[tta_listen_btn]
जनता हताश येथे सत्ता मजेत आहे!
भलतीकडे पुढारी देशास नेत आहे!
चिंतेत कास्तकारी कवटाळणार फांदी,
दररोज दोर माझ्या स्वप्नात येत आहे!
अन्याय साहतो पण अभिव्यक्त होत नाही,
समजू कसा तुझा मी मेंदू सचेत आहे!
रानातली अबाधित ठेवा अशीच शांती,
निद्रेत “शेर” माझा सद्या गुहेत आहे!
लाचारपण कुणाला येऊ नये असेही,
बदल्यात भाकरीच्या गाहान शेत आहे!
धरणी रुसेल त्यावर गळणार गर्व त्याचा,
पडणार पृष्ठभागी जोही हवेत आहे!
माझ्याजवळ कधीही येणार दुःख नाही,
मी मायच्या-पित्याच्या जोवर कवेत आहे!
थँक्यू सर जी