[tta_listen_btn]
काय सर तुम्ही ?
चमचा सोडून हाताने जेवताहात
हो काय झालं
काही स्टेटस वैगेरे आहे की नाही
कसलं स्टेटस
बाजूला बघा प्रत्येक जण
चमच्याने जेवतोय
मग
तुम्ही असे कसे गावंढळ
माझा चेहरा पडला नाही
की वाईटही वाटलं नाही
तिला जवळ बोलावलं
बघ लहानपणी माझी आई
हातानेच जेवू चारायची
लहानपणापासून मी सुद्धा
हातानेच जेवायला शिकलो
चमच्याने घेतलेल्या घासाने
आजही माझं पोट भरत नाही
कारण जगातल्या कोणत्याही चमच्याने
आईच्या हाताची बरोबरी केली नाही
ज्या चमच्याने माझ्या मायेची
कधी बरोबरी केली नाही तो चमचा
तिच्या पोराची बरोबरी करेल का?
तूच सांग!