तुझिया शब्दाला
विचारितो कोण
आपलीच लाल
सदोदित…..
धर्मचिया भाषा
असे मुखावरी
कृती विपरीत
संघोट्याची…..
दुसरा तो लफंग
सदा तुज वाटे
स्वतःचे लफडे
झाकोनियां…..
दुसऱ्याचे विचार
कवडीमोल तुज
आपलाच हेका
उरावरी……
तुझी ठेकेदारी
सांभाळ र येळया
हलकट निर्बुद्ध
भक्तांसाठी….
शिकवू नको ज्ञान
आम्हास तू लेका
वारस आम्ही
तुकोबांची…..