# ParkhiArts ## Posts - [आपण मत कसे बनवतो](https://parkhiarts.in/article/52/): एक वेळ अशी येते की काही माणसांना,काही प्रवृत्तींना आयुष्यातून कायमचे हद्दपार करायचे असते,आपणास वापरून अलगद बाजूला करणारी,ज्या गोष्टीचा काही एक संबंध नसताना उगीच आपल्या खाजगी आयुष्यात डोकावणारी,आपल्या समोर गोड बोलून पाठीमागे आपली निंदा करणारी,स्वतःला प्रसिद्धी मिळविण्यासाठी समोरच्याला बदनाम करणारी अशी माणसे अशा वृत्ती वेळीच ओळखून आपल्या तोंडातून एक अवाक्षरही न काढता बाजूला केल्या पाहिजेत! बऱ्याचदा […] - [गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात...](https://parkhiarts.in/story/53/): 1 जून 1998 इतर मित्र,मैत्रिणी यांच्या तुलनेत माझं लग्न फार लवकर झालं,म्हणजे वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी माझा ढोल वाजला! आम्ही दोघेही जवळपास एकाच वयाचे आहोत,ती दहावीला होती तेंव्हा मीही दहाविलाच होतो,जेमतेम काही महिन्यांचा दोघात फरक असेल.माणसाच्या तुलनेत निसर्गतः समजून घेण्याची वृत्ती म्हणा किंवा सामंजस्यपणा हा स्त्रियांत अधिक असतो,कमी वयात त्या प्रौढ विचारांच्या होऊन जातात,घरची […] - [नांदगाव - मनातल्या नोंदी](https://parkhiarts.in/article/7678/): मनातल्या कप्प्यातून... - [जगण्याचं मॅनेजमेंट](https://parkhiarts.in/article/7665/): जगण्याचं मॅनेजमेंट - [झुंडी...](https://parkhiarts.in/article/7502/): FB3 - [प्रचार खोट्यास खपवी बाजारी..](https://parkhiarts.in/%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%a8/7498/): FB2 - [नक्की चूक कोणाची?](https://parkhiarts.in/%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%a8/7492/): FB 1 - [मनी नाही भाव...](https://parkhiarts.in/article/7437/): लै लोकं मला आवर्जून प्रश्न करतात की मी स्टेटसवर देवांचे फोटो वा व्हिडीओ का लावत नाही,उत्तर साधं आहे-देवाकडे मोबाईल नावाची गोष्ट असेल असे मला वाटत नाही त्यामुळे ते माझं स्टेटस पाहायला यायची शक्यता नाही आणि मी किती मोठा भक्त आहे हे मला लोकांना दाखवायचीही काही गरज नाही,प्रभूची लेकरे सारी असं जेंव्हा आम्ही म्हणतो तेंव्हा तो प्रभू माझं काही वाईट करेल असे मला अजिबात वाटत नाही कारण मी त्याचं लेकरू आहे आणि लेकरांचे वाईट करणारा जर देव असेल तर तो देव कसला,देवाचे स्टेटस लावून लोकांनां दाखवून जर माझ्यातले दुर्गुण संपले असते तर मी ही स्टेटस लावत बसलो असतो पण तसे होत […] - [झुटोंने झूटोंसे कहा..](https://parkhiarts.in/article/6642/): झूटोने झूटोसे कहा... सच बोलो... सरकारी ऐलान हूआ है... सच बोलो.. घरमे  झूटकी मंडी लगी हुई है... दरवाजेपर लिखा है,...सच बोलो... - [तो कृष्ण](https://parkhiarts.in/poem/6535/): तो एक माणूस होताअन्यायाला वाचा फोडणाराकपोल्पल्पित कथात्याच्या माथ्यावर पेरल्याइथल्या प्रस्थापित शेंडीधाऱ्यांनी!बदनामी तंत्र वापरूननेस्तनाबूत केलात्याचा उज्वल इतिहासमाणूस पचला नाही तरसुरू होते त्याची बदनामीअथवा सुरू होते त्याचेदैवीकरण…शेतकरी,सामान्यांचा राजाद्रोउपदीची इज्जत राखणारातो कृष्णगाडल्या गेला कायमचापरशुरामाच्याएका कुऱ्हाडीने….. - [शब्दांचे इमले](https://parkhiarts.in/poem/6531/): शब्दांचे इमलेबांधणाऱ्यांनो माझा सलामतुमचे शब्दना सड्याला कामी येतना सारवणाला…आक्रोश,आक्रन्ददया,करुणा,विद्रोहफक्त कागदावरच..!एका बॉटलमध्येप्रस्थावना लिहिणारेअतीव दुःख मांडतातआपल्या लेखणीतून….दिनदुबळ्यांसाठी एकरुपयाही खिशातून बाहेरपडत नाही कीअन्यायाविरोधात चारभिंतीच्या बाहेरहीकधी पडत नाहीत तुमचे पाय…व्यस्थ असतात सदाआपलीच स्तुती करण्यातअन मारीत बसतातकागदी तिर आपल्याचमाणसांवर…..हे कागदी वाघ…. - [बाबासाहेब](https://parkhiarts.in/poem/6526/): तुम्ही आमच्यासाठी काय केलंहे आज विचारू नकाआमच्या मनात आत्ताही तुमचा तिरस्कारओतपोत भरलेला आहे!आमच्या मनाच्या कोपऱ्यातून तुमची जातकधी नष्ट होऊ देणार नाहीअशी व्यवस्थाच निर्माण करण्यात“ते” यशस्वी होताहेत…या व्यवस्थेला जेवढे “ते”तेवढेच आम्ही स्वतःलातुमचे सैनिक म्हणवून घेणारेही जवाबदार आहोततुमच्या नावाचा वापर आणितुमचा फोटो कुठे वापरायचा याचे कसब“ते” शिकतांनाचआम्ही सैनिकांनीही शिकून घेतलेतुमच्या विचारांशी आज काय देणं घेणंतुमच्या नावावर आम्हाला सत्ता गाजवता येतेतर सैनिकांना सत्तेचे पाय चाटता येतातस्वतःचे रिकामे पोट भरण्याचा आनंद घेता येतो…तुम्ही किती झटलात हे सांगण्यासाठीकुठेतरी एक निखारा पेटतांना दिसतोतर तुमची मूर्ती फोडताना असंख्य शूद्र दिसतात….तुम्ही फक्त विहारापूरते आणि केवळ जयंतीपुरतेशिल्लक राहणार का असा भाबडा प्रश्न पडतोकारणआम्ही कधीकाळी शूद्र होतो हे विसरलोय तुमच्यामुळंआणितुमच्या […] - [काय सर तुम्ही ?](https://parkhiarts.in/poem/6520/): काय सर तुम्ही ?चमचा सोडून हाताने जेवताहातहो काय झालंकाही स्टेटस वैगेरे आहे की नाहीकसलं स्टेटसबाजूला बघा प्रत्येक जणचमच्याने जेवतोयमगतुम्ही असे कसे गावंढळमाझा चेहरा पडला नाहीकी वाईटही वाटलं नाहीतिला जवळ बोलावलंबघ लहानपणी माझी आईहातानेच जेवू चारायचीलहानपणापासून मी सुद्धाहातानेच जेवायला शिकलोचमच्याने घेतलेल्या घासानेआजही माझं पोट भरत नाहीकारण जगातल्या कोणत्याही चमच्यानेआईच्या हाताची बरोबरी केली नाहीज्या चमच्याने माझ्या मायेचीकधी बरोबरी केली नाही तो चमचातिच्या पोराची बरोबरी करेल का?तूच सांग! - [ठरवायचं असतं प्रत्येकानं](https://parkhiarts.in/poem/6515/): हाताच्या रेषेत भविष्य असतंकी कपाळावरच्या रेषेत ते दिसतंकी घामाच्या थेंबात ते वसतंहे ठरवायचं असतं प्रत्येकानंसमोरच्या माणसावरविश्वास ठेवण्यागोदरचिकित्सा आणि तर्कअसतो करायचाअन समोरचा काय म्हणतोयते खरं कि खोटं हे हीबघायचं असतं तपासूनखोटी गोष्ट दहा वेळाओरडून सांगितली कीती सर्वांनाच खरी वाटायला लागतेअन खऱ्याच्या प्रकाशाला लागतंखोट्याचं ग्रहण…सत्याला मरण नसतं तरखोट्याला शेवटी सरण असतंहिशोब प्रत्येकाचा होत असतोमाझा,तुझा,खऱ्याचा,खोट्याचाभविष्याच्या अथांग सागरात…… - [देह नश्वर आहे](https://parkhiarts.in/poem/6511/): देह नश्वर आहेतो नष्ट होणेच आहेआज तू, उद्या मीनक्कीच मरणार आहेआज तू बिमार आहेसमी ही नेहमीच बिमार पडतोडॉक्टरांकडे गेल्याशिवायदोघेही बरे होत नाहीसंकटे तुझ्यावरही येतातमाझ्यावरही आलीच होतीतू खूप पूजा केलीसआणि मी केली नाहीम्हणून माझी संकटे वाढलीअन तुझी संकटे कमी झालीअसे कधी झाले नाहीदेवदैवाचा बाजारमनाच्या भीतीने वाढतोकर्मावर ज्याचा विश्वासतो दैव नव्हेतर कर्माच्या नितीवर चालतोगहू पेरला तर तांदूळ उगवत नाहीहातून कार्य चांगले घडले नाही तरत्याचे परिणाम चांगले येत नाहीशेवटी तू कृष्ण म्हण की राम म्हणसाई म्हण की श्याम म्हणवाईट कामाचे चांगले फळ येत नाहीतू पूज दगळाला की घाल लोटांगणवाईटाला चांगलं खाटल्यावर अन्नकोणताही देव देत नाही….. - [मी खोटे बोलेन](https://parkhiarts.in/poem/6506/): मी खोटे बोलेन,तुझ्याशी,त्याच्याशी..मी बोलेन वाईटतुझ्याविषयी,सर्वांविषयी..मी करेन चुगल्यातुझ्या,सर्वांच्या..तुझ्या,तुमच्या पाठीमागे..!!मी स्वतःशीबोलू शकेन का खोटेवागेन का खोटेअनस्वतःचीच करेन काखोटी स्तुती……माझी चूक,माझा नालायकपणामाझा नीचपणामला स्वतःलाचआवडत नाही…. - [मी वाहतो कुठेही….](https://parkhiarts.in/poem/6501/): तुजसारखा नाही जरीजीव लावतो कुठेहीदुर्गुण असेना कितीहीपण धावतो कुठेही…द्वि भूमिकेत कधीहीवावरने जमले नाहीखोट्याला कधीहीसावरणे जमले नाहीझरा क्षुलक नाल्याचामी वाहतो कुठेही….आरशासम जगणे हेलपवणे जमले नाहीखोट्या विश्वात स्वतःलारमवणे जमले नाहीकर नित्य सभ्य कामेतो पावतो कुठेही….. - [दोस्ता](https://parkhiarts.in/poem/6493/): दोस्ताहो तुझ्यात आणि माझ्यातफरक आहेच,मी हाफ प्यांट वर पैदलशाळेत निघायचोतू फुल ड्रेसमध्ये कॉन्व्हेंट मध्येरिक्षाने जायचासजातांना मम्मी पप्पांनाबाय म्हनायचासतेव्हा माझी आई शर्टाचीतुटलेली गुंडी शिवून देत असायचीअन बाप आकाशाकडंएकटक बघत असायचा…तू जेव्हा नव्या कोऱ्या सायकलनेफुल प्यांटातकॉन्व्हेंट मध्ये जायला लागलासमी मात्र शाळेत ताराची थैली घेऊनतसाच पैदल जायचो…….माझ्याकडे सायकल आलीतेव्हा तूदुचाकीवर स्वार झालेला दिसलासमी कोस दरकोस सायकलचालवून शाळेत यायचो तेव्हातूला लपूनसिगारेट ओढतांना पहायचोतू आजही जीवनातलेशौक पूर्ण करतोयस!मला माहीत नाहीतू किती उंचीवर गेलास…पणमला अभिमान आहेमी कुडाच्या भिंतीआडगरिबीचा दिवा घेऊनजिंदगीतला उजेड शोधण्यातयशस्वी झालो…. - [धर्म](https://parkhiarts.in/article/6476/): धर्म हा विषय खूप किचकट मुद्दा आहे!कोणताही धर्म वाईट नसतो धर्माला वाईट करतात ती त्या धर्मातील लोकं,धर्म कितीही चांगला असला तरी धर्माचे अनुसरण करणारे कसे आहेत त्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात,अल्लाहला मानणाऱ्या मुसलमानातील एखादा मुसलमान हा आतंकवादी निघाला की त्या धर्मालाच आतंकवादी धर्म ठरवून आम्ही मोकळे होतो,पण त्याच धर्मातील सच्चा मुस्लिम आम्हाला दिसत नाही,आतंकवादी त्याच धर्मात पैदा होतात का तर नाही,आतंकवादी हिंदुमध्येही असतात,पण आपला आतंकवादी निघाला की आपण बचावात्मक पवित्रा घेतो,आपलं झाकण्याचा आपण प्रयत्न करीत असतो,धर्म आणि धर्माच्या ग्रंथाचे अनुसरण ढोबळ मानाने आपण किती जण करतो तर संख्या अतिशय नगण्य! मंदिरात जाऊन देवाच्या पाया लागणे म्हणजे धर्म का?मस्जिदमध्ये जाऊन […] - [दुःखात आनंद](https://parkhiarts.in/poem/5970/): दुःखात आनंदआनंदात दुःखसंसार अश्रूंचामहा पूर…खोट्याने मारलेसत्याने तारलेदुतोंडी जगणेकामी नाही….खोट्याची महिमाचमकते खोटीसत्याला मरणनाही जगी…माणूस कोणतानसतो वाईटचुकांची गणनामाणसाची….सत्याशी तो संगअसत्याशी असंगहाच माझा रंगसदोदित…. - [कामगार](https://parkhiarts.in/article/5968/): ■कामगार एक असा माणूस जो एका साखळीत काम करणारा,आपल्या वर असणाऱ्या अधिकाऱ्याचा आदेश मानणारा,एखाद्याची नोकरी करणारा हा प्रत्येक माणूस एक कामगार असतो मग तो एखाद्या साध्या दुकानातला नोकर असू द्या की एखाद्या कंपनीत मॅनेजर पोष्टवर बसणारा एखादा व्यक्ती असू द्या,जो आपल्या मालकाचा आदेश पाळतो तो म्हणजेच नोकर किंवा कामगार!आज डोळे उघडे ठेवून विचार करा वेळ भयंकर येणार आहे तत्त्वता आलेली सुद्धा आहे.कोरोना सारखे सुलतानी संकट अचानकपणे येऊन पडल्याने कित्येक कंपन्या डुबण्याच्या मार्गावर आहेत,अक्षरशः कार्पोरेट कंपन्यांचे कंबरडे मोडल्यात जमा आहेत,त्याचबरोबर मोठ्या कंपन्यांवर अवलंबून असणारे छोटे उद्योग सुद्धा डबघाईस आलेले आहेत,कोणत्याही कंपन्यांचा ताडेबंद आजच्या घडीला सैरावैरा झालेला असून या गोष्टीचा सरळ दुष्परिणाम […] - [तू दुधावरची साय](https://parkhiarts.in/poem/5966/): तू दुधावरची सायमी करपलेली भाकरमी फुटलेलं दूध अनतू मधातली साखर…तू बहरलेला चाफामी बाभळीचा काटादुपारच्या उन्हामध्येनको चालू रानवाटा…नभ दाटले आकाशीमी बेधुंद जसा वाराआयुष्यात माझ्या तूजशा विरणाऱ्या गारा…. - [पाटीलकी](https://parkhiarts.in/poem/5964/): तांदूळ विकून कोंडाखात असतो आम्हीदमडी नसतांनाही“पाटीलकी “दाखवत असतो आम्ही..।।जात बांधवांचेच पायआम्ही सदा खेचत असतोमनुवाद्यांच्या सोबतीनेएकमेकांचीच ठेचत बसतो..।।पस्तीस एकराचे आताआम्ही पाचावर आलोठसणीपायी सर्व काहीव्यर्थ गमवितच गेलो…।।झाले सर्व नष्ट पणठसन काही गेली नाही,देवधर्मावर उधळले सारेपण शिक्षणावर मुलांच्याखर्च कधी केला नाही..।।साडेतिनवाल्यांनी हक्क आमचेखाऊन सारे फस्त केलेशिव्या देण्या दुसऱ्या जातीआमचेच कुणबी धन्य झाले..।। - [गेलेले दिवस](https://parkhiarts.in/poem/5962/): अरे जे झालं ते झालंजुनं पुन्हा आठवू नकोसगेलेले दिवस आतापापण्यात तुझ्या साठवू नकोस…. त्या भेटीगाठी तेंव्हाच्याविसावा घेऊ देत नाहीमनात आलं जरी पणजवळ तुझ्या येता येत नाही,मोगऱ्याचं फुल तेंव्हाचंवेड्या आत्ता पाठवू नकोस….गेलेले दिवस आतापापण्यात तुझ्या साठवू नकोस…. तुझ्या प्रेमाची माझ्यानेना कधीही किंमत झालीकाळजातुन बाहेर यायलाना हुंदक्यांची हिम्मत झाली,थरथरणाऱ्या ओठांना माझ्यातुझ्या ओठांनी गोठवू नकोसगेलेले दिवस आतापापण्यात तुझ्या साठवू नकोस…. तू आलास दारावरतीनजरेला नजर थेट झालीओळख न दाखविताहीतुटलेल्या मनांची भेट झाली,काळजावर दगड ठेवून आताउरलेल्या भावनांना पेटवू नकोगेलेले दिवस आतापापण्यात तुझ्या साठवू नकोस…. - [तुझिया शब्दाला](https://parkhiarts.in/poem/5833/): तुझिया शब्दालाविचारितो कोणआपलीच लालसदोदित…..धर्मचिया भाषाअसे मुखावरीकृती विपरीतसंघोट्याची…..दुसरा तो लफंगसदा तुज वाटेस्वतःचे लफडेझाकोनियां…..दुसऱ्याचे विचारकवडीमोल तुजआपलाच हेकाउरावरी……तुझी ठेकेदारीसांभाळ र येळयाहलकट निर्बुद्धभक्तांसाठी….शिकवू नको ज्ञानआम्हास तू लेकावारस आम्हीतुकोबांची….. - [बदल्यात भाकरीच्या](https://parkhiarts.in/ramesh_burbure/ramesh_poem/5712/): जनता हताश येथे सत्ता मजेत आहे!भलतीकडे पुढारी देशास नेत आहे! चिंतेत कास्तकारी कवटाळणार फांदी,दररोज दोर माझ्या स्वप्नात येत आहे! अन्याय साहतो पण अभिव्यक्त होत नाही,समजू कसा तुझा मी मेंदू सचेत आहे! रानातली अबाधित ठेवा अशीच शांती,निद्रेत “शेर” माझा सद्या गुहेत आहे! लाचारपण कुणाला येऊ नये असेही,बदल्यात भाकरीच्या गाहान शेत आहे! धरणी रुसेल त्यावर गळणार गर्व त्याचा,पडणार पृष्ठभागी जोही हवेत आहे! माझ्याजवळ कधीही येणार दुःख नाही,मी मायच्या-पित्याच्या जोवर कवेत आहे! - [अतृप्त ईच्छा](https://parkhiarts.in/story/4857/): रिमझीम पावसाची नुकताच सुरुवात झाली होती,विजेच्या प्रकाशाचा नयनरम्य सोहळा आसमंतात उजळून निघत होता,एका विजेच्या कडकडाटाने रवी भानावर आला,लाईट नसल्याने स्वयंपाक करायचे राहून गेले होते,दहा बाय दहा च्या रूममध्ये एकटाच दोन महिण्यागोदर रहायला आला होता,नोकरीनिमित्त बदली झाल्याने घरदार सोडून आपली लहान लहान मुलं आपल्या पत्नीसोबत ठेवून अशा नवीन शहरात तो आला होता,रोज सकाळी दोन वेळचं जेवण तयार करून 9 वाजताच्या दरम्यान जो कामावर जायचा तो थेट संध्याकाळी 9 वाजताच यायचा,नोकरी जेमतेम पोट चालवेल अशीच असल्याने आणि आपल्या कुटुंबावरच्या प्रेमापोटी त्याने कधीच आपले शौक केले नाही की सुपारीच्या खांडाचं व्यसन सुद्धा त्याला जडलं नव्हतं.“रवी” बाहेरच्या दरवाजातून एका कोमल स्वरात हाक दिल्याचं त्याच्या […] - [मूठभर लोक](https://parkhiarts.in/poem/4853/): मूठभर लोक म्हणजेसारा गाव नसतोचोराने वठवले जरी सोंगतरी तो साव नसतो….चाल गड्या पुढेरस्ता सत्याचा सोडू नकोवाईटाच्या संगतीनेभविष्य तुझे पोळू नकोनको संग असंगाशीखोट्याला जगी वाव नसतो…..ठेचा लागतील कितीहीमागे फिरून पाहू नकोध्येय सोडून आपलेअसत्याकडे जाऊ नकोमाणसा माणसात तंटेनेहमीच त्यांचा डाव असतो….चोराने वठवले जरी सोंगतरी तो साव नसतो…. - [पावसाची धुंद सर](https://parkhiarts.in/poem/4848/): पावसाची धुंद सरअन तुझी आठवणथेंबा थेंबाने झिरपणारेतुझ्यासोबतचे ते क्षण….हवेत उडणाऱ्या तुझ्या मऊकेसातून अलगद हात फेरावाआणि चिंब व्हावे मन,फुलांवर अळखळलेल्या थेंबातहीतुझा चेहरा दिसावादेहभान विसरून तृप्त व्हावे तन………बसावे न्याहाळत निखळ सौन्दर्यअविरत संततधार………..आसक्तीचा थेंबही नसावातुझे सौन्दर्य न्याहाळताना………असावं प्रेम वासनाविरहितशुद्ध झऱ्यासारखंनिर्माण होऊ नये मनातआसक्तीचा,वासनेचाकाळाकुट्ट व्रण….कलुषित होऊ नये तन…मन - [अस्पृश्य...](https://parkhiarts.in/poem/3355/): ज्यावेळेला महारांनाविहिरीवर लोकं पाणी भरायलाअर्धीच विहीर द्यायचे,त्यांच्या सावलीलाही विटाळ मानायचेत्यांच्या कपातला चहापण नाही प्यायचेअगदी त्याचवेळेला माझ्या घरातल्या चुलीपर्यंतही महारांची पोरं बिनधास्त फिरायची,सोबत जेवायची,सोबत खेळायचीमहारांच्या लग्नात आमचे कुनबी जायचे नाहीमला आठवतं…एका महाराच्या मुलीच्या लग्नाचं जेवणयांच्यासाठी आमच्या घरी ठेवलं होतंअन अख्खा गाव जेवला होता…गावातल्या मुसलमानाच्या घरीमी नेहमीच शिरखुरमा खायचोते माझ्या जिवलग मित्राचं घर होतंदोस्त म्हणून माझ्या घरी तो आवडीने यायचामाय तेवढ्याच आवडीने त्याला जेवू घालायचीअरे,तूच सांग यारमाझ्या मायबापाने कधी भेदाभेद केला नाही,मला शिकवला नाही…तो माझ्या रक्तात नाहीतर तो तू….माझ्या मेंदूत कसा काय भरवशील?……. - [तू दिसलीस बऱ्याच दिवसांनी](https://parkhiarts.in/poem/3350/): तू दिसलीस बऱ्याचदिवसांनीनजर तीच,नजरेला नजर मिळताचचेहऱ्यावर आलेलंस्मितहास्यही तेच होतंअन्गालावर पडणारी खडीहीअगदी तीच होती….अलगद तुझ्या डोळ्यांच्यापापण्यात आलेलाआसवाचा थेंब….कदाचित बोलायचं होतंतुला माझ्यासवे..मुक्तपणे….पण तुझ्या ओठांनीबोलण्याची परवानगीचनाकारली तुला…मला तर परवानगीनव्हतीच कधी….. - [पोटातली भूक,पोटात मारली….](https://parkhiarts.in/poem/3002/): बापानं खस्ता खाल्ल्यापोराले शिकवासाठीएका फाटक्या बन्यानवरआयुष्य काढलं…पोरगं शाळेत गेलंशाळेचा सर्व खर्चउचलासाठी बापानंपोटातली भूक,पोटात मारली….पोराकडून लईच आशाठेवून होता बाप….पोरगं बी लई शिकलंशिकून खूप मोठ्ठं झालंपेपरात मोठ्ठ नाव आलंशिकलेली बायको केलीबापासाठी नातवं आली…आता घराच्या एका कोपऱ्यातदहा फुटांवरून ढकललेल्याताटात जेवन करत तो बापगावभर सांगतोमाझा पोरगामाझा मान राखतो आहे……अन्लोकांना दिसू नये म्हणून तो बापती फाटलेली बन्यानफाटक्या धोतरानं झाकतो आहे…. - [तुझ्या जन्माची गोष्ट : आठवण](https://parkhiarts.in/story/2999/): तो जन्मलात्याच्या जन्माची बातमी मिळाली तेंव्हा पाठीवर पन्नास किलोची युरियाची बॅग होती,आधी एक मुलगी आणि हा दुसरा मुलगा म्हटल्यावर जो नैसर्गिक आनंद माणसाला होतो तोच आनंद मला झाला,पन्नास किलोची बॅग अलगद खाली ठेवली आणि सायकल एवढी दापटली की दोन किलोमीटरचे अंतर केवळ पाच मिनिटात पार केले,याचा जन्म झाला तेंव्हा सकाळचे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली होती,तो कामाचा थकवा,ते घामेजलेलं शरीर कसलीच जाणीव त्यावेळेला नव्हती,माझा अंश चेहऱ्याने कसा दिसतो याकडेच डोळे लागलेले होते,त्यावेळेला काही झालंच तर दवाखान्यात न्यायला सुद्धा जवळ एक दमडी शिल्लक नव्हती,महिनाभर कारखान्यात जाणं आणि महिन्यापोटी सतराशे रुपये पगार घेऊन घर चालवणं,दवाखान्यात नेण्याचा खर्च मात्र ह्या बहाद्दराने वाचवला होता,तो […] - [नशीब नाहीच प्रयत्नवादी व्हा!-समीक्षण](https://parkhiarts.in/review/2995/): प्रस्तुत ग्रंथ नशीब आणि प्रयत्नवाद या विषयाची उत्कृष्टपणे सांगळ घालणारा आहे. गड्या तू आपलेजीवन असे जगअडल्या नडल्यांमधेतू आपला देव बघअंधाऱ्या वाटेसाठी तू तारा बनअन्गुदमरल्या जिवनासाठी तू वारा बन.. 📕पुस्तक : नशीब नाहीच प्रयत्नवादी व्हा!📙लेखक: श्री.सुनील चौधरी📘प्रकाशक: श्री.बालाजी जाधव,पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद.📗तृतीय आवृत्ती: १९ फेब्रुवारी २०१८💰किंमत: ₹ ३०/- ■अशा सुंदर आणि प्रफुल्लीत करणाऱ्या ओळींनी लेखकाने या पुस्तकाची सुरुवात केली आहे,प्रत्येक माणसाने बुटाच्या पॉलिशपासून डोक्याच्या मॉलिशपर्यंत कोणत्याही धंद्याची लाज बाळगू नये,सन्मानाने भरपूर पैसा कमवावा पण यश मिळविण्यासाठी चुकीचा मार्ग कधी निवडू नये,यश म्हणजे जीवनाचा सर्वांगीण विकास होय.टीव्ही आणि वर्तमानपत्रात आपण अनेकदा पाहतो की धनवृद्धी यंत्र घेतल्याने धनवर्षा होते,निरनिराळ्या अंगठ्या घातल्याने श्रीमंत होते,तीन चार हजाराच्या […] - [मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा-समीक्षण](https://parkhiarts.in/review/2989/): हा ग्रंथ मराठा कुणबी समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक विषमतेवर आघात करणारा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ वाचण्यापेक्षा कृतीतून दिसावा असा खुद्द देशमुख सरांचा आग्रह असतो. प्रा_मा_म_देशमुख सर ■प्रा.मा.म.देशमुख यांनी धनवटे नॅशनल कॉलेजला इतिहासाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे,त्यांच्या कारकिर्दीत नागपूरमध्ये जी चळवळ चालविली गेली ती नागपूरच्या इतिहासात हादरे देणारी ठरली आहे,नागपूर हा संघाचा बालेकिल्ला आणि या बालेकिल्ल्यात एक कुणबी सत्य इतिहास बाहेर काढतो म्हणजे काय? मध्ययुगीन भारताचा इतिहास हे पुस्तक ज्यावेळेस प्रसिद्ध झाले त्यावेळेस महाराष्ट्रातील भटांवर फार मोठा आघात झाला आणि पुस्तकातील विचार पसरू नये म्हणून त्यांनी आकाश पाताळ एक केले,त्यावेळेस देशमुख सर एकाकी झुंज लढत होते,सनातन्यांनी त्यावेळी त्यांना केलेला विरोध हा […] - [काळजाची स्पंदने - समीक्षण](https://parkhiarts.in/review/2985/): ●कोरपना तालुक्यातील नांदा या छोट्याशा गावात लहानाचा मोठा झालेला हा माणूस मनाने मात्र फार हळवा आहे,खरे तर यांचे शिक्षण बीएससी बीएड असे झालेले असले तरी,तो प्रांत ते शिक्षण कवीचे नसले तरी कवी माणूस कुठे जन्म घेईल हे सांगता येत नाही आणि ज्याच्याकडे मुळातच हळवं मन असेल तो कोणत्याही प्रांतात कवी झाल्याशिवाय राहणार नाही.बालपण,तारुण्य ज्या गावखेड्यात गेलं,पिंजलेल्या परिस्थितीत स्वतासहित आजूबाजूला जे घळलं याचं यतार्थ दर्शन त्यांच्या कवितेतून आपल्याला पहायला मिळतं.कवितेसोबतच आता त्यांच्या बहारदार गझला समोरच्या माणसाचं मन सुन्न करून जातात,माणसात असलेला खोटा दंभ,खोटेपणा उघडा पाडण्यात त्या कसर सोडत नाहीत.मी गझलांबद्दल अजूनही अनभिज्ञ आहे,मला त्या खूप आवडतात परंतु त्यातले नियम मला अजिबात […] - [हिंदुत्व देश तोडणारे सूत्र-समीक्षण](https://parkhiarts.in/review/2981/): देशातील प्रमुख मुद्दा ज्या मुद्द्यावर सर्वात जास्त राजकारण आणि त्याच मुद्याने समाजमन ढवळून निघतं,धर्मातील लोकांची वैचारिक उलथापालथ होत असते.हे पुस्तकाचं विश्लेषण नाही की समीक्षण नाही,मी एक वाचक आहे आणि हे पुस्तक वाचल्यानंतर जे एका वाचकाने प्रकट व्हायला पाहिजे ते मी होतोय.पुस्तकाच्या आजपर्यंत किती आवृत्या निघाल्या त्यावर एक दृष्टिक्षेप टाकल्यास त्या पुस्तकात नेमके काय आहे याची सहज कल्पना येईल. ●पुस्तक : हिंदुत्व देश तोडणारे सूत्र●लेखक: श्री.नागेश चौधरी,नागपूर●प्रकाशक: साथीदार प्रकाशन,नागपूर●पहिली आवृत्ती:१९८९,दुसरी-१९९२,तिसरी-१९९७,चवथी:२००१,पाचवी-२०१५●किंमत: ₹ ३०/- ◆श्री.नागेश चौधरी-बहुजन योद्धा महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीत कित्येक माणसं आली,गेली पण चळवळीतील सातत्य अभाधित राखणारा आणि गेल्या ४० वर्षांपासून चळवळीची वात तेवत ठेवणारा हा माणूस प्रसिद्धीपासून कोसोदूर आपली बहुजन चळवळ […] - [देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे-समीक्षण](https://parkhiarts.in/review/2977/): ◆प्रबोधनकार म्हटलं की सर्वात आधी आपल्याला आठवतं ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आणि या नावाबरोबरच आठवतात प्रबोधनकारांच्या विपरीत वागणारे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आचार! सामान्य माणूस जो प्रबोधनकारांचे विचार ग्रहण करतो अगदी त्याच वेळी त्याच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की प्रबोधनकारांचे पुरोगामी विचार बाळासाहेबांनी का आचरणात आणले नसतील? का बाळासाहेब प्रबोधनकारांच्या विचारांवर चालले नसतील? पण बाळासाहेब हे राजकारणी होते आणि राजकारणात जनतेला मूर्ख केल्याखेरीज,त्यांच्या भावनांशी खेळल्याखेरीज राजकारण करता येत नाही हे बाळासाहेबांनी हेरले आणि प्रबोधनकारांच्या अगदी विपरीत जो जनतेच्या काळजातील अत्यंत भावनिक मुद्दा होता तो “धर्म” हा अजेंडा म्हणून वापरला आणि प्रबोधनकारांच्या विचारांना हरताड फासला तो कायमचाच!◆प्रबोधनकार हे […] - [बघ बाबासाहेब दिसतो का…..?](https://parkhiarts.in/poem/2973/): काय म्हणतोस दादाबाबासाहेबांचा तू स्वतःलावारस म्हणतोयसहरकत नाही..आनंद आहेबरं एक सांग तू विचाराने वारसआचाराने वारस की फक्तत्यांच्या नावाचाउपयोग करणारा सारस…बुद्धाचे पंचशील मानतोसकी बाबासाहेबांनी दिलेल्याबावीस प्रतिज्ञा पाळतोस..काय एवढ्यातच राग आलाय??बुद्धाची शांती मनी ठेवहिंसा मनात आणू नकोसएक कर तुझ्या घराच्या भिंतीवरबाबासाहेबांच्या बाजूलालावलेला विक्तुबाबाचा फोटो जर्रासाबाजूला कर…..बघ बाबासाहेब दिसतो का…..? - [तुझ्या गुलाबी ओठावर](https://parkhiarts.in/poem/2969/): प्रत्येक माणूसच इथेअसतो एकसारखा,तुझ्या गुलाबी ओठावर,वक्षावर आणि नितंबावर,तिरप्या नजरेने कटाक्षटाकून उघडपणे बलात्कार करणारा….जुने लोक आजही म्हणतातबाईने हात दिला नाही तरमाणसाची काय बिशादपण प्रत्येकच माणूसनसतो “माणसा” सारखा!म्हणून आपणही थोडंसावध असावं,काळजी घ्यावी मांड्याउघड्या पडणार नाही याची!माणसात जनावरच असतो..हे गृहीत धरून चलत्याच्या जनावर होण्याचीआजवर तरी कोणीच दिली नाही…..शाश्वती…. - [तू लढ म्हणतोस म्हणून](https://parkhiarts.in/poem/2965/): तू लढ म्हणतोस म्हणूनआम्ही लढायचं काभावालाच कुऱ्हाडीनेतोडायचं का?हिंदू हिंदू म्हणून आम्हालातू नेहमीच डीवचतोसदुसऱ्यांना आतंकवादी म्हणूनआपल्यांना सोडायच का?..धर्माचं भूत घालून तूसोयीस्कर बाहेर राहतोसआपलं झाकून दुसऱ्यांचंउघडून पाहायचं का?…चल तू म्हणतोस म्हणूनएकदा तुझही ऐकून घेतोत्याबदल्यात तुझी काळं कृत्यआमच्या पोरांनी पुसायचं का? - [खोट्या आसवांचां...](https://parkhiarts.in/poem/2961/): प्रेमाच्या नावे तुझाहा बहाणा कशालासमजावया तुझे प्रेम मजहा जमाना कशाला_||प्रीत तुझी तीखोटी खोटीच होतीनव्हते मनात तुझ्यामग मी निशाणा कशाला_||विरहात जगण्याची हीमाझीच रीत आहेखोट्या आसवांचां तुझ्याहा मुलामा कशाला__|| - [शुद्धलेखनाची ऐशी तैशी…..](https://parkhiarts.in/poem/2957/): आमच्या पिढ्या गेल्यात खेड्यातआणि खड्डयात सुद्धाआम्हाला मन होतं तेंव्हाहीआणि आहे आत्ताहीफरक एवढाच होता कीत्यावेळीआम्ही फक्त विचार करत होतोमनातल्या मनात…..काही लिहिण्याची परवानगीचनव्हती अन व्यक्त होण्याची तरनव्हतीच नव्हती कधी…..आता आम्ही व्यक्त होताहोतआता लिहू लागलो आम्हीआमची माय गावातलीतुले मलेची भाषाआमच्या मायेच्या गावातली…चल तुझी वाटरी भाषा ठेव बाजूलातुझ्या शुद्धलेखनाची ऐशी तैशी….. - [प्रश्न सत्तेलाच विचारायचे असतात!](https://parkhiarts.in/article/2953/): प्रश्न विचारणे हे सजग लोकशाहीचे प्रतीक मानल्या जाते आणि ज्या देशातल्या जनतेला प्रश्न पडत नाही ती जनता मृतप्राय झालेली असते वा एकतर ती सत्तेची गुलाम झालेली असते.सत्तेत कोणीही असो सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवणे हे जनतेचे काम असते,जनता कायम विरोधी पक्षाचे काम करणारी असली पाहिजे.जनतेला सत्तेला प्रश्न विचारण्याचा मूलभूत अधिकार हे भारताचे संविधान देत असते.या विपरीत जनतेच्या मतांना दडपण्याचे काम एखादी सत्ता करत असेल तर त्या सत्तेचा अजेंडा हा लोकशाही विरोधी असतो हे प्रत्येकाने समजून घ्यावे.सत्तेचा कारभार पारदर्शी नसेल तर सत्ताधारी जनतेत भांडण लावून,वेळोवेळी जात,धर्म ,पंथाच्या नावे सामाजिक ऐक्य तोडून आपला अजेंडा नेहमीच पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असतात.एकदा एखादा माणूस […] - [अधांतरी](https://parkhiarts.in/poem/2949/): तुझ्या प्रीतीचे मर्मएवढे कठोर असेलहे कळलेच नव्हते प्रिये…दिसायला तर तूलावंन्याची मूर्तीभासत होतीसतुझ्या लावन्यावरचमी फिदा झालो होतोअनतुझ्या अंतरीचे गुणचाचपण्याची तसदीघेतली नाहीशेवटी खरे रूप दाखवूनसोडून दिलेस मलाअधांतरी………. - [माझा निर्मिक](https://parkhiarts.in/poem/2715/): मी निर्मिकाची पूजा करतोमाझा निर्मिक शेंदूर मागत नाहीकी रुईचुकाचा हार मागत नाहीएवढच नाही तर तो मला कधीनारळही मागत नाही…त्याच्या दर्शनासाठीरांगेत उभ राहावं लागत नाहीव्हीआयपी दर्शन म्हणूनसेटिंगसुद्धा करावी लागत नाहीतो कोणतीही गोष्ट मागत नाहीकोणतीही लाच स्वीकारत नाहीतो उपास करायला लावत नाहीसेंटेड अगरबत्ती लाव म्हणूनएक शब्दही सांगत नाही….तो चादर चढव म्हणत नाहीतो मेणबत्ती लावायला सांगत नाही कीतो नवस करायला लावत नाहीतो एवढच सांगतो कीतू जे काम करतोस तेइमाने इतबारे कर….तुझ्या कामावरून येणारेपरिणामच तुला सांगतीलतू चांगला आहेस की वाईट…..? - [पाठीत खंजीराचे](https://parkhiarts.in/poem/2710/): पाठीत खंजीराचेआता वार खूप झालेआता शवावर माझ्याफुलांचे हार खूप झाले..।।मुखवटे ओढले ज्यांनीते आपलेच होतेगळ्याभोवती वेदनेचेआता तार खूप झाले..।।चेहरे बदलणारेरोज अवती भवतीच सारेस्वार्थीपणाचे येथेआता बाजार खूप झाले..।।तोंडावर स्तुती यांचीमज कळलीच नाहीदगाबाजीने हृदय माझेआता घायाळ खूप झाले..।। - [रामप्पा मंदिर](https://parkhiarts.in/article/2705/): रामप्पा_मंदिर, कदाचित हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जे देवाच्या नावाने नव्हे तर ज्या कारागीराने बांधले त्याच्या नावाने ओळखले जाते.तर गोष्ट अशी की मी ज्या ठिकाणी भटकतो त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती,त्या ठिकाणाचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आज अचानक मी ज्या ठिकाणी काम करतो अगदी त्या ठिकाणाच्या जवळ एवढी सुंदर,देखणी कारागिरी केलेली वास्तू, शिल्पकलेचा उत्तम नमुना पहावयास मिळाला,तेलंगणात एवढ्या वर्षात एवढ्या जवळ हे ठिकाण असताना मी आजपर्यंत का पाहू शकलो नाही याचे मलाच आश्चर्य वाटून गेले.■हे मंदिर भगवान शंकराचे असून हे भूपालपल्ली जिल्ह्यात मुलुगु तालुक्याच्या पालमपेठ या गावात स्थित आहे तसेच वारंगलपासून हे मंदिर 70 किलोमीटर दूरीवर आहे, याची निर्मिती […] - [भक्तांच्या तलवारी](https://parkhiarts.in/poem/2701/): तुम्हाला कसं वाटेलतोंडात जीभ असेलजेंव्हा कापलेली….तुम्ही आक्रोश करालबोलण्यासाठी पणतुम्हाला एक शब्दहीबोलता येणार नाहीव्यवस्थेला प्रश्न? तुम्हालाविचारता येणार नाही…एक भीड तयार केली जातेयतुमच्यासाठी आणिप्रश्न विचारलारे विचारला कीतुम्हाला ठेचण्यासाठी…दगळाला शेंदूर फासले कीत्याविरोधात बोलताच येत नाही,अरे तो दगळ आहे हे सत्यकोणाला सांगताच येत नाही….अनत्याच वेळेस भक्तांच्या तलवारीअसतील तुमच्या मानेवरकाय रे तूझी हिम्मत झालीच कशीआमच्या देवाला दगळ म्हणण्याची? - [हायवे वरचा देव](https://parkhiarts.in/poem/2697/): बारा वर्षांपासून ज्या अरुंद रस्त्यावरमी जाणं येणं करायचोत्याच रस्त्यावर एका ठिकाणीरस्त्याच्या कडेलामुंग्याचं भलं मोठं वारूळमला नेहमी दिसायचंअचानक दोन वर्षांपूर्वीते वारुळ हळदी कुंकवाने रंगून दिसलंथांबून विचारलंभौ हे का हाये न गर्दी कायची हो गातो उतरलाभौ तुले माहितस नाई काकाल राती आमच्या सदूमामालेसपनात नागोबा आला आनह्या ठिकाणी तो यिउन माह्य मंदिर बांधमनुंन सांगून गेला मने….बरं बावा बांदा मंग मंदिरअन् घ्या मंग दर्शन….मी त रोजस येईन ह्या रस्त्यानंमले त हररोजस होईन दर्शन मंग….रोज पुजारी बसू लागलागर्दी वाढत गेली,नवसं फिटत गेलीभक्त भक्तीणींमधली दरी मिटत गेलीआजत्याठिकानाहून हायवे गेला,नवसाला पावणारे देव सपाट झालेपुजाऱ्याने कमावले,भक्त मोकाट झालेकामापुरता देव होता,बसविणाऱ्याने बसवलाचुंबळी भरून स्वतःची,समाजाला नासवलाश्रद्धेच्या ढुंगणावर बसलेल्या लाथाका कुणाला […] - [फुकटचे सल्ले…](https://parkhiarts.in/article/2693/): ❝ईच्छा आणि आकांक्षा❞.माणूस म्हणजे सदैव अतृप्त असणारा प्राणी! माणसाचे संपुर्ण आयुष्य हे काही ना काही मिळविण्याच्या लालसेने संपून जाते पण त्याच्या ईच्छा आकांक्षा काही पूर्णत्वास जात नाही.सर्व काही मिळवूनही तो अतृप्त भावनेनेच जगाचा निरोप घेतो.माणसाच्या आयुष्याच्या तीनही टप्प्यात तो केवळ मिळविण्यासाठी धळपड करतो पण दुसऱ्याला देण्यासाठी तो काहीही करत नाही आणि त्यामुळे शेवटी सर्व काही मिळवूनही त्याचे आयुष्य निरस ठरते.आयुष्याच्या पूर्वार्धात प्रत्येक माणूस स्वप्ने बघतो आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाचे रान करतो,कधी तो यशस्वी होतो तर कधी कायमची निराशाच पदरी येते.काही वेळेस काही ठिकाणी एखादा निर्णय चुकला की अख्या आयुष्याची वाट लागते तर काही निर्णयामुळे आयुष्य अगदी सुखमय होऊन […] - [लफडं, प्रेम आणि संसार....](https://parkhiarts.in/article/2689/): “चल आपण दोघे पळून जाऊन लग्न करू” वय वर्षे 16 असणाऱ्या मुलींमध्ये आणि वय वर्ष 18 असणाऱ्या मुलांमध्ये हे वाक्य कमालीचं उपयोगात येतांना दिसतं. ती नुकतीच मॅट्रिक पास होऊन कॉलेजात आलेली असते तर तो दम टाकत काठावर पास होऊन कसाबसा तिच्यासोबत आलेला असतो.मुळातच पुरुषाच्या शरीरात हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होण्याचा हा परिणाम असावा. मुलामुलींचं एकमेकांकडे निर्माण होणारं हे आकर्षण ही अगदी स्वाभाविक प्रक्रिया असते जी तारुण्याचा उंबरठा ओलांडताना होत असते, हे प्रत्येकाच्या जीवनात घडत असतं, ज्याने एखाद्यावर किंवा एखादीवर प्रेम केलं नाही तो माणूसच शोधून सापडणार नाही,एखाद्याला एखादी आणि एखादीला एखादा आवडत नसेल असे कोणत्याही स्त्री पुरुषाच्या जीवनात घडत नाही […] - [प्रश्नाचे उत्तर मिळतेच असे नाही.](https://parkhiarts.in/poem/2685/): आवडणारी प्रत्येक गोष्टमिळतेच असे नाही,मनाला जसे वाटते तसेघडतेच असे नाही,जिंदगीच्या पुस्तकात अशीअसतात प्रश्नार्थक पाने,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच असे नाही…काही खोल असतात नातेकाही अबोल असतात नातेवेळेवेळेनुसारही कितीदाबदलत असतात नातेहसऱ्या चेहऱ्यामागचेसत्य कळतेच असे नाही,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच असे नाही…समोरच्यावर विश्वास ठेवूनस्वतःचाच घात होत असतोदिव्यावर जळणाऱ्या पतंगाचात्या विश्वासघात होत असतोविलोभनीय सुंदर डोंगरसुंदर असतेच असं नाही,हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तरमिळतेच असे नाही… - [आई](https://parkhiarts.in/story/2681/): मला आठवतात ते दिवस,आमच्या जीवनातले अत्यंत हलाखीचे दिवस होते ते,घरात सर्वात लहान असल्याने आई वडिलांचं अधिकचं प्रेम माझ्या वाट्याला आलं होतं आणि सर्वात लहान असल्याने आई वडिलांचा सहवास अधिक लाभला! आई वडील माझा हट्ट कोणत्याही स्थितीत पूर्ण करत असत आणि त्यावेळेस परिस्थितीही अशी होती की माझा हट्टही ना च्या बरोबरीचा असे,एखाद्या वेळेस महाग पेन घ्यावीशी वाटायची तर अवांतर वाचनाची त्या वेळेस भल्लीच आवड असल्याने एक एक रुपया गोळा करून किशोर,चांदोबा सारखे मासिक मासिक वर्गणी भरण्यासाठी आईकडे हट्ट धरायचो! तो हट्ट आई पूर्ण करायची, बाबा थोडे रागिष्ट असल्याने आईचं प्रेम मला जास्त वाटायचं,बाबांकडे मी कोणतीही गोष्ट मागत नसे!गावातलं वातावरण शहरांपेक्षा अधिक […] - [माझा प्रवास...](https://parkhiarts.in/story/2677/): ■हा प्रवास साधा सोपा नव्हताच मुळी! आणि माझ्या जीवनात मी जे काही केलं ते यशस्वी होण्यासाठी नव्हतं तर ते होतं स्वतःच अस्तित्व राखण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी!मी माझ्या जीवनात काय केलं,किती कष्ट घेतले,आज इथपर्यंत कसा पोहचलो ही तर सांगण्याची गोष्टच नव्हे,जे केलं ते स्वतःसाठी केलं आणि स्वतःसाठी केलेल्या कामासाठी स्वतःचीच पाठ मला थोपटावीशी वाटत नाही,कोरोनाच्या भयाण वातावरणात माझा हा आनंदाचा क्षण फिका आहे याची पुरती जाणीव आहे मला.परंतु माझ्या जीवनातला बरा वाईट प्रसंग प्रत्येकवेळी मित्रांसोबत शेअर करत आलोय म्हणून हा ही प्रसंग आपल्यासमोर ठेवतो आहे!■”काय हो? पाठीवर हा व्रण कसला? नकळत पाठीवर तिनं हात फिरवला आणि तिच्या चिंतातुर चेहऱ्यावर बरच काही […] - [लक्ष्मणाच्या उर्मिलेसारखे](https://parkhiarts.in/poem/2673/): तुझ्या निखळ हास्यावर लिहू कीतुझ्या गोड स्वभावावर लिहू,तुझ्या कोमल चेहऱ्यावर लिहू कीतुझ्या आत अनंत यातना लपवून ठेवलेल्यातुझ्या हृदयावर लिहू,माझ्याकडे ती पेनच नाही कीतुझ्या अंतर्मनाचा ठाव घेईलआणिमाझ्या मनातली शाई एका कागदावर रीती होईलएका अर्थी बरच झालं!तू असतीस सोबतीला तर पडक्या झोपडीत,अन,कौलारू घराच्या छपरातून गळणाऱ्या पाण्यात,एकाच खाटेवर छत्रीचा आडोसा घेऊनकसे दिवस काढले असतीस,खाटेच्या एका पायाला बकरी बांधलेली ,अन, झोपडीच्या एका कोपऱ्यात चुलीवर चाललेला संसार,आकाशात लख्ख चमकत असलेल्या विजांचा टाहो!बोतरीच्या एका छिद्रातून न्याहाळतानागरिबीची रेषा तू कशी पार केली असतीस,कल्पना करवत नाही!शरीर नश्वर असलं तरी शरीराचा मोह सुटत नाही,शारीरिक भुकेसाठी हपापलेलं प्रेम खरं प्रेम असत नाही,बरं झालं त्या कठीण प्रसंगी शारीरिक भुकेने केला असताअतिप्रसंग […] - [विझून जाईन जरी](https://parkhiarts.in/poem/2669/): विझून जाईन जरीमी एकाच रातीतून,पेटेन उद्या नव्यानेमिणमिणत्या वातीतून….तप्त ज्वाला सोसल्या,घाव झाले कितीदा,भडभडत्या जखमेतून,रक्त वाहिले कितीदा,अंकुरेन उद्या नव्यानेयाच मातीतून…..विझून जाईन जरीमी एकाच रातीतून….छाटले ते पंख माझे,दगा भेटला कितीदा,दगाबाज विश्वासाने,जीव घेतला कितीदा,मुक्त होईन ना मी,बरबटलेल्या जातीतून….विझून जाईन जरीमी एकाच रातीतून…. - [पैसा हा काळा किंवा पांढरा नसतो..](https://parkhiarts.in/article/2665/): आपण जे वागतो त्याचे दूरगामी परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतात,आपण केलेली कामे,इतरांसाठी आपल्या हातून हेतुपुरस्सर वा जाणूनबुजून केलेले वाईट वा चांगले कृत्य हे भविष्यात आपली प्रतिमा कशी असेल हे ठरवीत असते,आपले वैयक्तिक जीवन त्याच बाबीवर बहरेल की उधडेल हे ठरत असते.आपण भूतकाळात केलेल्या कृत्याचे परिणाम प्रत्येकाला आपल्या भविष्यात हे भोगावेच लागतात,पुनर्जन्म वैगेरे अशी काही गोष्ट अख्या विश्वात नाही!माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि समाजात वावरत असताना समाजाने जे नीती नियम वर्षानुवर्षे ठरवून दिलेत त्या प्रमाणे माणसाच्या जीवनाची वाटचाल होत असते,समाजात कोणती कामे वाईट आणि कोणती कामे चांगली हे ठरलेलं आहे आणि त्यानुसार त्याचे परिणाम आपल्याला दिसत असतात,माणूस हा मुळातच स्वार्थी […] - [कायमचे हद्दपार करायचे असते](https://parkhiarts.in/article/2662/): 🔸एक वेळ अशी येते की काही माणसांना,काही प्रवृत्तींना आयुष्यातून कायमचे हद्दपार करायचे असते,आपणास वापरून अलगद बाजूला करणारी,ज्या गोष्टीचा काही एक संबंध नसताना उगीच आपल्या खाजगी आयुष्यात डोकावणारी,आपल्या समोर गोड बोलून पाठीमागे आपली निंदा करणारी,स्वतःला प्रसिद्धी मिळविण्यासाठी समोरच्याला बदनाम करणारी अशी माणसे अशा वृत्ती वेळीच ओळखून आपल्या तोंडातून एक अवाक्षरही न काढता बाजूला केल्या पाहिजेत! बऱ्याचदा आयुष्यात अनेक प्रकारची माणसे आपल्याला भेटत असतात,अशीही माणसे भेटतात जी यापूर्वी आपल्या आयुष्यात कधी आलेलीच नसतात,व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे ठरलेलं असतं आणि त्यामुळे कोण माणूस कसा हे न पाहता आपण बरेचदा मैत्रीच्या धाग्यात नकळत गोवल्या जात असतो! कधी समोरच्याकडून नकळत अपेक्षा ठेवून बसतो तर नकळत […] - [सौन्दर्य चिरकालीन नसतं](https://parkhiarts.in/poem/2658/): सौन्दर्य चिरकालीन नसतं,तसं …तारुण्य देखील चिरकालीन नसतं.सौन्दर्याचा साज आणि वयाचा माजउतरला,की जाणीव होत असते प्रत्येकाला!आठवते प्रत्येकाला,आपण भूतकाळात कसे वागलो ते…..सौन्दर्य अन् तारुण्याच्या गर्वानेदूर सारलेली माणसे,उतरत्या वयात वाटतात हवीशी,तेंव्हा नसतात कोणीही अवतीभवतीज्यांना म्हणू शकू आपली.आणि पश्चातापात जळायला लागतंते सौन्दर्य आणि तारुण्य….वयानुसार उमटतात सुरकुत्याचेहऱ्यावर, अन्ओझही वाढतं जवाबदाऱ्यांचं!तेंव्हा सारीच मस्तीअसते विझलेली…… - [एका संघर्षाची गोष्ट](https://parkhiarts.in/article/2654/): जग बदलवू इच्छिणारे बरेच मिळतील, जग बदलवू पाहणारा एखादाच असतो-ऍड.मारोती कुरवटकर! एक संघर्षमय प्रवास!■एखादा माणूस आपल्या जीवनाचा संघर्षातून इतरांसाठी आदर्श कसा ठरतो याचं एकमेव उदाहरण म्हणजे ऍड.मारोती कुरवटकर!गरिबी,तुरुंगवास अशा अनंत यातना भोगून व्यवस्थेच्या नाकावर टिचून वकील बनणारा आमचा मित्र मारोती!आज 25 जुलै त्याचा वाढदिवस,त्याच्या वाढदिवसा निमित्त त्याचा जीवनप्रवास उलगडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करीत आहे,ही पोष्ट बरीच मोठी आहे परंतु युवकांना मार्गदर्शक ठरणारी आहे आणि ती सर्वांनी वाचावी अशी प्रामाणिक ईच्छा आहे.■अल्पावधितच एक सामाजिक जाण असलेला वकिल म्हणून ज्याची ख्याती आहे त्या मारोतीची जीवनकथा एखाद्या रहस्यमय कादंबरी किंवा चित्रपटाला साजेशी अशी आहे.मारोतीचा जन्म राजुरा तालुक्यातील टेंबुरवाही या छोट्याशा गावात गणपतराव कुरवटकर […] - [माझं प्रिय घर](https://parkhiarts.in/story/2649/): फेसबुक पोष्ट : माझ्या घराचं चित्र बघून अनेक मित्रानी मनाला सुखावून टाकणाऱ्या कमेंट्स दिल्या,मी अत्यंत सुखावून गेलो! घराला सहा वर्षे पूर्ण झाली त्याची आठवण म्हणून हा फोटो लावला होता! कोणाची नजर न लागो असे म्हणतात पण अशा नजरा माझ्या कोणत्याच गोष्टींना लागत नसतात नव्हे तशा भुक्कळ अंधश्रद्धाळू गोष्टींवर माझा विश्वास आधीही नव्हता,आत्ताही नाही,ज्या गोष्टीसाठी घाम गाळला,कष्ट उपसले ती गोष्ट जगाला दाखविण्यात मला तरी काही उणे वाटत नाही, खरे तर मी माझ्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करतो,मी माझ्या माणसांवर,मित्रांवर,लेकरांवर आणि मनात भडभडणाऱ्या जखमांवरसुद्धा!!!गावखेड्यात एक म्हण आहे “घर बांधून पाह्य नाही त पोरीचं लगन करून पाह्य” आणि हे एक साधं वाक्य पूर्ण करण्यासाठी […] - [माझा धर्म ?](https://parkhiarts.in/article/2645/): इतर लोक आपल्याबद्दल काय म्हणतात याचा विचार माणसाने कधीच करू नये,व्यक्ती तितक्या नजरा असतात,लोकांना समोरचा माणूस आपल्या मताचा,आपल्या विचाराचा असावा हीच अपेक्षा असते,लोकांच्या नजरेत आपण काय आहोत आणि त्यांना जसं हवं तसही खरं तर वागण्याची गरज नसते.प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या दृष्टिनुसार आपल्याविषयी त्याच्याकडे एक विशिष्ट असं मत बनलेलं असतं.आपण जे वागतो,बोलतो यात आपण कधीच चुकत नाही अशी प्रत्येकाची ठाम भूमिका असते,हीच भूमिका समोरच्या माणसावर तो लादू इच्छितो आणि समोरच्या माणसाने त्याच्या भूमिकेवर विपरीत भूमिका घेतली तर त्या माणसाचे मत काही क्षणात बदलत असते.मतपरिवर्तन कसे ठरते याचे सोपे उदाहरण याठिकाणी मी देऊ इच्छितो,आपल्या सर्वांच्या म्हणण्यानुसार काळाचे काही प्रकार आपण ठरवलेले आहेत,सतयुग,त्रेतायुग,द्वापारयुग आणि […] - [साहित्यिक जमात](https://parkhiarts.in/article/2639/): 🌿असं म्हणतात की वैचारिक क्रांती ही साहित्यातून होत असते,चांगल्या साहित्यातून चांगल्या माणसाची निर्मिती होत असते,चांगले साहित्य आणि चांगली माणसे निर्माण होण्याच्या काळाचा आज वर्तमानात ऱ्हास व्हायला लागला आहे. प्रस्थापित व्यवस्थेवर लिहिणारे लेखक ,कवी फार तर बोटावर मोजण्याइतके मिळतील,आपलं व्यवस्थित चाललय ना,मग कशाला उडती काटी अंगाला लावून घ्यायची अन उगीचच कशाला कोणासोबत संबंध खराब करून घ्यायचे असे म्हणून अन्याय,अत्याचारावर समाजातल्या वाईट घटनांवर नावाजलेले,समाजात प्रसिद्ध असणारे लेखक लिहिण्याचे टाळू लागलेले आहेत.एक अनामिक भीतीने अशा लेखकांना ग्रासलेलं आहे.काहींचे काही ठिकाणी हितसंबंध गुंतलेले असतात म्हणून तर काही प्रस्थापित लोकांकडून त्रास होऊ नये म्हणून समाजातल्या वाईट घटनांवर भाष्य टाळू लागलेले आहेत. 🌿आत्ताची साहित्यिक जमात म्हणजे […] - [मनातलं सारं काही : समीक्षण](https://parkhiarts.in/review/2633/): ▪️राम बोढेकर सरांच्या एखाद्या पुस्तकावर माझ्या सारख्या पामराने लिहिणे म्हणजे तेजोमय सुर्यासमोर काजव्याने चमकण्यासारखे होय.विपुल ज्ञान संपदा लाभलेले अत्यंत साधे संयमी असे हे व्यक्तिमत्व आहे.सरांसोबत माझी फारशी ओळख नाही,माझा मित्र प्रख्यात लेखक,कवी डॉ.किशोर कवठे यांच्या सहवासात त्यांची ओळख झाली.त्यांच्याबद्दल माहिती मिळाली,त्यांची एक दोन वेळा भाषणं ऐकण्याची संधी मिळाली,त्यांची वक्तृत्वशैली एवढी सुंदर आहे की ते बोलताना नुसतं ऐकत राहावं असं वाटतं.एवढा मोठा माणूस स्वतःला मी कुणी मोठा प्रतिभावंत नाही असे प्रांजळपणे कबूल करतो त्यावेळेस त्यांच्या मोठेपणाची व्याप्ती आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही.अशा व्यक्तीचे क्षणभर का होईना सानिध्य लाभले तर जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही.▪️काव्यसंग्रह वाचायला घेतला आणि त्यांनी जी कृतज्ञता व्यक्त केली […] - [तू म्हणाली](https://parkhiarts.in/poem/2468/): तू म्हणालीपुन्हा कधी येतोसमी म्हणालोभरवसा नाही..तू म्हणालीस एकदामाझ्या जगातपरत येऊ नकोसमी कधीच आलो नाहीतू न बोलवताहीमला यावं लागलंमाझं मलाच समजलं नाहीपुन्हा कधी येतोसविचारलस!मी उमजलो नाहीमी एवढच समजून चुकलोहृदयाच्या एका कोपऱ्यातमाझा एक कप्पाअजून शिल्लक आहे….. - [राग कुणाचा धरू कशाला](https://parkhiarts.in/poem/2464/): राग कुणाचा धरू कशालाद्वेष कुणाचा करू कशालाचार दिवसाचे जगणे इथलेदुखवून सर्वांना मरू कशाला.. जमले नाही जे करावया गेलोअपेक्षांचे भार वहावया गेलोज्यांची आस नव्हती कधीहीस्वप्न का मी ते पहावया गेलो.. मनासारखे का कुठे घडते येथेजखम बसलेली चिघळते येथेतप्त तव्यावर रोजच आतामेनासम आयुष्य वितळते येथे.. कोणी कुणाचा जगी होत नसतोजीव कुणासाठी कोणी देत नसतोमाझ्यावाचून कुणाचे का अडले होतेहिशोब आपला कोणी का घेत नसतो.. खंत नाही जराही उरात आताकाहीच उरले नाही घरात आतादिसते जसे जग ते नसते कधीहीकाढू नका पुन्हा नुसती वरात आता.. - [फुललेला मोगरा](https://parkhiarts.in/poem/2460/): माझ्याकडे पाहून…..तुझ्या दारावरफुललेला मोगरामला डीवचतकिती हसतोयहर्षाने….!मी म्हणालोमस्त हसून घे बेटाकधीकाळीमला हसविणारी तीआज तुझ्या सोबतीला आहेती जिकडे असतेतिकडेआनंदी आनंदच असतो गड्या…. - [आपण मला ओळखता,पुरेसं आहे.](https://parkhiarts.in/story/2456/): ●आपण आपल्या जीवनात नेमकं काय कमावलं हे आजच्या दिवशी आपल्याला माहीत पडतं,तुमच्याकडे किती पैसा आहे,तुम्ही किती श्रीमंत आहात हे कोणी पाहत नाही,तुम्ही कधी,कुठे लोकांच्या किती कामी पडलात आणि लोकांसोबत तुमचे संबंध कसे आहेत यावरून तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब समाजात उमटत असते,मी इतरांसाठी खूप काही केलं असं अजिबात नाही माझ्याच्याने जे शक्य झालं ते प्रत्येक गोष्टीत करत आलोय,तेही तुम्हा सर्वांचे सहकार्य घेऊन! एखाद्याला मदत ही केवळ पैशानेच करता येते हा गैरसमज आहे,छोट्या छोट्या गोष्टीतूनही समोरच्याला आनंद देता येतो आणि तो प्रत्येक वेळी मी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलोय,कित्येक अनोळखी ज्यांची प्रत्यक्षात कधी भेटही झाली नाही त्यांच्याही अनलिमिटेड शुभेच्छा मिळाल्या,मेसेंजर,इन्स्टाग्राम,फेसबुक,व्हाट्सएप शुभेच्छांनी भरून गेलय, […] - [नातं तुझं नि माझं](https://parkhiarts.in/poem/2452/): नातं तुझं नि माझंऊन पावसाचा खेळ,तुझ्या मिठीत येण्यानाही मिळत सवड!प्रश्न भाकरीचा येतोजातो शोधण्यात वेळ,बसेना तुझ्यासाठीकसलाच ताळमेळ!वेदना कुणा सांगूतू नसता जवळ,दुःखी मनाची होईनेहमीच जळजळ!ये मिठीत सखयेनको सावळा गोंधळ,मुक्त जगून घेऊथोडा उरलेला वेळ! - [हिंदुत्व](https://parkhiarts.in/article/2400/): हिंदुत्व समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण मला घ्यायला आनंद वाटेल,आपलं हिंदुत्व नेमकं कसं आहे ते या उदाहरणामुळे आपल्या चांगलं लक्षात येईल.हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे,वेद,पुराण,मनुस्मृती यामध्ये यज्ञात गायीला कापून खाण्याची उदाहरणे दिसून येतात,सावरकर यांनी गाय ही उपयुक्त पशु असून तिला कापून खाल्ले पाहिजे,गाय पशु आहे देवता तर नाहीच नाही असे देखील आपल्या पुस्तकात म्हटले आहे(पुस्तक:समग्र सावरकर वाङमय, खंड 5,क्ष किरण निबंध) असे असून देखील आपल्या हिंदू धर्मात गायीला देवस्थानी ठेवून पूज्य मानले आहे हे न कळणारं गणित आहे,वास्तविकता गायीला,निसर्गाला,प्राण्यांना पूज्य मानणे हा सिंधू,द्रवीळ संस्कृतीचा एक भाग होता,सिंधू,द्रवीळ संस्कृतीत गाय किंवा कोणत्याही पाळीव प्राण्यांची हत्या करून ते भक्षण केल्या जात […] - [माझा धर्म आणि मी](https://parkhiarts.in/article/2399/): ◾मी एक हिंदू म्हणून माझ्या धर्मातील ग्रंथांचा जेंव्हा अभ्यास करण्याचे ठरवतो त्यावेळी माझ्यासमोर प्रामुख्याने हिंदू धर्मातील वेद, उपनिषदे, पुराण,मनुस्मृती,रामायण,महाभारत,भगवतगीता अशा कथा किंवा अशाच ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो,सर्व सामान्य स्वतःला हिंदू समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही हेच करावे लागते.कित्येक लोकांना धर्मावर बोललेलं आवडत नाही किंवा कोणताही अभ्यास नसल्याने राईचा पर्वत करून विरोध करत बसतात परंतु हे ग्रंथ खरेच आपल्या जगण्याचा आधार आहेत का? हे ग्रंथ आपण जे जीवन जगतो त्याला उच्च दर्जाचे सामाजिक जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करतात का?ते मानवाला चांगला मार्ग दाखवतात का? या गोष्टींचा कधी विचार करत नाहीत.या साऱ्या प्रश्नांचे उत्तर आपण या ग्रंथाची पडताडणी जसे करत जाऊ तस तसे आपल्याला खरे […] - [बाबांचा लेकरासोबत शेवटचा फोटो](https://parkhiarts.in/photos/2343/) - [परिवर्तन](https://parkhiarts.in/story/2339/): जीवनात काही गोष्टी अशा घडत गेल्या की माझ्यात थोडेबहुत का होईना परिवर्तन होत गेले,माझ्या जीवन जगण्याच्या तऱ्हा बदलत गेल्या,मी त्याच वेगाने बदलत गेलो,सुरुवातीला मी एक पक्का राजकारणी होतो,वडीलांपासून मिळालेले ते खानदानी गुण होते,राजकारणाच्या घोळात इतरांबद्दल द्वेषाची भावना कायम मनात रेंगाळत असायची,त्याने आपले वाईट करण्याचा प्रयत्न केला ना मग आपणही त्याच पद्धतीने समोरच्या व्यक्तीशी वागायचं ही भावना जोर धरू लागली,प्रत्येक गावात साहजिक राजकारणाचे गट तट असतात,माणसाच्या मनात कपट, द्वेष असल्याशिवाय राजकारण करताच येत नाही ही राजकारणाची पहिली पायरी मी ओलांडली होती, राजकारण करताना बहुमताने निवडून आल्यानंतर गावातील दुसऱ्या गटाशी कायम विरोधी दृष्टीने वागत गेलो,तो कदाचित वयाचाही फरक असू शकतो तारुण्यात अंगात […] - [बघ विसरता येत असेल तर....](https://parkhiarts.in/story/2330/): रिमझिम पाऊस पडत होता,कदाचित मृगाचा तो पहिलाच पाऊस असावा! वातावरणात मंद असा मातीचा सुगंध पसरला होता,रिपरिप पडणाऱ्या पावसाचा स्पष्ट आवाज कानावर पडत होता,कित्येक वर्षानंतर मला तुला भेटायचं आहे केवळ एवढ्याच शब्दात एक मॅसेज मोबाईलवर आला होता,तिचा नंबर मोबाईलमध्ये नसल्याने नक्की भेटणारी व्यक्ती कोण असू शकेल ही उत्कंठा मनाला लागली होती परंतु दुसऱ्याच मॅसेजने ती उत्कंठा काळजीत परावर्तित झाली होती,पाऊस सुरू झाल्याने तिच्या येण्याची आशा आता जवळपास धूसर झाली होती पण मन मानायला तयार नव्हते,राहून राहून मी मोबाईल मध्येच उघडून पाहत होतो की तीने न येण्याचा मॅसेज तर नाही पाठवला, मनात विचारांची गर्दी झाली होती की इतक्या वर्षानंतर असं काय काम […] - [द अनटोल्ड स्टोरी!](https://parkhiarts.in/story/2326/): राहू दे मिठीत तुझ्या,दूर ढकलू नको,गुपित दोघातले,कुठे उकलू नको….ऑफिसमध्ये कामात गुंतून असल्याने आणि कामाने अगदीच अस्वस्थ झाल्याने जरा पाय लांब करून खुर्चीवरच रिलॅक्स झालो होतो.काम आटोपल्यानंतर फुलांचे,झाडांचे फोटो काढायचा आपला विशेष छंद पार पाडावा असा विचार मनात रेंगाळत होता तेवढ्यात बाजूला ठेवलेल्या मोबाईलवर फोन आला,नंबर अन्होंन होता पण खाली गोवा असं लोकेशन दाखवत होतं! वाटलं आलाच आहे तर उचलून बघावं,तसेही दिवसभर कामानिमित्त कुठून ना कुठून अन्होंन नंबरनी फोन येतच असतात आणि असा फोन येणं माझ्यासाठी काही नवलाचं नव्हतच!हॅलो…..”ओळखलं का?”समोरून खूप मधुर आवाजात एका स्त्रीचा आवाज आला,नंबर अन्होंन, वरून ओळखला का म्हणून तीच विचारते…लांब पाय सोडलेले आपोआप जवळ आले आणि खुर्चीवर […] - [तुझ्या कुशीत...](https://parkhiarts.in/poem/2319/): तुझ्या कुशीत मी शांत विसावतोअन तुझ्या मुलायम केसातुनहळूच हात फिरवतोतेंव्हा तू घट्ट मिटून घेतेस डोळे….माझ्या छातीवर जेंव्हाडोकं असतं तुझं निर्विकारपणेतेंव्हा असंख्य प्रश्न सुटलेले असताततुझ्या मनातले…तूही स्तब्ध अन् मीही स्तब्धचदोघांच्या मनात बोलायचं असतंबरच काही….सोडवायची असतात असंख्य कोडीअसंख्य प्रश्नेही….पण ओठांवर कधी ती येतच नाहीत..काय यालाच तर प्रेम म्हणत नाही?दूर असलो की तुझी आठवण का येतेहाच तर मोठा प्रश्न आहे,मोठं कोडं आहे, माझ्यासाठी….. - [तुझ्याशिवाय….](https://parkhiarts.in/poem/2315/): ना तू धोका दिलासना मी धोकेबाज होतोतू नाकारलसतोच माझ्या आयुष्याचाटर्निंग पॉईंट ठरला…माझ्यासमोर तेंव्हादोनच पर्याय होते,दोनच प्रश्न होते…..प्रेम की पोट ?मी पोट निवडलंअन् त्याचवेळीपोटासाठी पायपीट करण्यासमी कायमचा मोकळा झालो….तुझ्याशिवाय…. - [प्रेम असावं..](https://parkhiarts.in/poem/2310/): प्रेम असावं निरपेक्ष,आभाळासारखं निरभ्र….जीव ओतून केलेलं…निर्मळ आणि शूभ्र….मावळत्या सूर्यासारखी ऊबदारअसावी,सोबतीची जाणीव….सगळे आसपास असले…तरी…भासावी एक उणीव…सागरासारखा अथांग असावा विश्वास…..एक दुसऱ्यासाठीचघ्यावा आयुष्याचा प्रत्येक श्वास….हातातून वाळूसारखे निसटून जातात कण…आयुष्यात अस्तव्यस्त,तुझ्या असण्याचे क्षण,का? कुठे, सलते तुझी एक एक आठवण….... - [माझ्या नोकरीच्या प्रवासात.](https://parkhiarts.in/story/2306/): माझ्या नोकरीच्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी घडून गेल्या,ज्या गोष्टींनी माझे किती भले झाले हे जरी सांगता येत नसले तरी माझ्या कृतीने कुणाचे तरी थोडेफार का होईना चांगले झाले असेल असे वाटते.आपल्या कठीण प्रसंगातही आपल्या हातून काहीतरी चांगले जेंव्हा घडते तेंव्हा तो आनंद,ते समाधान माणसाला शब्दात व्यक्त करता येत नाही.जीवन क्षणभंगुर आहे, आज आपण आहोत उद्या नाही परंतु आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाचे परिणाम हे सदैव चांगले येत असतात,त्या कामांमुळे आपल्या जीवनात काही ना काही सकारात्मक गोष्टी घडत जातात.आपण जे करू त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चांगले,वाईट परिणाम आपल्या जीवनावर होत असतात आणि त्यासाठी वेळेनुसार आपल्या जीवनात स्वतःच्या आचरणात,विचारात परिवर्तन घडवून घेणे जरुरी […] - [ती....](https://parkhiarts.in/poem/2302/): कोणीही आजारी असलं की तीसतत दवाखान्यात चोवीस तासबसायची काळजी घेत….ती नेहमी म्हणायचीमाझ्या डोक्यावर पाय देऊनतू आलासउष्ट दूध प्यायला आईचं…ती भांडली,बोलली वा शिव्याहीदिल्या असतील तिनेअन् निघूनही गेली गळबळीतन सांगताचकायमची….राख्या दिसतात बाजारातभावांच्या हातांवरत्यांच्या बहिणींनी बांधलेल्याआतारिकामाच असतो माझा हातपोरका,अनाथ….. - [ठेचा लागल्याशिवाय](https://parkhiarts.in/article/2298/): ■आयुष्यात जीवन जगताना ठेचा लागल्याशिवाय माणूस सुधरत नाही असं म्हटल्या जातं,ठेचा आणि चुका ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येईल.ठेचा परिस्थितीने लागल्या जातात तर चुका करणे हा मानवी स्वभाव असतो परंतु दोन्ही बाबतीत माणसाने योग्य पावले उचलली नाही तर त्या ठेचा,त्या चुका माणसाला माणसातून उठविल्याशिवाय राहत नाही आणि गंमत म्हणजे माणसाच्या हातून चूक झाल्याशिवाय ठेचा सुद्धा लागत नाही.मी जगतांना स्वतः नेहमी एक मुद्दा ठाम ठेवतो,तो म्हणजे कोणताही प्रश्न असो त्याला उत्तर असतच फक्त ते शोधण्याची ताकद स्वतःमध्ये असली पाहिजे आणि तीच तंतोतंत गोष्ट चुका आणि ठेचांसाठीही लागू पडते! प्रत्येक ठेच माणसाला काहींना का शिकवत असते तर चूक माणसाला सुधारण्याची संधी […] - [गोष्ट हिप्नॉटीजमची](https://parkhiarts.in/story/2294/): ▪️मी ज्यावेळेला राजस्थानमध्ये नोकरिनिमित्याने होतो त्यावेळेस माझा मित्र म्हणाला की यार भिलवाड्यामध्ये एक जोतिष्य राहतात जे तंतोतंत भविष्य सांगतात,चल एकदा त्याच्याकडे जाऊन येऊ! अर्थातच भविष्य,भोगसाधु,भोंदूबाबा असल्या लोकांवर विश्वास नसल्याने मी त्याला स्पष्ट नकार दिला. पण मित्र अधिकच विनंती करू लागला की खरं खोटं नंतर बघू पण एकदा जाऊन तर येऊ,तो काय सांगतो किंवा तो काय करायला लावतो ते बघू,त्याने सांगितलेले करणे न करणे आपल्या हातात आहे,जाऊन पाहायला काय हरकत आहे. मी तयार झालो म्हटलं चला एकदा बघूच शेवटी किती खरं किती खोटं ते सुद्धा कळेल.▪️राजस्थानातील भिलवाडा हे शहर आपल्या चंद्रपूर जिल्ह्यासारखं जिल्ह्याचं ठिकाण आहे,त्याठिकाणी जवळपास 2500च्या वर कपडा मिल्स आहेत,ज्यात […] - [तुझ्या जन्माची गोष्ट](https://parkhiarts.in/story/2005/): ●तुझ्या जन्माची बातमी गौतमने कम्पणीच्या गेटवर दिली तेंव्हा पाठीवर पन्नास किलोची युरियाची बॅग होती,आधी एक मुलगी आणि तू दुसरा मुलगा म्हटल्यावर जो नैसर्गिक आनंद माणसाला होतो तोच आनंद मला झाला होता,पती खांद्यावरची बॅग अलगद खाली ठेवली आणि सायकल एवढी दापटली की दोन किलोमीटरचे अंतर केवळ पाच मिनिटात पार केले,तुझा जन्म झाला तेंव्हा सकाळचे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली होती,तो कामाचा थकवा,ते घामेजलेलं शरीर कसलीच जाणीव त्यावेळेला नव्हती,माझा अंश चेहऱ्याने कसा दिसतो याकडेच डोळे लागलेले होते,त्यावेळेला काही झालंच तर दवाखान्यात न्यायला सुद्धा जवळ एक दमडी शिल्लक नव्हती,महिनाभर कम्पणीत जाणं आणि महिन्यापोटी सतराशे रुपये पगार घेऊन घर चालवणं,दवाखान्यात नेण्याचा खर्च मात्र तू […] - [स्टेटस..](https://parkhiarts.in/article/1997/): माळ्याच्या स्टेटसवर म.फुलेंचं चित्र दिसलंमहारांच्या स्टेटसवर आंबेडकरांचं चित्र दिसलंचांभाराच्या स्टेटसवर रविदासाचं चित्र दिसलंकुणब्याच्या स्टेटसवर छ.शिवाजीचं चित्र दिसलंतेंव्हा ह्या सगळ्यांची जयंती किंवा पुण्यतिथी होती….हातात झेंडे,नैनटीच्या जोशात,डीजेच्या जोरातहे सगळ्याच ठिकाणी नॉर्मल होतं….स्टेटसवर जातीनिहाय जनगणना झालीआजकाल विचार बिचार काय नसतो होकुणब्याला बाबासाहेब अजूनही खालच्याच जातीतला वाटतोतर तोंडाने जय भीम म्हणून कापायच्या गोष्टी करणारे आंबेडकरी शेवटी जात पाहूनच माती खातात….सोयीपुरता आंबेडकर आणि बुद्धाची अहिंसा वापरायला बहुतांशी आंबेडकरी विचारवंत शिकलेत आता…यांना कापायचं कोणाला हेच ठाऊक नसल्याने गावातला कुणबी,तेली,माळी हाच एक नंबरचा दुष्मन वाटतो तरस्वतःला उच्चवर्णीय समजणारे कुणबी जगन्नाथातच लिन होऊन गेलेत….जयंतीला मोठा भगवा झेंडा चौकात लावण्याशिवाय दुसरं काम नाही…सख्या भावाच्या शेताच्या बांधावरच्या झगळ्यात बुद्धाची अहिंसा […] - [पैसा..](https://parkhiarts.in/article/1993/): पैसा कोण किती खर्च करतो यापेक्षा कोण किती वाचवतो याला मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनात खूप मोठं महत्व आहे.तुम्ही एखाद्या संकटात असाल तर पैशाचे महत्व दुप्पट वाढते तर तुम्ही सुखात असाल तेंव्हा पैशाची किंमत आपोआपच तुम्ही स्वतःहून कमी करत असता.तुमच्याकडे पैशाची आवक जशी वाढते तशी तो नसल्या ठिकाणी खर्च करण्यास तुमचे मन उताविळ होत असते तर पैशाची चणचण जेंव्हा भासते तेंव्हा तुमच्या हातावर कोणी कवडीही ठेवत नाही. हीच सामान्य माणसाची मेन्टोस जिंदगी असते………▪️साधारणतः मध्यमवर्गीय माणूस स्वतःच्या चुकांनी,बेलगाम शौकानी आणि अनाठायी खर्चानी स्वतःला दुःखात लोटून घेत असतो,आपली आवक मोजकी असताना जावक वाढली की अतिरिक्त भार ही जिंदगी सोसू शकत नाही. माणसाला जगण्यासाठी फार […] - [लफड्याचं राजकारण..](https://parkhiarts.in/article/1988/): ◾त्याच्या पाप पुण्याचा हिशोब एकदा झालाच की मग त्याचा हिशोब करायला तुम्हाला सुपारी दिली तरी कोण? माणूस जिवंत असताना माझा भाऊ,माझा भाऊ म्हणत नसलेल्या प्रेमाचे पूल बांधायचे आणि तो मेला रे मेला की अबब केवढा लफडेबाज माणूस होता म्हणून गावभर डफरा घेऊन बोंबलत सुटायचं, काय हे, ही कसली नीतिमत्ता! एखाद्यावर चिखल उडविण्याचा अधिकार आपल्याला नक्की देतो तरी कोण? माणूस सार्वजनिक जीवनात वावरत असेल, तो एखादा राजकीय नेता असेल तर त्याच्या कामाविषयी बोलण्याचा नक्कीच तुम्हाला अधिकार असतो कारण तुम्ही त्याला तुमचे अमूल्य मत देऊन तुमच्या कामांसाठी त्याला निवडून दिलेले असते परंतु तरीही त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार मिळत असतो का,अर्थातच […] - [नात्यातलं ग्रीस संपलं कि ..](https://parkhiarts.in/article/1984/): ▪️लग्नाच्या वाढदिवसाला प्रत्येक जण आपल्या बायकोवर लिहितो,तू होती म्हणून माणसात आलो,तू होती म्हणून माझा संसार यशस्वी झाला,तू होती म्हणून माझ्या आयुष्यात संकटावर मात करू शकलो,तू कधी रुसलीस कधी फुगलीस कधी उपाशी झोपलीस पण तक्रार नाही केलीस इत्यादी इत्यादी. पुरुषाच्या अशा बोलण्या पुरत्याच गोष्टी असतात..सगळ्याच पुरुषांना आपली बायको प्रिय असतेच असे नाही,पण व्यथा दाखविण्यासाठी असे काही तरी लिहिण्याची गरज भासते,काही जणांची लग्नाच्या एका वर्षात अप्रिय व्हायला लागते तर काही जणांना वर्ष लोटतात.कालांतराने लग्नाच्या पहिल्या वर्षात असणारं बेशुमार प्रेम झिरपू झिरपू आटून जाते.▪️माणूस एक नंबरचा बदमाश प्राणी असतो,एकीकडे बायकोवर अत्युच्च प्रेम दाखवतो तर दुसरीकडे तिला दगाही देत असतो.माणसापेक्षा बाया तीक्ष्ण असतात,आपला नवरा […] - [काय असतं प्रेम](https://parkhiarts.in/poem/1831/): काय असतं प्रेमदूर असून कायम हुरहूर असते हृदयातते असतं प्रेम……ती जवळ नसतानाही तीच मनात घुटमळतेते असतं प्रेम……कोणत्याही अपेक्षेशिवाय तिच्यासाठीडोळ्यात असतात अश्रूते असतं प्रेम…….हक्काने तिच्या कुशीत विसावता येतेते असतं प्रेम……..तिच्यासाठी तिच्या दुःखासाठीहीमनात होतात वेदनाते असतं प्रेम…….आकर्षण,वासना,स्वार्थावरत्यागाने मिळविलेला विजयम्हणजेच असतं प्रेम…… - [माणूस](https://parkhiarts.in/poem/1827/): आपलं कुणीतरी असावंआपण कुणासाठी तरी असावंकोणीतरी आठवण काढावी आपलीआपल्या आठवणीत कोणीतरी असावं….जगताना थोड्या आयुष्यातथोडं दुसऱ्यांसाठी झटावंआपल्या हृदयानेही एखाद्यासाठीतीळ तीळ तुटावं…..कधी जगून पहा असं कीसगळे हळहळले पाहिजेतुझ्या हृदयातून माझ्यासाठीरक्त भळभळले पाहिजे….चार दिवसाची जिंदगी हीकाय कुणावर रुसावंअंधार जाऊन उजेड येतोचमग उगाच का रडत बसावं..…. - [वय वर्ष पंचेचाळीस!](https://parkhiarts.in/story/1823/): ■आज मी हे जे काही लिहितोय ते मला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी कंटाळा आला तरी पूर्ण वाचावे ही माझी विनंती आहे.आयुष्यात दुःख नसतं तर सुखाची किंमत कळली नसती अन माणसाच्या आयुष्यात नाती नसती तर रुक्ष आयुष्यात प्रेमाचा गोळवा कधीच निर्माण झाला नसता.आयुष्यातून एक एक दिवस वजा होताना जो दिवस आपण मोठ्या आनंदात साजरा करतो तो दिवस म्हणजे आपला वाढदिवस असतो! आणि हाच वाढदिवस आपल्या सोबत जी नाती साजरी करतात ती तुमच्यावर निस्वार्थ प्रेम असल्याचा दाखला देऊन जातात.आयुष्य म्हणलं की सुख दुःखाची रेलचेल असतेच पण दुःखाचे क्षण माणसाला आठवणीत राहतात तर सुखाचे असंख्य क्षण माणूस क्षणात विसरून जातो नव्हे हा तर […] - [मुलगी होऊन जा…….](https://parkhiarts.in/poem/1819/): ती आज पहिल्यांदातीचं घर सोडत होतीआई,वडील,भाऊसगळ्यांनाच सोडूननव्या घराचा उंबरठाओलांडत होती… खांद्यावर डोकं ठेवूनहमसून हमसून रडत होतीआईचा हुंदका दाटत होताबापाच्या डोळ्यातले अश्रूडोळ्यात होतेतो तिच्या डोळ्यातले शेवटचेअश्रू पुसत होता…. सासू सासऱ्यांकडे बोट दाखवतबापाने तिलाएकच सांगितलंआता तेच तुझे माय बापत्यांचा सांभाळ करप्रत्येक सुखतुझ्या पायाशी लोळण घेईल……. सून तर कोणीही होईलत्यांच्या आयुष्यातत्यांची मुलगी होऊन जा…….. - [संसाराचा गाडा](https://parkhiarts.in/article/1815/): “बाई बाई कोण्या रांडलेक मोंढ्यानं पाजली असल एवढी, असा कसा नालीत पडला असल हा माणूस,मढं जावो पाजणाऱ्याचं,महा नवरा दारूच्या थेंबालेबी हात लावत न्हायी,तुमीस त न्हायी पाजली न यायले” बाई जोरजोरानं ओरडत होती,आम्ही मुकाट्याने ऐकत होतो कारण ज्याला नालीतून काढून त्याच्या घरी पोहचवलं ती टीम म्हणजे आम्ही होतो, तो परिचित होता,अस्सल बेवडा म्हणून त्याची गिनीज बुकात नोंद व्हायची तेवढी बाकी होती अगदी त्याच वेळेस त्याला गंध्या नालीतून दोन हात दोन पाय पकडून वर काढून वरून विहिरीतून दोन बादल्या पाणी टाकून धुतला न त्याची घरी पोहचवला होता पण कमाल ही झाली की चोराच्या उलट्या बोंबा ती बाई आम्हालाच धूत होती जसा की […] - [इतिहासाचे विद्रुपीकरण](https://parkhiarts.in/article/1712/): छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर त्यांनी कुठेही धर्माभिमान बाळगल्याचे आपल्या निदर्शनास येत नाही किंवा इतर धर्मांचा द्वेष केल्याचे दिसत नाही,जर तसे असते तर त्यांच्या मंत्रिमंडळात आणि सैन्यात कित्येक मावळे मुस्लिम नसते,इतकेच नाही तर शत्रू इतर धर्माचा का असेना मेल्यावर त्याची विटंबनासुद्धा कधी झाल्याचे त्यावेळेसच्या इतिसाच्या लेखन सामुग्रीत दिसून येत नाही. इतके असूनही त्यावेळेस इतिहासाचे लेखन करणारी भ्रष्ट जमात सत्य इतिहासाशी गद्दारी करण्यात चुकली नाही.एका विशिष्ट जातीने आपल्या सोयीचा इतिहास लिहून आमच्या महापुरुषांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण केले.■हा विद्रुपीकरणाचा सपाटा तेंव्हापासून तर आत्तापर्यंत अविरत सुरूच आहे,त्यांनी कोणालाच सोडले नाही,शिवरायानंतर छत्रपती संभाजी राजेंच्या इतिहासाचेही विद्रुपीकरण या हारामखोरांनी असेच केले आहे.संभाजी महाराजांची […] - [तिथे बुद्ध असला काय….](https://parkhiarts.in/poem/1708/): तिथे बुद्ध असला कायविठ्ठल असला कायअन् मस्जिदेच्या खालीमंदिर असले काय…!काय फरक पडतो ?बुद्ध म्हणले होते एकदाहिंसा नको,खोटं नको,चोरी नको,व्यभिचार नको अन दारूत तरअजिबात झिंगुच नकोस….काय म्हणता असे म्हणले होते बुद्ध?हे तर “कलियुगात” हाय न राव?कुठे असतो अशा गोष्टींना भाव!या गोष्टीवरच चालते राजकारण,चालतो रोजीरोटीचा प्रश्न,विठ्ठल तोच आहे,बुद्ध तोच आहेअल्हा अन मसिहाही तोच आहेकाय विचार करतोस?घे टिकास, घे फावडं! खोदून काढ मनातला मैलसापडेल तुला तो भग्नावस्थेतकुठेतरी अस्तव्यस्त….अस्तव्यस्त…. - [टक्के](https://parkhiarts.in/article/1704/): मी माझ्या अख्या जीवनात परिक्षेतल्या टक्क्यांना कधीच फार महत्व दिलं नाही,जीवन जगताना हे टक्के कुठे कामी पडतात हे मला अजूनही एक कोडच वाटत,ज्यांना टक्क्यांचं महत्व वाटतं त्यांनी स्वतःलाच विचारून बघावे की स्वतःला किती टक्के होते आणि त्या टक्क्यांनुसार त्यांचा परफॉर्मन्स होता का? अर्थातच तसा परफॉर्मन्स शंभरातून एखाद्याचाच असतो बाकी नव्यांनऊ लोकं आपण स्वतः दिलेल्या परीक्षेचे टक्केच विसरून गेलेले असतात,ह्या टक्क्यांसाठी कितीतरी पालक आपल्या पाल्ल्यांवर मानसिक दबाव टाकत असतात,दुसऱ्या एखाद्या हुशार मुलाचे प्रत्येकवेळी उदाहरण देत बसतात पण यांच्या हे लक्षात येत नाही की प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते आणि मुलांवर अशाप्रकारचा दबाव टाकून ते नकळत त्यांना नैराश्याच्या खाईत लोटत असतात.मला […] - [कडीपत्ते](https://parkhiarts.in/article/1700/): राजकारणात सत्ता,पैसा हे मुख्य केंद्रबिंदू असतात,ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे पॉवर आणि ही पॉवर ज्याच्याकडे असेल तो त्या पॉवरचा वापर चांगल्यासाठी करेल की वाईटासाठी करेल हे त्या माणसावर अवलंबून असते,माणूस उचापती नसेल तर ती पॉवर योग्य कार्यासाठी वापरली जाते तर माणूस हरामी असेल तर तीच पॉवर वाईट कारस्थानासाठी तो वापरत असतो.आज कोणीच एवढा दुधखुला नाही की राजकारणात नेमकं काय होतं हे समजत नसेल.राजकारण करण्यासाठी महत्वाचा असतो तो पैसा! मग तो कोणत्याही माध्यमाने को होईना आपल्याजवळ तो कसा जमा होईल यासाठी राजकारणी दिवस रात्र एक करत असतात, आपण ऐकतो की एखाद्या नेत्याकडे अल्पावधीत कोट्यवधी इस्टेट कशी जमा झाली जो कधीकाळी रिक्षा चालवत असे […] - [मी विठ्ठल पुजावा](https://parkhiarts.in/poem/1696/): मी विठ्ठल पुजावाकी बुद्धहे ठरवत असतो मीचमला तसे दोन्ही सारखेच वाटतातमंदिर,मस्जिद,गुरुद्वाराचर्च, बुद्धविहारया ठिकाणी मी जात नाही कधीचअहं मला फरक नसतो पडतकारण,बुद्धाचे पंचशील, विठ्ठलाची करुणाअल्लाह,येशूच्या गुणांचा लवलेशहीनाही माझ्यात…माझी पूजाअर्चा हा असतो ढोंगीपणा,मी बोलत असतो एक,वागत असतो एकश्रद्धेच्या बुरख्याआड मारत असतो मेखआता मी ही जगतोय तसाच ढोंग घेऊनतुमच्यासारखा…हो तुमच्यासारखाच….कपाडावर शेंदूर फासून…. - [यशाची पायरी](https://parkhiarts.in/article/1693/): आजच्या युगाला डिजिटल युग संबोधलं जातं, तेवढच हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेणारं युग आहे,प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाने उतुंग अशी झेप घेतली आहे आणि याच तंत्रज्ञानाचा वापर जीवनातल्या छोट्यामोठ्या गोष्टीत अगदी सहजपणे होत असल्याचे आपल्या लक्षात येते.ढोबळमानाने तंत्रज्ञानाचा मोठा वापर हा उद्योगात आणि व्यापारात होताना आज दिसतोय,जसं जसं युग बदललं तस तसा तंत्रज्ञानाने आपला आवाका वाढवायला सुरुवात केली,एखादा कारखाना असो की एखादे लहानशे दुकान असो त्याचं डिजिटायझेशन झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे.आज आपल्या जीवनातील दैनंदिन गोष्टी तंत्रज्ञानामुळे अगदी चुटकी सरशी सुटतात,आपल्या खिशात एक रुपयाही नसला तरी फोनपे,गुगलपे अशा रक्कम ट्रान्सफर करणाऱ्या प्लॅटफॉर्मनी आलेल्या अडचणींवर मात करता येते,रस्त्याच्या कडेला साधी भजी विकणारी मंडळी […] - [विसरण्याची शक्ती](https://parkhiarts.in/article/1689/): निसर्गाने माणसाला सर्वात मोठी शक्ती दिली आहे,ती म्हणजे विसरण्याची! विसरण्याची शक्ती एवढी बलवान असते की त्या शक्तीने माणसाच्या जीवनात कितीही वाईट घटना घडू द्या कालांतराने तो ती घटना विसरतोच! आणि त्या विसरण्याच्या वरदानाने माणसाचं एकंदरीत जीवन सुकर झालेलं आहे.जीवनातल्या वाईट साईट घटना,गोष्टी माणूस विसरू शकला नसता तर त्याच घटनांमध्ये,त्याच दुःखामध्ये त्याचे उरलेले जीवन सुद्धा दुःखद बनले असते.माणसाच्या जीवनात चढ उतार नसते,दुःख नसते तर माणसाला त्याच्या जीवनात आलेल्या सुखाचे,त्याला मिळालेल्या जीवनाचे महत्व कळले नसते. एका नामांकित वृत्तपत्राची एक हेडिंग वाचनात आली “कुटुंबासाठी तब्बल इतक्या हजार कोटी रुपयांची संपत्ती मागे सोडून गेले सायरस मिस्त्री” म्हणजे माणसाची किंमत किती शून्य आहे,किती भावनाशून्य झालो […] - [माह्या लग्नाची गोष्ट](https://parkhiarts.in/story/1685/): लग्न झालं त्यावेळी माझ्याकडं कवडीची अक्कल नोयती,माह्या वयाच्या एकविसव्या वर्षीच माय बापानं पोरगं जास्त वयाचं झालं त बिघडून जाईन म्हणून लग्न उरकून टाकाचं ठरवलं,त्याले कारण बी तसच होतं,बारावी पास होऊन बीएच्या फस्ट यिअरले शिकत होतो,सोबत त्यावेळी फ्लॉपी डिस्कवाल्या कम्प्युटरचा जमाना होता,नुसत्या कमांडवर कम्प्युटर चालवा लागाचं,तो बी कोर्स सातोसात निपटवत होतो तर लग्न उरकवाचं कारण हे होतं की एक दिवस मायेलें कपडे धुतानी एक फोटो माह्या शर्टाच्या खिशात सापडला,माय तितरबीतर झाली,थो फोटो घेऊन डायरेक्ट बापाकडं दाखवाले घेऊन गेली,बापानं बी काही खातरजमा न करता लगोलग कुटलं! चांगलं पेडसल्यावर फोटू दाखवत विचारलं “काय होय बे धंदे,तुझं वय किती न अशे गायरान धंदे कराले […] - [जे सत्य ते स्वीकारले पाहिजे.](https://parkhiarts.in/article/1539/): ■धर्म श्रद्धा,कर्मकांड,देवत्व या माझ्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी म्हणून या गोष्टींना कधीच खूप महत्व दिले नाही परंतु कोणी देव,श्रद्धा यावर विश्वास ठेवून भक्ती करत असेल,देवाच्या पाया पडत असेल,अगरबत्ती लावत असेल तर कधी या गोष्टीचा विरोधही केला नाही कारण विरोध करून काही उपयोग होत नसतो,देव ही कल्पना माणूस जन्माला आल्यापासून घरातल्या आणि सामाजिक वातावरणामुळे त्याच्या मनात घट्ट बसलेली असते ती सहजासहजी काढून फेकता येत नाही,वर्षानुवर्षे ही संकल्पना चालत आली आहे,आमच्या आजोबांनी देव पुजले म्हणून आमच्या बापानी देव पुजले आणि बापानी पुजले म्हणून आपण पूजत असतो परंतु साधा प्रश्न डोक्यात निर्माण होत नाही की यामुळे आपणास कोणता लाभ होतो,देव न पूजल्यास कोणती हानी […] ## Pages - [साहित्य मित्रांचे](https://parkhiarts.in/articles_friends/): नमस्कार! माझ्या वाचक मित्र,मैत्रिणी आणि युवक मित्रांनो, मी उमेश पारखी, माझ्यासोबत मित्रांचेही साहित्य आपणास वाचायला मिळावे म्हणून त्यांच्यासाठीही हे एक पान निर्माण केले आहे,आस्वाद घ्यावा! माझ्या संकेतस्थळावर पुनश्च स्वागत आहे.! धन्यवाद ! - [Home](https://parkhiarts.in/): नमस्कार मित्रहो माझे साहित्य वाचण्यासाठी खालील स्तंभावर भेट द्या ! 21 लेख नांदगाव – मनातल्या नोंदी 226 लेख जगण्याचं मॅनेजमेंट 178 लेख झुंडी… 27 फेसबुक पोस्ट संकलन प्रचार खोट्यास खपवी बाजारी.. 26 फेसबुक पोस्ट संकलन नक्की चूक कोणाची? 26 लेख मनी नाही भाव… 577 लेख झुटोंने झूटोंसे कहा.. 570 काव्य तो कृष्ण 811 काव्य शब्दांचे इमले 641 काव्य बाबासाहेब Available on Amazon Click on image to Purchase this book. Available on Amazon Click on image to Purchase this book. Purchase from Me Click on image to Purchase this book. Proudly Made By ParkhiArts-+917744042359 - [समीक्षा](https://parkhiarts.in/books/): पुस्तक-समीक्षण 523 समीक्षण नशीब नाहीच प्रयत्नवादी व्हा!-समीक्षण 648 समीक्षण मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा-समीक्षण 453 समीक्षण काळजाची स्पंदने – समीक्षण 446 समीक्षण हिंदुत्व देश तोडणारे सूत्र-समीक्षण 664 समीक्षण देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे-समीक्षण 652 समीक्षण मनातलं सारं काही : समीक्षण - [ग्रंथालय](https://parkhiarts.in/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af/): खालील पुस्तके PDF स्वरूपात आहेत,वाचण्यासाठी पुस्तकावर क्लिक करा. [dflip id=”3106″ type=”thumb” ][/dflip][dflip id=”2886″ type=”thumb” ][/dflip][dflip id=”3119″ type=”thumb” ][/dflip][dflip id=”3125″ type=”thumb” ][/dflip][dflip id=”3129″ type=”thumb” ][/dflip][dflip id=”3133″ type=”thumb” ][/dflip][dflip id=”6539″ type=”thumb” ][/dflip][dflip id=”3106″ type=”thumb” ][/dflip][dflip id=”2886″ type=”thumb” ][/dflip][dflip id=”3119″ type=”thumb” ][/dflip][dflip id=”3125″ type=”thumb” ][/dflip][dflip id=”3129″ type=”thumb” ][/dflip][dflip id=”3133″ type=”thumb” ][/dflip][dflip id=”6539″ type=”thumb” ][/dflip] - [Page 404](https://parkhiarts.in/page-404/): 404 The page you were looking for couldn’t be found Go back to Homepage - [गॅलरी](https://parkhiarts.in/gallery/): 84 लेख झुंडी… Posted on14/11/202514/11/2025 3 फेसबुक पोस्ट संकलन प्रचार खोट्यास खपवी बाजारी.. Posted on14/11/202514/11/2025 3 फेसबुक पोस्ट संकलन नक्की चूक कोणाची? Posted on14/11/202514/11/2025 9 लेख मनी नाही भाव… Posted on14/11/202514/11/2025 555 लेख झुटोंने झूटोंसे कहा.. Posted on03/08/202303/08/2023 549 काव्य तो कृष्ण Posted on13/07/202314/11/2025 - [कथा](https://parkhiarts.in/stories/): कथा-आत्मकथा 670 कथा अतृप्त ईच्छा 720 कथा तुझ्या जन्माची गोष्ट : आठवण 412 कथा आई 354 कथा माझा प्रवास… 364 कथा माझं प्रिय घर 377 कथा आपण मला ओळखता,पुरेसं आहे. 659 कथा परिवर्तन 974 कथा बघ विसरता येत असेल तर…. 666 कथा द अनटोल्ड स्टोरी! 706 कथा माझ्या नोकरीच्या प्रवासात. 327 कथा गोष्ट हिप्नॉटीजमची 299 कथा तुझ्या जन्माची गोष्ट 309 कथा वय वर्ष पंचेचाळीस! 501 कथा माह्या लग्नाची गोष्ट 469 कथा गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात… - [लेख प्रपंच](https://parkhiarts.in/articles/): लेख-प्रपंच 84 लेख झुंडी… 9 लेख मनी नाही भाव… 555 लेख झुटोंने झूटोंसे कहा.. 678 लेख धर्म 564 लेख कामगार 1066 लेख प्रश्न सत्तेलाच विचारायचे असतात! 559 लेख रामप्पा मंदिर 861 लेख फुकटचे सल्ले… 387 लेख लफडं, प्रेम आणि संसार…. 429 लेख पैसा हा काळा किंवा पांढरा नसतो.. 420 लेख कायमचे हद्दपार करायचे असते 673 लेख एका संघर्षाची गोष्ट 526 लेख माझा धर्म ? 658 लेख साहित्यिक जमात 643 लेख हिंदुत्व 1081 लेख माझा धर्म आणि मी 178 लेख ठेचा लागल्याशिवाय 453 लेख स्टेटस.. 288 लेख पैसा.. 500 लेख लफड्याचं राजकारण.. 272 लेख नात्यातलं ग्रीस संपलं कि .. 206 लेख […] - [काव्य दालन](https://parkhiarts.in/poems/): काव्य-दालन 549 काव्य तो कृष्ण 790 काव्य शब्दांचे इमले 625 काव्य बाबासाहेब 407 काव्य काय सर तुम्ही ? 425 काव्य ठरवायचं असतं प्रत्येकानं 415 काव्य देह नश्वर आहे 440 काव्य मी खोटे बोलेन 387 काव्य मी वाहतो कुठेही…. 545 काव्य दोस्ता 622 काव्य दुःखात आनंद 378 काव्य तू दुधावरची साय 416 काव्य पाटीलकी 340 काव्य गेलेले दिवस 355 काव्य तुझिया शब्दाला 626 काव्य मूठभर लोक 379 काव्य पावसाची धुंद सर 665 काव्य अस्पृश्य… 656 काव्य तू दिसलीस बऱ्याच दिवसांनी 703 काव्य पोटातली भूक,पोटात मारली…. 651 काव्य बघ बाबासाहेब दिसतो का…..? 716 काव्य तुझ्या गुलाबी ओठावर 641 काव्य तू लढ म्हणतोस […] - [Disclaimer](https://parkhiarts.in/disclaimer/): Disclaimer The information contained on this website (the “Website”) is for general informational purposes only. The content provided is not intended to be a substitute for professional advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of qualified professionals regarding any specific questions or concerns you may have.   Accuracy of Information   While we strive to provide accurate and up-to-date information on the Website, we make no representations or warranties of any kind, express or implied, about the completeness, accuracy, reliability, suitability, or availability with respect to the Website or the information, products, services, or related graphics contained on the […] - [Cookies Policy](https://parkhiarts.in/cookies-policy/): Cookies Policy This website (the “Website”) uses cookies and similar technologies to enhance your experience and provide you with personalized content and services. By using the Website, you consent to the use of cookies in accordance with this Cookies Policy.   What Are Cookies?   Cookies are small text files that are placed on your device (computer, smartphone, or tablet) when you visit the Website. They are widely used to make websites work more efficiently, improve user experience, and provide anonymized tracking data to website owners.   How We Use Cookies   We use cookies for the following purposes:   […] - [Disclosure/Advertising Policy](https://parkhiarts.in/disclosure-advertising-policy/): Disclosure/Advertising Policy This Disclosure/Advertising Policy governs the manner in which sponsored content, endorsements, and advertisements are disclosed on the https://parkhiarts.in website (“Website”). Sponsored Content Some of the content on this Website may be sponsored or paid. This means that a third party has compensated us to publish specific content. We only accept sponsored content from companies or individuals that align with our values and are relevant to our audience. Sponsored content is clearly identified as such and may be labeled as “sponsored,” “paid,” “promoted,” or similar terms. Endorsements We may occasionally endorse products, services, or companies on the Website. These […] - [Copyright Policy](https://parkhiarts.in/copyright-policy/): Copyright Policy The content on this blog, including but not limited to text, images, graphics, videos, and other materials (“Content”), is protected by copyright law. The copyright for the Content is owned by Umesh Parkhi/ https://parkhiarts.in (“We,” “Us,” or “Our”). Copyright Ownership 1. All Content on this blog is the intellectual property of Umesh Parkhi/https://parkhiarts.in unless otherwise stated. It is protected by copyright laws and international treaties. Unauthorized use, reproduction, or distribution of the Content is strictly prohibited. 2. You may not modify, publish, transmit, participate in the transfer or sale of, reproduce, create derivative works based on, distribute, display, […] - [Terms & Conditions](https://parkhiarts.in/terms-conditions/): Terms of Service These Terms of Service (“Agreement”) govern your use of the www.parkhiarts.in website (“Website”) operated by Umesh Parkhi (“We,” “Us,” or “Our”). By accessing or using the Website, you agree to be bound by these terms and conditions. 1. Blog Content a. The content on this blog is provided for general informational purposes only. We do not guarantee the accuracy, completeness, or reliability of any information or materials presented. Any reliance you place on such content is at your own risk. b. The content on this blog is the intellectual property of Umesh Parkhi/www.parkhiarts.in unless otherwise stated. Unauthorized […] - [Privacy Policy](https://parkhiarts.in/privacy-policy/): Effective Date: June 11,2023 This Privacy Policy governs the manner in which www.parkhiarts.in collects, uses, maintains, and discloses information collected from users (each, a “User”) of the  www.parkhiarts.in website (“Site”).   1. Personal Identification Information   We may collect personal identification information from Users in various ways, including but not limited to when Users visit our Site, subscribe to the newsletter, fill out a form, and in connection with other activities, services, features, or resources we make available on our Site. Users may be asked for, as appropriate, name, email address, and other relevant information. We will collect personal identification […] - [About Me](https://parkhiarts.in/about-us/): माझ्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या सर्व मित्रांचे स्वागत आणि मनःपूर्वक आभारनमस्कार मित्रांनो, मी उमेश पारखी,मु.पो.भेदोडा,ता.राजुरा,जिल्हा.चंद्रपूर  आपणा सर्वांचे माझ्या संकेतस्थळावर स्वागत आहे, माझी वेगळी अशी काय ओळख सांगू ! मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील एक सामान्य सर्वसाधारण व्यक्ती आहे.मी सुरुवात कामगार आणि शेवट कामगारच आहे,तुमच्या आमच्यातलाच,तुमच्या आस पास असलेला पालापाचोळाच जणू ! पण स्वतःचं एक अस्तित्व मात्र अबाधित ठेवून आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या वाट्याला ज्या हालअपेष्टा येतात यापेक्षा वेगळी माझी कहाणी नाही,जीवनाचा गाडा ओढता ओढता,आसूड अंगावर घेता घेता माझ्यातला लेखक,कवी कधी जागृत झाला हे माझे मलाच कळले नाही.वास्तविकता साहित्य हे माझं क्षेत्र नाही,कंपनी मध्ये म्यानेजर म्हणून काम पहात असताना कंपनी व्यवस्थापन हे माझ्या उपजिवीकेचे […] - [Contact Me](https://parkhiarts.in/contact-us/): Contact Me Email: umesh@parkhiarts.in, contact@parkhiarts.in WhatsApp: +91 7744042359 Phone :+91 7744042359 Address: Vill.Po.Bhedoda,Ta.Rajura,Dist.Chandrapur-442905 (Maharashtra State) India Send Me a Message Your email address will not be published. All the fields are required. - [Blog](https://parkhiarts.in/blog/) ## Optional - [Agent (MCP protocol)](websites-agents.hostinger.com/parkhiarts.in/mcp) [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)