[tta_listen_btn]
कोणीही आजारी असलं की ती
सतत दवाखान्यात चोवीस तास
बसायची काळजी घेत….
ती नेहमी म्हणायची
माझ्या डोक्यावर पाय देऊन
तू आलास
उष्ट दूध प्यायला आईचं…
ती भांडली,बोलली वा शिव्याही
दिल्या असतील तिने
अन् निघूनही गेली गळबळीत
न सांगताच
कायमची….
राख्या दिसतात बाजारात
भावांच्या हातांवर
त्यांच्या बहिणींनी बांधलेल्या
आता
रिकामाच असतो माझा हात
पोरका,अनाथ…..