[tta_listen_btn]
काय म्हणतोस दादा
बाबासाहेबांचा तू स्वतःला
वारस म्हणतोयस
हरकत नाही..आनंद आहे
बरं एक सांग तू विचाराने वारस
आचाराने वारस की फक्त
त्यांच्या नावाचा
उपयोग करणारा सारस…
बुद्धाचे पंचशील मानतोस
की बाबासाहेबांनी दिलेल्या
बावीस प्रतिज्ञा पाळतोस..
काय एवढ्यातच राग आलाय??
बुद्धाची शांती मनी ठेव
हिंसा मनात आणू नकोस
एक कर तुझ्या घराच्या भिंतीवर
बाबासाहेबांच्या बाजूला
लावलेला विक्तुबाबाचा फोटो जर्रासा
बाजूला कर…..
बघ बाबासाहेब दिसतो का…..?