित्याने होतो त्यावेळेस माझा मित्र म्हणाला की यार भिलवाड्यामध्ये एक जोतिष्य राहतात जे तंतोतंत भविष्य सांगतात,चल एकदा त्याच्याकडे जाऊन येऊ! अर्थातच भविष्य,भोगसाधु,भोंदूबाबा असल्या लोकांवर विश्वास नसल्याने मी त्याला स्पष्ट नकार दिला. पण मित्र अधिकच विनंती करू लागला की खरं खोटं नंतर बघू पण एकदा जाऊन तर येऊ,तो काय सांगतो किंवा तो काय […]

गोष्ट हिप्नॉटीजमची Read More »

तुझ्या जन्माची गोष्ट

●तुझ्या जन्माची बातमी गौतमने कम्पणीच्या गेटवर दिली तेंव्हा पाठीवर पन्नास किलोची युरियाची बॅग होती,आधी एक मुलगी आणि तू दुसरा मुलगा म्हटल्यावर जो नैसर्गिक आनंद माणसाला होतो तोच आनंद मला झाला होता,पती खांद्यावरची बॅग अलगद खाली ठेवली आणि सायकल एवढी दापटली की दोन किलोमीटरचे अंतर केवळ पाच मिनिटात पार केले,तुझा जन्म झाला तेंव्हा सकाळचे आठ वाजून

तुझ्या जन्माची गोष्ट Read More »

वय वर्ष पंचेचाळीस!

■आज मी हे जे काही लिहितोय ते मला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी कंटाळा आला तरी पूर्ण वाचावे ही माझी विनंती आहे.आयुष्यात दुःख नसतं तर सुखाची किंमत कळली नसती अन माणसाच्या आयुष्यात नाती नसती तर रुक्ष आयुष्यात प्रेमाचा गोळवा कधीच निर्माण झाला नसता.आयुष्यातून एक एक दिवस वजा होताना जो दिवस आपण मोठ्या आनंदात साजरा करतो तो

वय वर्ष पंचेचाळीस! Read More »

माह्या लग्नाची गोष्ट

लग्न झालं त्यावेळी माझ्याकडं कवडीची अक्कल नोयती,माह्या वयाच्या एकविसव्या वर्षीच माय बापानं पोरगं जास्त वयाचं झालं त बिघडून जाईन म्हणून लग्न उरकून टाकाचं ठरवलं,त्याले कारण बी तसच होतं,बारावी पास होऊन बीएच्या फस्ट यिअरले शिकत होतो,सोबत त्यावेळी फ्लॉपी डिस्कवाल्या कम्प्युटरचा जमाना होता,नुसत्या कमांडवर कम्प्युटर चालवा लागाचं,तो बी कोर्स सातोसात निपटवत होतो तर लग्न उरकवाचं कारण हे

माह्या लग्नाची गोष्ट Read More »

गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात…

1 जून 1998 इतर मित्र,मैत्रिणी यांच्या तुलनेत माझं लग्न फार लवकर झालं,म्हणजे वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी माझा ढोल वाजला! आम्ही दोघेही जवळपास एकाच वयाचे आहोत,ती दहावीला होती तेंव्हा मीही दहाविलाच होतो,जेमतेम काही महिन्यांचा दोघात फरक असेल.माणसाच्या तुलनेत निसर्गतः समजून घेण्याची वृत्ती म्हणा किंवा सामंजस्यपणा हा स्त्रियांत अधिक असतो,कमी वयात त्या प्रौढ विचारांच्या होऊन जातात,घरची

गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात… Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी