[tta_listen_btn]
पावसाची धुंद सर
अन तुझी आठवण
थेंबा थेंबाने झिरपणारे
तुझ्यासोबतचे ते क्षण….
हवेत उडणाऱ्या तुझ्या मऊ
केसातून अलगद हात फेरावा
आणि चिंब व्हावे मन,
फुलांवर अळखळलेल्या थेंबातही
तुझा चेहरा दिसावा
देहभान विसरून तृप्त व्हावे तन………
बसावे न्याहाळत निखळ सौन्दर्य
अविरत संततधार………..
आसक्तीचा थेंबही नसावा
तुझे सौन्दर्य न्याहाळताना………
असावं प्रेम वासनाविरहित
शुद्ध झऱ्यासारखं
निर्माण होऊ नये मनात
आसक्तीचा,वासनेचा
काळाकुट्ट व्रण….
कलुषित होऊ नये तन…मन