[tta_listen_btn]
नातं तुझं नि माझं
ऊन पावसाचा खेळ,
तुझ्या मिठीत येण्या
नाही मिळत सवड!
प्रश्न भाकरीचा येतो
जातो शोधण्यात वेळ,
बसेना तुझ्यासाठी
कसलाच ताळमेळ!
वेदना कुणा सांगू
तू नसता जवळ,
दुःखी मनाची होई
नेहमीच जळजळ!
ये मिठीत सखये
नको सावळा गोंधळ,
मुक्त जगून घेऊ
थोडा उरलेला वेळ!