[tta_listen_btn]
हाताच्या रेषेत भविष्य असतं
की कपाळावरच्या रेषेत ते दिसतं
की घामाच्या थेंबात ते वसतं
हे ठरवायचं असतं प्रत्येकानं
समोरच्या माणसावर
विश्वास ठेवण्यागोदर
चिकित्सा आणि तर्क
असतो करायचा
अन समोरचा काय म्हणतोय
ते खरं कि खोटं हे ही
बघायचं असतं तपासून
खोटी गोष्ट दहा वेळा
ओरडून सांगितली की
ती सर्वांनाच खरी वाटायला लागते
अन खऱ्याच्या प्रकाशाला लागतं
खोट्याचं ग्रहण…
सत्याला मरण नसतं तर
खोट्याला शेवटी सरण असतं
हिशोब प्रत्येकाचा होत असतो
माझा,तुझा,खऱ्याचा,खोट्याचा
भविष्याच्या अथांग सागरात……