[tta_listen_btn]
सौन्दर्य चिरकालीन नसतं,
तसं …
तारुण्य देखील चिरकालीन नसतं.
सौन्दर्याचा साज आणि वयाचा माज
उतरला,
की जाणीव होत असते प्रत्येकाला!
आठवते प्रत्येकाला,
आपण भूतकाळात कसे वागलो ते…..
सौन्दर्य अन् तारुण्याच्या गर्वाने
दूर सारलेली माणसे,
उतरत्या वयात वाटतात हवीशी,
तेंव्हा नसतात कोणीही अवतीभवती
ज्यांना म्हणू शकू आपली.
आणि पश्चातापात जळायला लागतं
ते सौन्दर्य आणि तारुण्य….
वयानुसार उमटतात सुरकुत्या
चेहऱ्यावर, अन्
ओझही वाढतं जवाबदाऱ्यांचं!
तेंव्हा सारीच मस्ती
असते विझलेली……