मुलगी होऊन जा…….

[tta_listen_btn]


ती आज पहिल्यांदा
तीचं घर सोडत होती
आई,वडील,भाऊ
सगळ्यांनाच सोडून
नव्या घराचा उंबरठा
ओलांडत होती…

खांद्यावर डोकं ठेवून
हमसून हमसून रडत होती
आईचा हुंदका दाटत होता
बापाच्या डोळ्यातले अश्रू
डोळ्यात होते
तो तिच्या डोळ्यातले शेवटचे
अश्रू पुसत होता….

सासू सासऱ्यांकडे बोट दाखवत
बापाने तिला
एकच सांगितलं
आता तेच तुझे माय बाप
त्यांचा सांभाळ कर
प्रत्येक सुख
तुझ्या पायाशी लोळण घेईल…….

सून तर कोणीही होईल
त्यांच्या आयुष्यात
त्यांची मुलगी होऊन जा……..

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी