[tta_listen_btn]
बापानं खस्ता खाल्ल्या
पोराले शिकवासाठी
एका फाटक्या बन्यानवर
आयुष्य काढलं…
पोरगं शाळेत गेलं
शाळेचा सर्व खर्च
उचलासाठी बापानं
पोटातली भूक,पोटात मारली….
पोराकडून लईच आशा
ठेवून होता बाप….
पोरगं बी लई शिकलं
शिकून खूप मोठ्ठं झालं
पेपरात मोठ्ठ नाव आलं
शिकलेली बायको केली
बापासाठी नातवं आली…
आता घराच्या एका कोपऱ्यात
दहा फुटांवरून ढकललेल्या
ताटात जेवन करत तो बाप
गावभर सांगतो
माझा पोरगा
माझा मान राखतो आहे……
अन्
लोकांना दिसू नये म्हणून तो बाप
ती फाटलेली बन्यान
फाटक्या धोतरानं झाकतो आहे….