विझून जाईन जरी

[tta_listen_btn]


विझून जाईन जरी
मी एकाच रातीतून,
पेटेन उद्या नव्याने
मिणमिणत्या वातीतून….
तप्त ज्वाला सोसल्या,
घाव झाले कितीदा,
भडभडत्या जखमेतून,
रक्त वाहिले कितीदा,
अंकुरेन उद्या नव्याने
याच मातीतून…..
विझून जाईन जरी
मी एकाच रातीतून….
छाटले ते पंख माझे,
दगा भेटला कितीदा,
दगाबाज विश्वासाने,
जीव घेतला कितीदा,
मुक्त होईन ना मी,
बरबटलेल्या जातीतून….
विझून जाईन जरी
मी एकाच रातीतून….

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी