खोट्या आसवांचां…

[tta_listen_btn]


प्रेमाच्या नावे तुझा
हा बहाणा कशाला
समजावया तुझे प्रेम मज
हा जमाना कशाला_||
प्रीत तुझी ती
खोटी खोटीच होती
नव्हते मनात तुझ्या
मग मी निशाणा कशाला_||
विरहात जगण्याची ही
माझीच रीत आहे
खोट्या आसवांचां तुझ्या
हा मुलामा कशाला__||

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी