पाठीत खंजीराचे


पाठीत खंजीराचे
आता वार खूप झाले
आता शवावर माझ्या
फुलांचे हार खूप झाले..।।
मुखवटे ओढले ज्यांनी
ते आपलेच होते
गळ्याभोवती वेदनेचे
आता तार खूप झाले..।।
चेहरे बदलणारे
रोज अवती भवतीच सारे
स्वार्थीपणाचे येथे
आता बाजार खूप झाले..।।
तोंडावर स्तुती यांची
मज कळलीच नाही
दगाबाजीने हृदय माझे
आता घायाळ खूप झाले..।।

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी