[tta_listen_btn]
तुजसारखा नाही जरी
जीव लावतो कुठेही
दुर्गुण असेना कितीही
पण धावतो कुठेही…
द्वि भूमिकेत कधीही
वावरने जमले नाही
खोट्याला कधीही
सावरणे जमले नाही
झरा क्षुलक नाल्याचा
मी वाहतो कुठेही….
आरशासम जगणे हे
लपवणे जमले नाही
खोट्या विश्वात स्वतःला
रमवणे जमले नाही
कर नित्य सभ्य कामे
तो पावतो कुठेही…..