[tta_listen_btn]
आमच्या पिढ्या गेल्यात खेड्यात
आणि खड्डयात सुद्धा
आम्हाला मन होतं तेंव्हाही
आणि आहे आत्ताही
फरक एवढाच होता की
त्यावेळी
आम्ही फक्त विचार करत होतो
मनातल्या मनात…..
काही लिहिण्याची परवानगीच
नव्हती अन व्यक्त होण्याची तर
नव्हतीच नव्हती कधी…..
आता आम्ही व्यक्त होताहोत
आता लिहू लागलो आम्ही
आमची माय गावातली
तुले मलेची भाषा
आमच्या मायेच्या गावातली…
चल तुझी वाटरी भाषा ठेव बाजूला
तुझ्या शुद्धलेखनाची ऐशी तैशी…..