[tta_listen_btn]
तुम्हाला कसं वाटेल
तोंडात जीभ असेल
जेंव्हा कापलेली….
तुम्ही आक्रोश कराल
बोलण्यासाठी पण
तुम्हाला एक शब्दही
बोलता येणार नाही
व्यवस्थेला प्रश्न? तुम्हाला
विचारता येणार नाही…
एक भीड तयार केली जातेय
तुमच्यासाठी आणि
प्रश्न विचारलारे विचारला की
तुम्हाला ठेचण्यासाठी…
दगळाला शेंदूर फासले की
त्याविरोधात बोलताच येत नाही,
अरे तो दगळ आहे हे सत्य
कोणाला सांगताच येत नाही….
अन
त्याच वेळेस भक्तांच्या तलवारी
असतील तुमच्या मानेवर
काय रे तूझी हिम्मत झालीच कशी
आमच्या देवाला दगळ म्हणण्याची?