[tta_listen_btn]
तिथे बुद्ध असला काय
विठ्ठल असला काय
अन् मस्जिदेच्या खाली
मंदिर असले काय…!
काय फरक पडतो ?
बुद्ध म्हणले होते एकदा
हिंसा नको,खोटं नको,चोरी नको,
व्यभिचार नको अन दारूत तर
अजिबात झिंगुच नकोस….
काय म्हणता असे म्हणले होते बुद्ध?
हे तर “कलियुगात” हाय न राव?
कुठे असतो अशा गोष्टींना भाव!
या गोष्टीवरच चालते राजकारण,
चालतो रोजीरोटीचा प्रश्न,
विठ्ठल तोच आहे,बुद्ध तोच आहे
अल्हा अन मसिहाही तोच आहे
काय विचार करतोस?
घे टिकास, घे फावडं! खोदून काढ मनातला मैल
सापडेल तुला तो भग्नावस्थेत
कुठेतरी अस्तव्यस्त….अस्तव्यस्त….