दुःखात आनंद
आनंदात दुःख
संसार अश्रूंचा
महा पूर…
खोट्याने मारले
सत्याने तारले
दुतोंडी जगणे
कामी नाही….
खोट्याची महिमा
चमकते खोटी
सत्याला मरण
नाही जगी…
माणूस कोणता
नसतो वाईट
चुकांची गणना
माणसाची….
सत्याशी तो संग
असत्याशी असंग
हाच माझा रंग
सदोदित….
दुःखात आनंद
आनंदात दुःख
संसार अश्रूंचा
महा पूर…
खोट्याने मारले
सत्याने तारले
दुतोंडी जगणे
कामी नाही….
खोट्याची महिमा
चमकते खोटी
सत्याला मरण
नाही जगी…
माणूस कोणता
नसतो वाईट
चुकांची गणना
माणसाची….
सत्याशी तो संग
असत्याशी असंग
हाच माझा रंग
सदोदित….
साहित्य चोरी बरी नसते.
कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी