[tta_listen_btn]
आपलं कुणीतरी असावं
आपण कुणासाठी तरी असावं
कोणीतरी आठवण काढावी आपली
आपल्या आठवणीत कोणीतरी असावं….
जगताना थोड्या आयुष्यात
थोडं दुसऱ्यांसाठी झटावं
आपल्या हृदयानेही एखाद्यासाठी
तीळ तीळ तुटावं…..
कधी जगून पहा असं की
सगळे हळहळले पाहिजे
तुझ्या हृदयातून माझ्यासाठी
रक्त भळभळले पाहिजे….
चार दिवसाची जिंदगी ही
काय कुणावर रुसावं
अंधार जाऊन उजेड येतोच
मग उगाच का रडत बसावं..….