[tta_listen_btn]
मूठभर लोक म्हणजे
सारा गाव नसतो
चोराने वठवले जरी सोंग
तरी तो साव नसतो….
चाल गड्या पुढे
रस्ता सत्याचा सोडू नको
वाईटाच्या संगतीने
भविष्य तुझे पोळू नको
नको संग असंगाशी
खोट्याला जगी वाव नसतो…..
ठेचा लागतील कितीही
मागे फिरून पाहू नको
ध्येय सोडून आपले
असत्याकडे जाऊ नको
माणसा माणसात तंटे
नेहमीच त्यांचा डाव असतो….
चोराने वठवले जरी सोंग
तरी तो साव नसतो….