हिंदुत्व देश तोडणारे सूत्र-समीक्षण

[tta_listen_btn]


देशातील प्रमुख मुद्दा ज्या मुद्द्यावर सर्वात जास्त राजकारण आणि त्याच मुद्याने समाजमन ढवळून निघतं,धर्मातील लोकांची वैचारिक उलथापालथ होत असते.हे पुस्तकाचं विश्लेषण नाही की समीक्षण नाही,मी एक वाचक आहे आणि हे पुस्तक वाचल्यानंतर जे एका वाचकाने प्रकट व्हायला पाहिजे ते मी होतोय.पुस्तकाच्या आजपर्यंत किती आवृत्या निघाल्या त्यावर एक दृष्टिक्षेप टाकल्यास त्या पुस्तकात नेमके काय आहे याची सहज कल्पना येईल.

●पुस्तक : हिंदुत्व देश तोडणारे सूत्र
●लेखक: श्री.नागेश चौधरी,नागपूर
●प्रकाशक: साथीदार प्रकाशन,नागपूर
●पहिली आवृत्ती:१९८९,दुसरी-१९९२,तिसरी-१९९७,चवथी:२००१,पाचवी-२०१५
●किंमत: ₹ ३०/-

◆श्री.नागेश चौधरी-बहुजन योद्धा

महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीत कित्येक माणसं आली,गेली पण चळवळीतील सातत्य अभाधित राखणारा आणि गेल्या ४० वर्षांपासून चळवळीची वात तेवत ठेवणारा हा माणूस प्रसिद्धीपासून कोसोदूर आपली बहुजन चळवळ चालवतोय,सामाजिक समतेच्या मोहिमेत स्वतःला झोकून देने हे वाटते तेवढे सोपे नाही,१९८४ साली त्यांनी “बहुजन संघर्ष” नावाचे पाक्षिक सुरू केले जे आजही अविरत सुरू आहे,कित्येक आघात सोसून सामान्य माणसाला आपल्या हक्क आणि अधिकाराची जाणीव निर्माण करण्यासाठी ह्या माणसाने आपले वैयक्तिक आयुष्य पणाला लावले,त्या काळात ग्रेड १ ची नोकरी सोडून समाजासाठी आपले अख्खे आयुष्य खर्ची घातले.बहुजनात वैचारिक क्रांती पेरण्याचे काम ते सतत करत असून त्यांची “जातीव्यवस्था व भारतीय क्रांती”,”मंडल आयोग:एक आवाहन”,”रा.स्व.संघ परिवार आक्रमकतेची रंग रूपे”, “Why Bahujans are Divided and Bramhins stay united and solid” अशी बरीच पुस्तके मराठी,हिंदी,इंग्रजी भाषात प्रसिद्ध झालेली आहेत,असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या बहुजन समाजापर्यंत पोहोचू शकले नाही हे समाजाचेच दुर्दैव म्हणावे लागेल,एखाद्या माणसाला प्रसिद्ध करायचे की कुप्रसिद्ध करायचे हे इथली व्यवस्था ठरवीत असते,प्रत्येक संस्थेवर एका विशिष्ट जातीची पकळ ही आपल्या जातीच्या शेम्बड्यालाही वर आणायचे तर बहुजनातल्या कर्तृत्ववान माणसांना जमिनीत गाडायचे काम कित्येक पिढ्यांपासून करते आहे.नागेश चौधरी सरांवर सतत मानसिक,शारीरिक हल्ले झाले ते त्यांनी सहज परतवून लावले ते त्यांच्या खऱ्या विचारांनी,कित्येकांनी त्यांच्या कामाची,विचारांची कॉपी केली,श्रेय लाटले आपले नाव मोठे केले पण ह्या माणसाने कधी त्यांच्या विरोधात साधा ब्र सुद्धा काढला नाही,यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो.
◆हिंदुत्व: देश तोडणारे सूत्र
हे पुस्तक कदाचित वाचकांना अँटी हिंदू स्वरूपाचे वाटू शकते याचे एकमेव कारण ते हे की आम्ही ऐकलेल्या,इतरांकडून सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत असतो,स्वतःचा अभ्यास नसल्यामुळे आणि चिकित्सा करण्याचा कमीपणा आपल्या अंगी असल्याने एखाद्याने हिंदू धर्मातील काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या की आपल्या भावना लगेच दुखू लागतात,याचे एकमेव कारण आपल्यातला अनपडपणा,व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटीवर येणारे ज्ञान घेऊन ही मंडळी लगेच पेटून उठतात,जे कोणत्याही पद्धतीने तार्किक राहात नाही,इतर धर्माविषयी एका विशिष्ट जातीने द्वेषपूर्ण तयार केलेल्या पोष्ट ही मंडळी सहज फिरवत असतात.महत्वाचे म्हणजे हिंदू धर्म आणि वैदिक हिंदू धर्म याबाबतीत यांचे ज्ञान शून्य असते,ठीक आहे शून्य असेल तरीही ही मंडळी कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा तयार नसतात.
◆हिंदुत्व देश तोडणारे सूत्र हे पुस्तक सर्वार्थाने डोळे उघडणारे पुस्तक आहे,पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात पंजाबमधील हिंसा ही कशापद्धतीने धार्मिक,राजकीय स्वार्थासाठी होती याचे विस्तृत विश्लेषण करते,शिखांवरील अत्याचाराचे चित्र त्यावेळच्या वर्तमानपत्रांनी कधी समोर आणले नाही,आज जशी संपूर्ण मीडिया ही सत्तेची रखेल आहे अगदी त्यावेळीही ही मीडिया त्यावेळच्या काँग्रेस सरकारची रखेल होती,वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांनी केवळ शिखांनी केलेल्या हत्या या सर्वसामान्य हिंदू लोकांच्या नव्हत्या तर शिखविरुद्ध हिंदू असा संघर्ष पेटवणाऱ्या भाजप आणि संघ पुरस्कृत होत्या,त्यामुळे शिखविरोधी सामूहिक बदलाच्या भावना सामान्य हिंदू लोकात निर्माण झाल्या,त्यामुळे पंजाबात सैनिकांकरवी दहा हजारांवर पुरुष,स्त्रिया आणि निष्पाप मुलांच्या हत्या झाल्या.सरकार काँग्रेसचे असो की भाजपचे याना चालविणारी व्यवस्था ही एकच आहे,त्यामुळेच त्यावेळच्या शिखांच्या मागण्या आजही तशाच पडून आहेत.
●हिंदुवर्णवाद्यांची नेहमी तिरकी चाल असते. सरळ लढाई ते कधीही करत नाही. आज पावेतो गुजरातमध्ये ज्या हत्त्या झाल्यात त्यात बहुसंख्य मुस्लिम आणि आदिवासी, दलित आहेत. ज्या ओबीसीचे आरक्षण वाढवण्यात आले त्यांच्या हत्या तुलनेने कमी झाल्या आहेत. कारण ओबीसींना मुस्लिम विरोधात उभे करण्यासाठी हा डाव ते खेळले. २० जून ८४ ला जगन्नाथाची रथ यात्रा निघाली व ती मुद्दाम मुस्लिम वस्तीकडून वळवण्यात आली. जगन्नाथ राहीला बाजुला, त्याच्या साक्षीने या चड्डी बहाद्दरांनी मुस्लिम विरोधी घोषणा द्यायला सुरुवात केली, मुस्लिमांच्या घरांवर दगडफेक केली व प्रत्युत्तर म्हणून मुस्लिमही पुढे आले आणि शेवटी सैन्याने गोळीबार केला. त्यात कित्येक मुस्लिम ठार झालेत. (सरकारी आकडा ७ मुस्लिम मेल्याचे सांगतो) मुस्लिम स्त्रिया देखील या प्रकाराने इतक्या चिडल्या की सैन्याच्या गोळ्यांना न घाबरता २१ जूनला १० हजार बुरखाधारी मुस्लिम स्त्रिया रस्त्यावर येऊन नमाज पडल्या. आरक्षणाचा प्रश्न अशारितीने आता आरक्षणाचा न राहता त्याचे स्वरुप हिंदु-मुस्लिम दंग्यात रुपांतरीत करण्यात येत आहे. अर्थात, अशा लढ्याला विरोध म्हणून छुप्या पद्धतीने काँग्रेसी उच्चवर्णीय व भाजपवाले एकत्र येत असतात.
◆हे एक उदाहरण आहे आरक्षणाचा अशारितीने आता हिंदु-मुस्लिम दंग्यात रुपांतरीत करण्यात येते,तुम्ही आरक्षण वा ओबीसींची जनगणना मागा ते हमखास काही असे मुद्दे उपस्थित करतील की सामान्य माणूस आपले हक्क अधिकार विसरून त्यांनी उभ्या केलेल्या मुद्यालाच पाठिंबा देऊन आपल्याला काय करायचं आहे हेच विसरून जाईल. अर्थात, आशा लढ्यात उच्चवर्णीय मग ते काँग्रेसमधील असो की भाजपमधील ते एकत्र येत असतात . दंग्यांना हिंदू-मुस्लिम स्वरुप आणले तर ओबीसी आपल्या बरोबर येतील अस त्यांचा आरक्षणाच्या बाबतीत कपटी हिशेब आहे. दुर्दशा आहे की या ओबीसी (अर्थात तेली, माळी, कुणबी, सुतार जाती) ब्राह्मणी संस्काराच्या पक्क्या गुलाम आहेत. उच्चवर्णीय समाजाचा धर्म जो आमच्या हिंदू धर्मास शूद्र ठरवतो तो धर्म आमच्या लोकांना अजून प्यारा वाटतो,
म्हणून जोपर्यंत ओबीसी आपली गुलामी झटकून हिंदूवर्णवाद्यांविरुद्ध बंड करून उठणार नाही तोपर्यंत ते आमच्यावर गुलामी लादण्याचे थांबविणार नाही,ओबीसींच्या न्यायपूर्ण मागण्या मान्य होऊ नये म्हणून ओबीसींना मुस्लिमांविरुद्ध,एस्सी,एसटी विरुद्ध विष कालवून संघर्षास बाध्य करनार आहेत.खरे पहाता मुस्लिम हे सुद्धा पूर्वाश्रमीचे बहुजनच आहेत.हे विसरून चालणार नाही.
हा आणि असाच या पुस्तकाचा एकूण सार आहे,आपली लोकं वाचन संस्कृती जोपासेल त्यावेळेला केवळ अशा एका पुस्तकाने सुद्धा क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.

माझी पोष्ट आपणास कशी वाटली? कृपया पसंती द्या.

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी