[tta_listen_btn]
काय असतं प्रेम
दूर असून कायम हुरहूर असते हृदयात
ते असतं प्रेम……
ती जवळ नसतानाही तीच मनात घुटमळते
ते असतं प्रेम……
कोणत्याही अपेक्षेशिवाय तिच्यासाठी
डोळ्यात असतात अश्रू
ते असतं प्रेम…….
हक्काने तिच्या कुशीत विसावता येते
ते असतं प्रेम……..
तिच्यासाठी तिच्या दुःखासाठीही
मनात होतात वेदना
ते असतं प्रेम…….
आकर्षण,वासना,स्वार्थावर
त्यागाने मिळविलेला विजय
म्हणजेच असतं प्रेम……