[tta_listen_btn]
देह नश्वर आहे
तो नष्ट होणेच आहे
आज तू, उद्या मी
नक्कीच मरणार आहे
आज तू बिमार आहेस
मी ही नेहमीच बिमार पडतो
डॉक्टरांकडे गेल्याशिवाय
दोघेही बरे होत नाही
संकटे तुझ्यावरही येतात
माझ्यावरही आलीच होती
तू खूप पूजा केलीस
आणि मी केली नाही
म्हणून माझी संकटे वाढली
अन तुझी संकटे कमी झाली
असे कधी झाले नाही
देवदैवाचा बाजार
मनाच्या भीतीने वाढतो
कर्मावर ज्याचा विश्वास
तो दैव नव्हे
तर कर्माच्या नितीवर चालतो
गहू पेरला तर तांदूळ उगवत नाही
हातून कार्य चांगले घडले नाही तर
त्याचे परिणाम चांगले येत नाही
शेवटी तू कृष्ण म्हण की राम म्हण
साई म्हण की श्याम म्हण
वाईट कामाचे चांगले फळ येत नाही
तू पूज दगळाला की घाल लोटांगण
वाईटाला चांगलं खाटल्यावर अन्न
कोणताही देव देत नाही…..