[tta_listen_btn]
तुझ्या कुशीत मी शांत विसावतो
अन तुझ्या मुलायम केसातुन
हळूच हात फिरवतो
तेंव्हा तू घट्ट मिटून घेतेस डोळे….
माझ्या छातीवर जेंव्हा
डोकं असतं तुझं निर्विकारपणे
तेंव्हा असंख्य प्रश्न सुटलेले असतात
तुझ्या मनातले…
तूही स्तब्ध अन् मीही स्तब्धच
दोघांच्या मनात बोलायचं असतं
बरच काही….
सोडवायची असतात असंख्य कोडी
असंख्य प्रश्नेही….
पण ओठांवर कधी ती येतच नाहीत..
काय यालाच तर प्रेम म्हणत नाही?
दूर असलो की तुझी आठवण का येते
हाच तर मोठा प्रश्न आहे,
मोठं कोडं आहे, माझ्यासाठी…..