[tta_listen_btn]
मी विठ्ठल पुजावा
की बुद्ध
हे ठरवत असतो मीच
मला तसे दोन्ही सारखेच वाटतात
मंदिर,मस्जिद,गुरुद्वारा
चर्च, बुद्धविहार
या ठिकाणी मी जात नाही कधीच
अहं मला फरक नसतो पडत
कारण,
बुद्धाचे पंचशील, विठ्ठलाची करुणा
अल्लाह,येशूच्या गुणांचा लवलेशही
नाही माझ्यात…
माझी पूजाअर्चा हा असतो ढोंगीपणा,
मी बोलत असतो एक,वागत असतो एक
श्रद्धेच्या बुरख्याआड मारत असतो मेख
आता मी ही जगतोय तसाच ढोंग घेऊन
तुमच्यासारखा…हो तुमच्यासारखाच….
कपाडावर शेंदूर फासून….