[tta_listen_btn]
तो एक माणूस होता
अन्यायाला वाचा फोडणारा
कपोल्पल्पित कथा
त्याच्या माथ्यावर पेरल्या
इथल्या प्रस्थापित शेंडीधाऱ्यांनी!
बदनामी तंत्र वापरून
नेस्तनाबूत केला
त्याचा उज्वल इतिहास
माणूस पचला नाही तर
सुरू होते त्याची बदनामी
अथवा सुरू होते त्याचे
दैवीकरण…
शेतकरी,सामान्यांचा राजा
द्रोउपदीची इज्जत राखणारा
तो कृष्ण
गाडल्या गेला कायमचा
परशुरामाच्या
एका कुऱ्हाडीने…..