[tta_listen_btn]
तू म्हणाली
पुन्हा कधी येतोस
मी म्हणालो
भरवसा नाही..
तू म्हणालीस एकदा
माझ्या जगात
परत येऊ नकोस
मी कधीच आलो नाही
तू न बोलवताही
मला यावं लागलं
माझं मलाच समजलं नाही
पुन्हा कधी येतोस
विचारलस!
मी उमजलो नाही
मी एवढच समजून चुकलो
हृदयाच्या एका कोपऱ्यात
माझा एक कप्पा
अजून शिल्लक आहे…..