[tta_listen_btn]
तुझ्या निखळ हास्यावर लिहू की
तुझ्या गोड स्वभावावर लिहू,
तुझ्या कोमल चेहऱ्यावर लिहू की
तुझ्या आत अनंत यातना लपवून ठेवलेल्या
तुझ्या हृदयावर लिहू,
माझ्याकडे ती पेनच नाही की
तुझ्या अंतर्मनाचा ठाव घेईल
आणि
माझ्या मनातली शाई एका कागदावर रीती होईल
एका अर्थी बरच झालं!
तू असतीस सोबतीला तर पडक्या झोपडीत,
अन,
कौलारू घराच्या छपरातून गळणाऱ्या पाण्यात,
एकाच खाटेवर छत्रीचा आडोसा घेऊन
कसे दिवस काढले असतीस,
खाटेच्या एका पायाला बकरी बांधलेली ,
अन, झोपडीच्या एका कोपऱ्यात चुलीवर चाललेला संसार,
आकाशात लख्ख चमकत असलेल्या विजांचा टाहो!
बोतरीच्या एका छिद्रातून न्याहाळताना
गरिबीची रेषा तू कशी पार केली असतीस,
कल्पना करवत नाही!
शरीर नश्वर असलं तरी शरीराचा मोह सुटत नाही,
शारीरिक भुकेसाठी हपापलेलं प्रेम खरं प्रेम असत नाही,
बरं झालं त्या कठीण प्रसंगी शारीरिक भुकेने केला असता
अतिप्रसंग तुझ्यावर!
की तू जिंकलं असतस मला,ठाऊक नाही!
शारीरिक भुके पलिकडेही असतं प्रेम!
चुलीतला निवा लासावा एकाला
आणि हृदयात यातना व्हाव्या दुसऱ्याला,
ते असतं निस्सीम प्रेम!
बरं झालं तू सोबत नाहीस!
नाही तर उगाचच खऱ्या प्रेमाची परीक्षा,
तुला द्यावी लागली असती सीतेसारखी,
आणि
भोगावे लागले असते अनंत दुःख!
लक्ष्मणाच्या उर्मिलेसारखे,
किंचितही दोष नसताना,
चवदा वर्षे!
@उमेश ०४.१२.२०१९