तुझ्या गुलाबी ओठावर

[tta_listen_btn]


प्रत्येक माणूसच इथे
असतो एकसारखा,
तुझ्या गुलाबी ओठावर,
वक्षावर आणि नितंबावर,
तिरप्या नजरेने कटाक्ष
टाकून

उघडपणे बलात्कार करणारा….
जुने लोक आजही म्हणतात
बाईने हात दिला नाही तर
माणसाची काय बिशाद
पण प्रत्येकच माणूस
नसतो “माणसा” सारखा!
म्हणून आपणही थोडं
सावध असावं,
काळजी घ्यावी मांड्या
उघड्या पडणार नाही याची!
माणसात जनावरच असतो..
हे गृहीत धरून चल
त्याच्या जनावर होण्याची
आजवर तरी कोणीच दिली नाही…..
शाश्वती….

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी