तू दिसलीस बऱ्याच दिवसांनी

[tta_listen_btn]

तू दिसलीस बऱ्याच
दिवसांनी
नजर तीच,
नजरेला नजर मिळताच
चेहऱ्यावर आलेलं
स्मितहास्यही तेच होतं
अन्
गालावर पडणारी खडीही
अगदी तीच होती….
अलगद तुझ्या डोळ्यांच्या
पापण्यात आलेला
आसवाचा थेंब….
कदाचित बोलायचं होतं
तुला माझ्यासवे..मुक्तपणे….
पण तुझ्या ओठांनी
बोलण्याची परवानगीच
नाकारली तुला…
मला तर परवानगी
नव्हतीच कधी…..

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी