[tta_listen_btn]
तू लढ म्हणतोस म्हणून
आम्ही लढायचं का
भावालाच कुऱ्हाडीने
तोडायचं का?
हिंदू हिंदू म्हणून आम्हाला
तू नेहमीच डीवचतोस
दुसऱ्यांना आतंकवादी म्हणून
आपल्यांना सोडायच का?..
धर्माचं भूत घालून तू
सोयीस्कर बाहेर राहतोस
आपलं झाकून दुसऱ्यांचं
उघडून पाहायचं का?…
चल तू म्हणतोस म्हणून
एकदा तुझही ऐकून घेतो
त्याबदल्यात तुझी काळं कृत्य
आमच्या पोरांनी पुसायचं का?