[tta_listen_btn]
आवडणारी प्रत्येक गोष्ट
मिळतेच असे नाही,
मनाला जसे वाटते तसे
घडतेच असे नाही,
जिंदगीच्या पुस्तकात अशी
असतात प्रश्नार्थक पाने,
हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर
मिळतेच असे नाही…
काही खोल असतात नाते
काही अबोल असतात नाते
वेळेवेळेनुसारही कितीदा
बदलत असतात नाते
हसऱ्या चेहऱ्यामागचे
सत्य कळतेच असे नाही,
हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर
मिळतेच असे नाही…
समोरच्यावर विश्वास ठेवून
स्वतःचाच घात होत असतो
दिव्यावर जळणाऱ्या पतंगाचा
त्या विश्वासघात होत असतो
विलोभनीय सुंदर डोंगर
सुंदर असतेच असं नाही,
हवे असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर
मिळतेच असे नाही…