तू दुधावरची साय
मी करपलेली भाकर
मी फुटलेलं दूध अन
तू मधातली साखर…
तू बहरलेला चाफा
मी बाभळीचा काटा
दुपारच्या उन्हामध्ये
नको चालू रानवाटा…
नभ दाटले आकाशी
मी बेधुंद जसा वारा
आयुष्यात माझ्या तू
जशा विरणाऱ्या गारा….
तू दुधावरची साय
मी करपलेली भाकर
मी फुटलेलं दूध अन
तू मधातली साखर…
तू बहरलेला चाफा
मी बाभळीचा काटा
दुपारच्या उन्हामध्ये
नको चालू रानवाटा…
नभ दाटले आकाशी
मी बेधुंद जसा वारा
आयुष्यात माझ्या तू
जशा विरणाऱ्या गारा….
साहित्य चोरी बरी नसते.
कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी