[tta_listen_btn]
मी निर्मिकाची पूजा करतो
माझा निर्मिक शेंदूर मागत नाही
की रुईचुकाचा हार मागत नाही
एवढच नाही तर तो मला कधी
नारळही मागत नाही…
त्याच्या दर्शनासाठी
रांगेत उभ राहावं लागत नाही
व्हीआयपी दर्शन म्हणून
सेटिंगसुद्धा करावी लागत नाही
तो कोणतीही गोष्ट मागत नाही
कोणतीही लाच स्वीकारत नाही
तो उपास करायला लावत नाही
सेंटेड अगरबत्ती लाव म्हणून
एक शब्दही सांगत नाही….
तो चादर चढव म्हणत नाही
तो मेणबत्ती लावायला सांगत नाही की
तो नवस करायला लावत नाही
तो एवढच सांगतो की
तू जे काम करतोस ते
इमाने इतबारे कर….
तुझ्या कामावरून येणारे
परिणामच तुला सांगतील
तू चांगला आहेस की वाईट…..?