[tta_listen_btn]
मी खोटे बोलेन,
तुझ्याशी,त्याच्याशी..
मी बोलेन वाईट
तुझ्याविषयी,सर्वांविषयी..
मी करेन चुगल्या
तुझ्या,सर्वांच्या..
तुझ्या,तुमच्या पाठीमागे..!!
मी स्वतःशी
बोलू शकेन का खोटे
वागेन का खोटे
अन
स्वतःचीच करेन का
खोटी स्तुती……
माझी चूक,
माझा नालायकपणा
माझा नीचपणा
मला स्वतःलाच
आवडत नाही….