शब्दांचे इमले

black framed eyeglasses on book page

शब्दांचे इमले
बांधणाऱ्यांनो माझा सलाम
तुमचे शब्द
ना सड्याला कामी येत
ना सारवणाला…
आक्रोश,आक्रन्द
दया,करुणा,विद्रोह
फक्त कागदावरच..!
एका बॉटलमध्ये
प्रस्थावना लिहिणारे
अतीव दुःख मांडतात
आपल्या लेखणीतून….
दिनदुबळ्यांसाठी एक
रुपयाही खिशातून बाहेर
पडत नाही की
अन्यायाविरोधात चार
भिंतीच्या बाहेरही
कधी पडत नाहीत तुमचे पाय…
व्यस्थ असतात सदा
आपलीच स्तुती करण्यात
अन मारीत बसतात
कागदी तिर आपल्याच
माणसांवर…..
हे कागदी वाघ….

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी